Posts

Showing posts from July, 2023

अंत्यविधीसाठी तरी जागा द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन – नामदेव भोसले.

Image
 अंत्यविधीसाठी तरी जागा द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन – नामदेव भोसले..... पारधी समाजाची मागणी  सासवड प्रतिनिधी:- दि.३१ गेल्या सत्तर वर्षात पुण्यातील पारधी समाज शासकीय सवलतीपासून वंचित राहिलेला आहे. सरकारी कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसिल कार्यालय व घोडेगाव प्रकल्प सांगत आहे की, "पुणे जिल्ह्यात पारधी कुटुंबाची घरेच नाही." अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील दिड लाख आदिवासी पारधी बांधव शासकीय सुविधांपासुन वंचित आहेत. महसुल अधिकारी, तलाठी व ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक तसेच आदिवासी प्रकल्प घोडेगाव कार्यालयातील मनमानी कारभारामुळे व जातीय भेदभाव वर्तणुकीमुळे पारधी समाज हा शासकीय  सुविधांपासुन वंचित राहीला आहे असे मत अदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांनी व्यक्त केले आहे.         पुणे जिल्ह्यातील पारधी समाजाला शिक्षणासाठी जातीचे दाखले रेशनिंग कार्ड, आधार कार्ड व त्यांना राहण्यास जागा नसल्यामुळे आणि पंचायत समिती व तहसिल, आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि पोलीस स्टेशन मध्ये जातीय वागणूक मिळत असल्यामुळे पुणे  जिल्ह्यातील दि...

सासवड येथे पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास केली अटक.

Image
सासवड येथे पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास केली अटक.  ५गुन्हे उघडकिस तर ५ मोटार सायकल केल्या हस्तगत  सासवड दि.३१      पुरंदर तालुक्यातील सासवड येथे  दि. 30/07/2023 रोजी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते...त्याच्याकडे चौकशी  केली  असता त्याने पाच मोटरसायकल चोरल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. तर पोलिसांनी त्या पाचही मोटरसायकल ताब्यात घेतल्या आहेत...        याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  रविवारी   पोलीस हवालदार संतोश शिंदे, गणेश पोटे, योगेश गरूड, वाहतुक वार्डन ऋतुराज देसाई, विक्रम जगताप हे सासवड शहरात जेजुरी नाका येथे वाहतुक नियमन तसेच वाहतुक कारवाई करीत असतांना दुपारी 3 वाजलेच्या सुमारास एक तरुण संशयास्पद स्थितीत मोटार सायकल घेवुन जातांना आढळून आला. त्याचेकडे गाडीचे कागदपत्र वाहन चालवण्याचा परवाना मागितला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली व तो त्याचे ताब्यातील होंडा शाईन गाडी सोडुन नारायणपुर बाजुकडे पळुन गेला. त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडुन ताब्यात घे...

दत्ता आंबेकर यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्याबीड जिल्हा निमंत्रक पदी नियुक्ती

Image
  दत्ता आंबेकर यांची पत्रकार  ह ल्ला विरोधी कृती समितीच्या बीड जिल्हा निमंत्रक पदी नियुक्ती मुंबई :         पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या बीड जिल्हा निमंत्रक पदी अंबाजोगाई येथील ज्येष्ठ पत्रकार दत्ता आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी आज ही घोषणा केली.          राज्यातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्यांची पुनर्रचना करण्यासाठी सर्व जिल्हा आणि तालुकास्तरीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून आता नव्याने जिल्हा आणि तालुका स्तरावर या समित्या गठीत करण्यात येत आहेत. त्यानुसार दत्ता आंबेकर यांची बीड जिल्ह्याचे निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. वरिष्ठांची संमती घेऊन बीड जिल्हयातील सर्व तालुक्यांचे निमंत्रक आणि समन्वयक यांच्या नियुक्त्या करण्याची जबाबदारी दत्ता आंबेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नवीन सर्व नियुक्त्या पुढील दोन वर्षांसाठी असतील.       पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जात असलेले खोटे खटले, पत्रकारांन...

हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्षपदी अर्जुन मेदनकर बिनविरोध निवड उपाध्यक्षपदी विवेक बच्चे, महादेव पाखरे

Image
  हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्षपदी अर्जुन मेदनकर बिनविरोध निवड    उपाध्यक्षपदी विवेक बच्चे, महादेव पाखरे आळंदी प्रतिनिधी :       मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ चाकण आळंदी (ता. खेड ) संघाच्या अध्यक्षपदी अर्जुन मेदनकर, उपाध्यक्षपदी विवेक बच्चे, महादेव पाखरे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संजय इंगुळकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केली. यावेळी झालेल्या द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रियेत सर्व कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली. या निवडीचे स्वागत करण्यात आले. पत्रकार संघाचे सदस्य आदी उपस्थित होते.     मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशा नुसार मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषद राज्य निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ, पुणे विभागीय सचिव अरुण नाना कांबळे, परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार, राज्य सह प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांच्या मार्गदर्शना नुसार तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर...

मुंबई - गोवा महामार्गासाठी आता आरपारची लढाई कोकणातील पुढाऱ्यांना १० हजार SMS पाठवून जाब विचारणार

Image
  मुंबई - गोवा महामार्गासाठी आता आरपारची लढाई कोकणातील पुढाऱ्यांना १० हजार SMS पाठवून जाब विचारणार मुंबई - गोवा महामार्गाची झालेली दूरवस्था आणि १३ वर्षांपासून रखडलेले महामार्गाचे काम याचा निषेध कोकणातील पत्रकार आणि जनता अनोख्या पद्धतीने करत आहेत.      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत रायगडचे खासदार सुनील तटकरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना एकाच दिवशी म्हणजे ९ ऑगस्ट २२ रोजी तब्बल १०,००० एस.एम एस पाठवून महामार्गाला होत असलेल्या विलंबाचा जाब विचारतील.      आज नागोठणे येथे झालेल्या रायगड प्रेस क्लबच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोकणातील पत्रकारांसह स्थानिक जनता आणि मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था पाहून ज्यांना ज्यांना संताप येतो अशा सर्वांनी या "एस.एम एस आंदोलनात सहभागी व्हावे" असे आवाहन रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी केले आहे.          याच दिवशी पत्रकार बोंबाबोंब आंदोलन करून आपला निषेध नोंदवतील. या आंदोलनात एस. एम. देशमुख, मराठी पत्रकार परिष...

दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव तर सचिवपदी रामदास डोंबे बिनविरोध

Image
दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव तर सचिवपदी रामदास डोंबे बिनविरोध यवत :       मराठी पत्रकार परिषद संचलित व पुणे जिल्हा पत्रकार संघ सलन्ग दौंड तालुका मराठी पत्रकार संघाची द्वीवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र जगताप (दै. महाराष्ट्र टाइम्स), तर सचिवपदी रामदास डोंबे (दै. पुढारी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.        कार्यकारणी निवड पुढीलप्रमाणे : नरेंद्र जगताप (अध्यक्ष), शरद रणदिवे (उपाध्यक्ष), रामदास डोंबे (सचिव), संदीप नवले (कोषाध्यक्ष), संतोष काळे (कार्याध्यक्ष), अमरसिंग परदेशी (सदस्य), त्रिभुज शेळके (सदस्य), जीवन शेंडकर (सदस्य), अक्षता हनमघर (सदस्या), मनोज खंडागळे (सदस्य), राजू जगदाळे (जिल्हा प्रतिनिधी), संदीप चाफेकर (जिल्हा प्रतिनिधी), रमेश वत्रे (हल्ला विरोधी कृती समिती) यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश कमथे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मंगेश गायकवाड यांनी कामकाज पाहिले. यावेळी पत्रकार संघाची निवडणूक ख...

मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्याबद्दल सरकारच्या विरोधात रायगड प्रेस क्लबचे ९ ऑस्टला 'बोंबाबोंब आंदोलन'

Image
 मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्याबद्दल सरकारच्या विरोधात रायगड प्रेस क्लबचे ९ ऑस्टला 'बोंबाबोंब आंदोलन' संस्थापक एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वाकण नाका ते कासू दरम्यानच्या महामार्गावर पत्रकार धडकणार मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांत होडी फिरवून व खड्ड्यांविषयी भजन गात करणार अनोखे आंदोलन रायगड : प्रतिनिधी         कोकणची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था, गेल्या १३ वर्षांत मंत्री व लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांच्या हिंदोल्यावर झोका घेत असलेली व महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेली जनता आणि असे असतांनाही केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने या महामार्गाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष या सर्वांची बाबींचा निषेध करण्यासाठी दोन्ही सरकार मधील मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात मुंबई गोवा महामार्गावर उतरून बोंबाबोंब करणारे अनोखे आंदोलन रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची एक प्रमुख संघटना असलेल्या रायगड प्रेस क्लब कडून ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी करण्याचे ठरविण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे संस...

बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी, उपाध्यक्ष संभाजी काकडे तर सचिव संदिप आढाव बिनविरोध निवड.

Image
बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी, उपाध्यक्ष संभाजी काकडे तर सचिव संदिप आढाव बिनविरोध निवड. पुणे :       मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित बारामती तालूका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हेमंत गडकरी, उपाध्यक्षपदी संभाजी काकडे, तर सचिवपदी संदिप आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी राहुल शिंदे व सह निवडणूक निर्णय अधिकारी भरत निगडे यांनी निवड जाहीर केली.      मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ व पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या सुचनेनुसार बारामती तालुका मराठी पत्रकार परिषदेची द्ववार्षीक निवडणूक प्रक्रिया मोरगाव येथील शिवांकूश मंगल कार्यालयात पार पडली. सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. अध्यक्षपदासाठी हेमंत गडकरी, उपाध्यक्ष पदासाठी संभाजी काकडे, सचिव पदासाठी संदिप आढाव, कार्याध्यक्ष पदासाठी सचिन पवार खजिनदार पदासाठी बाळासाहेब बालगुडे , कार्यकारण सदस्य पदासाठी आसिफ शेख, अमोल गायकवाड यांची नियोजित वेळेत प्रत्येकी एक अर्ज आल...

सुनील वाळुंज यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हा निमंत्रक पदी नियुक्ती

Image
  सुनील वाळुंज यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हा निमंत्रक पदी नियुक्ती मुंबई :      पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हा निमंत्रक पदी ज्येष्ठ पत्रकार सुनील वाळुंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज ही घोषणा केली.        राज्यातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्यांची पुनर्रचना करण्यासाठी सर्व जिल्हास्तरीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून आता नव्याने जिल्हा आणि तालुका स्तरावर या समित्या गठीत करण्यात येत आहेत. त्यानुसार सुनील वाळुंज यांची पुणे जिल्ह्याचे निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आहे. पुणे जिल्हयातील सर्व तालुक्यांचे निमंत्रक आणि समन्वयक यांच्या नियुक्त्या करण्याची जबाबदारी सुनील वाळुंज यांच्यावर सोपविण्यात आली आहे.      नवीन सर्व नियुक्त्या पुढील दोन वर्षांसाठी असतील. पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जात असलेले खोटे खटले, पत्रकारांना देण्यात येणाऱ्या धमक्यां बाबत आवाज उठविण्याचे काम पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करते. सर...

वाल्हे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

Image
 वाल्हे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. ग्रामीण भागातील ९७६ विक्रमी रक्तदात्यांनी केले रक्तदान. वाल्हे (दि.२९) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्टवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने, वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत कार्यालयांच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या हास्ते करण्यात आले.या आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ग्रामीण भागातील विक्रमी संख्येत रक्तदान करून, या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी, सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान सुर्यवंशी, प्रा.संतोष नवले, उद्योजक सुनिल पवार, गोरख कदम, हनुमंत पवार, संदेश पवार, दादासाहेब राऊत, अभि दुर्गाडे आदींसह अनेक मान्यवर, तरूण वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते. या भव्य रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्यां प्रत्येक रक्तदात्यांस प्रशस्तिपत्र उपस्थित मान...

दौंड व पुरंदर तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित

Image
 दौंड व पुरंदर तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित नीरा : दि.२९       पुरंदर उपविभागातील दौंड व पुरंदर तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी १ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा पावसाची स्थिती लक्षात घेऊन तसेच अन्य प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे.         जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार ३ जुलै २०२३ रोजी पोलीस पाटील भरती प्रकियेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. पोलीस पाटील पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबत कालबद्ध कार्यक्रमानुसार मंगळवार १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता परीक्षा घेण्यात येणार होती.           पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी/मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्यातील गराडे, सोनारी व हिवरे या गावांतील पुणे वर्तुळाकार महामार्...

महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत युट्युबर संघटनेचे उपाध्यक्षपदी पत्रकार तुषार धुमाळ यांची निवड

Image
 महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत युट्युबर संघटनेचे उपाध्यक्षपदी पत्रकार तुषार धुमाळ यांची निवड पुणे दि.२७  महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत युट्युबर चॅनल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवड पुसेगाव येथील बैठकीत करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी प्रसिद्ध युट्यूबर सँडियन यादव यांची निवड करण्यात आली.तर  बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील  प्रसिद्ध  युट्युबर  व पत्रकार तुषार धुमाळ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आली आहे. दि 25 श्री क्षेत्र पुसेगाव येथे सेवागिरी महाराजांच्या मंदिर परिसरात  युट्युबरच्या अडीअडचणी व संघटन करण्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक पारपडली . या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्यातील  बैलगाडी शर्यत यूट्यूब च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे   सर्व युट्युबर  उपस्थित होते.बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची  सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.  बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रथमच लाईव्ह व मुलाखत घेणाऱ्या युट्युबरची संघटना स्थापन झाली असून आगामी काळामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्राचा प्रचार व प्रसार करणे ...

सेवानिवृत्त पोलीसांनी सभोवतालच्या धोकेदायक हलचालींवर लक्ष ठेवा : डी.वाय.एस.पी. तानाजी बरडे सेवानिवृत्त पोलीस अंमलदाराचा सत्कार.

Image
  सेवानिवृत्त पोलीसांनी सभोवतालच्या धोकेदायक हलचालींवर लक्ष ठेवा : डी.वाय.एस.पी. तानाजी बरडे सेवानिवृत्त पोलीस अंमलदाराचा सत्कार. पुरंदर :    सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी समाजात काय वेगळं घडत असल्यास किंवा सभोवताली काही धोकेदायक हलचाली झाल्यास त्वरित नजिकच्या पोलिस स्टेशनमध्ये माहिती द्या. आता आपल्या कुटुंबाला वेळ द्या स्वतःचे स्वास्थ्य सांभाळा असे आव्हान भोर उपविभाग पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले आहे.     भोर उपविभाग पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत पोलीस स्टेशन मधील सेवानिवृत्त पोलिस अंमलदाराचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बरडे बोलत होते. व्यासपीठावर भोर उपविभाग पोलीस अधिकारी भोर पोलीस स्टेशन रेखा वाणी, सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडलीक गावडे, राजगडाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश आखाडे उपस्थित होते.      यावेळी ३१ ऑगस्ट २०२२ रोजी सेवानिवृत्त झालेले सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार रविंद्र जयसिंग काळभोर, ३० एप्रिल २०२३ रोजी सेवानिव...

पत्रकार सन्मान योजनेच्याजा चक अटी शिथिल होणार मराठी पत्रकार परिषदेच्याप्र यत्नांमुळे विविध प्रश्न मार्गी लागणार

Image
 पत्रकार सन्मान योजनेच्याजा चक अटी शिथिल होणार मराठी पत्रकार परिषदेच्याप्र यत्नांमुळे विविध प्रश्न मार्गी लागणार  मुंबई :बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी लवकरच रद्द करण्याची घोषणा मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज विधान परिषदेत केली..सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील असंख्य ज्येष्ठ आणि वयोवृद्ध पत्रकारांचा रखडलेला पेन्शनचा प्रश्न मार्गी लागणार आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी सरकारला त्याबद्दल धन्यवाद दिले आहेत..   मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड येथील अधिवेशनात परिषदेने केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेन्शन योजनेत वाढ करून ती 11 हजारांवरून 20 हजार रूपये करण्याची घोषणा केली होती..  मात्र त्याचा शासनादेश निघाला नव्हता तो दोन दिवसात काढण्याची घोषणाही आज सरकारने केली आहे.. विधान परिषदेत विविध आमदारांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न उपस्थित केले.. त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत पत्रकारांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा केल्या आहेत..  मरा...

डोळ्याची साथ पसरू नये स्वच्छतेवर भर द्यावा : डॉ. नरेश बागुल.

Image
  डोळ्याची साथ पसरू नये  स्वच्छतेवर भर द्यावा :  डॉ. नरेश बागुल. नी रा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून विद्यार्थ्यांचा सर्वे. नीरा :      पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये डोळे येण्याची साथ पसरले आहे. आपल्या भागामध्ये डोळ्याची साथ पसरू नये म्हणून ग्रामस्थांनी व विदयार्थ्यांनी हाताची व डोळ्यांची स्वच्छता यावर विशेष लक्ष देऊन काळजी घेणे. रुग्ण आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा यांच्याशी संपर्क करून मोफत औषधोपचार करून घ्यावेत असे आव्हान डॉ. नरेश बागुल यांनी केले आहे.       प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा अंतर्गत नीरा शहर, गुळुंचे, मांडकी येथील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा येथे जाऊन सदयस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांची काही समस्या आहे का याबाबत सर्वे करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश बागुल बोलत होते. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. समिक्षा कांबळे, आरोग्य सहाय्यक बाळासाहेब भंडलकर, आरोग्य सहाय्यिका सत्यभामा म्हेत्रे, बेबी तांबे, आरोग्य सेवक तुकाराम मुलमुले, आरोग्य सेविका अनिता नेवसे, योगीता टिळेकर, शाळांतील शिक्षक, विद्यार्थी व...

नीरा येथे आरपीआयचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Image
 नीरा येथे आरपीआयचा वर्धापन दिन उत्साहात साजरा  विद्यार्थ्यांना करण्यात आले शालेय साहित्याचे वाटप नीरा दि.२७     नीरा (ता. पुरंदर) येथे आज गुरुवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा वर्धापन दिन, त्याचबरोबर पक्ष अध्यक्ष दीपक निकाळजे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच तेजस्वी काकडे आणि मान्यवरांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर सफाई कर्मचारी महिलांना साडी चोळी देऊन  सन्मानित करण्यात आले.         रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन नीरा येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पक्षाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्धापन दिन आज गुरुवारी देखील साजरा करण्यात आला. यावेळी नीरेच्या सरपंच तेजस्वी काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, प्रमोद काकडे, संदीप धायगुडे, विजय धायगुडे,दादा गायकवाड, सचिन मोरे, विजय शिंदे, नानासाहेब हेंद्रे, किरण सोनवणे, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी झाल...

तलाठ्याच्या ४६४४ जागांसाठी तब्बल १३ लाख अर्ज : तलाठी परीक्षेतून सरकारला 127 कोटींचा महसूल

Image
  तलाठ्याच्या  ४६४४  जागांसाठी तब्बल १३ लाख अर्ज :  तलाठी परीक्षेतून सरकारला 127 कोटींचा महसूल मुंबई दि.२५ राज्यात चार  वर्षापासून रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून तलाठी पदासाठी४६४४ जागांसाठी   जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जागांसाठी राज्यभरात तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. या परीक्षा शुल्कापोटी सरकारच्या तिजोरीत तब्बल १२७ कोटी रुपयांचा महसुल जमा झाल आहे. विशेष म्हणजे, पी.एचडी., इंजिनिअर, एमबीए झालेल्या हजारो उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांनीही अर्ज केले आहेत. राज्यात 4 वर्षांनंतर तलाठी गट(क) भरतीला मुहूर्त मिळाला आहे. सरकारने  ४६४४  जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून 26 जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यात २३ जुलैपर्यंत सुमारे १३ लाखांच्या जवळ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अजून दोन दिवस म्हणजेच २५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. एकूण जागेच्या तुलनेत आलेल्या अर्जाचा विचार केल्यास एका जागेसाठी २७५ उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचंड स्पर्धा या परीक्षेसा...

पूर ग्रास्थांना मिळणाऱ्या प्राथमिक मदतीमध्ये वाढ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Image
 पूरग्रस्थांना मिळणाऱ्या प्राथमिक मदतीमध्ये वाढ : उपमुख्यमंत्री  अजित पवार यांची घोषणा  मुं बई : दि.२४ पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीऐवजी यंदा दहा हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही सभागृहांत सोमवारी केली.               आपत्ती प्रतिसाद मदतनिधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत अनुज्ञेय नसली तरी, अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी मागील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी २५ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.               भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी जळगाव जामोद मतदारसंघात ढगफुटीने झालेल्या प्रचंड हानीकडे लक्ष वेधले. हजारो एकर शेती खरडून गेली, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, घरदारे वाहून गेली. सरकारच्या मदतीकडे लोकांचे डोळे लागले आहेत, असे सां...

देशात आज घटणाऱ्या संभाव्य घडामोडी कोणत्या ते पहा

Image
 देशात आज घटणाऱ्या संभाव्य घडामोडी कोणत्या ते पहा   नवी दिल्ली दि. २५    देशाब्आदेशभरात आज अनेक महत्जवाच्या घडामोडी घादाणार आहेत . दिल्लीत संसदेचे आणि राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.  मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गटाकडून मौन निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.  राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. तर, प्रागतिक पक्षांच्या आघाडीने आदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  दिल्सलीतील  अधिवेशानाथ वोरोधक मणिपूर प्रकरणी  जाब विचारणार  मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी आणि पंतप्रधानांकडून उत्तराच्या मागण्यासाठी विरोधक आज पुन्हा सभागृहात आक्रमक होणार आहेत . सरकार सातत्याने चर्चेबाबत बोलत असले तरी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेत निवेदन करून सभागृहात चर्चा करण्याची मागणी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज भा...

कर्ज वसुलीसाठी गरिबांना छळू नका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सूचना

Image
 कर्ज वसुलीसाठी गरिबांना छळू नका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सूचना  कर्जदारांना आरबीआयकडे करता येणार तक्रार    नवी दिल्ली दि.२५     कर्ज वसुलीसाठी गरिबांना छळू नका अशा स्पष्ट सूचना अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना दिल्या आहेत कर्जवसुलीसाठी बँकांकडून अनेकदा ग्राहकांना धमकावल जात किंवा इतर मार्गाने त्रास दिला जातो. कर्जदारांना हा त्रास जास्त अनेक वेळा सहन करावा लागताे. मात्र, आता बँकांना असं करता येणार नाही. लहान कर्जदारांना परतफेडीसाठी छळू नका, अशा सूचना सर्व सरकारी व खासगी बँकांना दिल्या माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाेकसभेत दिली आहे  या समस्येबाबत हातकणंगले येथील खासदार धैर्यशील माने यांनी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की, सर्वच बँकांनी अशी प्रकरणे संवेदनशीलता राखून माणुसकीच्या भावनेतून साेडविण्याचे प्रयत्न केले पाहिजे. कठाेर मार्गांचा अवलंब करू नये. कर्जवसुलीबाबत काही नियमही करण्यात आले आहेत.त्यानुसार वसुली एजंटने ग्राहकाला सकाळी  ८ ते सायं ७ या वेळेतच कॉल करावा. ग्राहक...

मोदींच्या काळात देशातील कर्जाच्या रकमेत अडीच पटीहून अधिक वाढ

Image
 मोदींच्या काळात देशातील कर्जाच्या रकमेत अडीच पटीहून अधिक वाढ  मुंबई दि.२५     देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशावरील कर्जा मध्ये मोठी वाढ झाली आहे. हे कर्ज २.६५ पटीने वाढून ही रक्कम आता १५५.६० लाख कोटीं रुपये इतकी झाली आहे.      ३१ मार्च२०२३ पर्यंत देशात नोंदविल्या गेेलेल्या एकूण जीडीपीच्या ५७.१० टक्के इतके या कर्जाचे प्रमाण आहे. २०१४ साली देशावर ५८.६ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. त्याची रक्कम त्यावेळच्या जीडीपीच्या तुलनेत ५२.२० टक्के इतकी होती.      ते २०१८-१९ मध्ये भारत कर्जाच्या व्याजापोटी ५.८३ लाख कोटी रुपये द्यावे लागत होते. २०२२-२३ मध्ये हे प्रमाण वाढून ९.२८ लाख कोटी झाले आहे. २०१९-२० मध्ये कर्ज १०५.२० लाख कोटी रुपये होते.तर  २०२०-२१मध्ये १२१.०९ लाख कोटी रुपये झाले तर  २०२१-२२ मध्ये १५५.६०लाख कोटी रुपये झाले. ९ वर्षांत २.६५ पट अशी विक्रमी कर्जवाढ झाली आहे. म्हणजेच देशावरील कर्ज कमी होण्या ऐवजी ते दर वर्षी वाढतच चालले आहे 

पिंपरे खुर्द येथील खून प्रकरणातील आरोपींना पाच दिवसाची पोलीस कस्टडी

Image
 पिंपरे खुर्द येथील खून प्रकरणातील आरोपींना पाच दिवसाची पोलीस कस्टडी   नीरा दि.२३       पुरंदर तालुक्यातील नीरा नजीक पिंपरे येथे शुक्रवारी झालेल्या खून प्रकरणा मध्ये सहभागी असलेल्या दहा आरोपींना सासवड येथील न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. यामध्ये मयताच्या पत्नीसह दहा जणांना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपासासाठी पोलिसांनी पोलीस कस्टडीची मागणी केली होती.   पिंपरे येथे शुक्रवारी रात्री हरिश्चंद्र थोपटे यांचा गळा चीरून खून करण्यात आला होता.यानंतर पोलिसांनी काल शनिवारी संध्याकाळी मयताच्या पत्नीसह दहा जणांना अटक केली होती. यामध्ये आरोपींनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली आहे. आज रविवारी या आरोपींना सासवड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची म्हणजेच गुरुवार पर्यंतची पोलीस कस्टडी दिली आहे. या मध्ये गुन्ह्याच्या अनुसंगाणे आणखी काही पुरावे हाती लागतात का? त्याच बरोबर आणखी काही लोकांचा यामध्ये सहभाग आहे का ? त्याचबरोबर गुन्ह्या संदर्भात असलेले इतर पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांनी कस्टडीची मागणी केली होती. त्यामुळे कोर्...

पिंपरे येथे अनैतिक संबंधातून पत्नीनेच काढला नवऱ्याचा काटा

Image
 पिंपरे येथे अनैतिक संबंधातून  पत्नीनेच काढला नवऱ्याचा काटा  खुनाचा २ तासात उलगडा : जेजुरी पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी  नीरा :  23    नीरा नजीक पिंपरे खुर्द येथे काल शुक्रवारी झालेला खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.तर या खुनात मयताच्या पत्नीचा मोठा सहभाग असल्याचे उघड झाले आहे . या प्रकरणी पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या दोन तासात मयताच्या पत्नीसह नऊ जणांना ताब्यात घेतले होते. पोलीस तपासात अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. याबाबत उपा विभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी माहिती दिली आहे.       पिंपरे (खुर्द) येथील बेंदवस्तीत  काल शुक्रवारी (दि.२१) रोजी रात्री आठ  वाजलेच्या चे सुमारास  हरीशचंद्र बजरंग थोपटे (वय ४२ वर्षे ) र यांचा कोणीतरी अज्ञाताने धारदार शस्त्राने कपाळावर, गालावर, हनगुटीवर, गळ्यावर वार करून. खून केला होता या प्रकरणी त्याबाबत मयताचा भाऊ सतिश बजरंग थोपटे यांनी तक्रार दिलेवरून जेजुरी पोलीसात गुन्हा दखल करण्यात आला आहे.         याप्रकरणी...

पिंपरे येथील माथाडी कामगाराच्या खून प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

Image
 पिंपरे येथील माथाडी कामगाराच्या  खून प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई  पोलिसांनी एका महिले सह नऊ संशयितांना घेतले ताब्यात  दि.२२          पुरंदर तालुक्यातील नीरा नजीक पिंपरे येथे कोयत्याचा वार करून एकाचा खून करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री हा खून करण्यात आला होता.हरिश्चंद्र बजरंग थोपटे यांचा यामध्ये झाला मृत्यू झाला होता. कोयत्याचा वार करून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यातआला आहे.. हरिश्चंद्र थोपटे हे नीरा येथे माथाडी कामगार म्हणून काम करीत होते.   दरम्यान या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी काल रात्री लगेच 9 जणांना ताब्यात घेतलंआहे. जेजुरी पोलीस या बाबत तपास करत आहेत . भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, जेजुरीचे पोलीस निरीक्षक सांडभोर आणि जेजुरी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करून संशयितांना घटने नंतर अवघ्या तीन तासात जेरबंद केलं आहे. या घटने बाबत पोलीस संशयितांची चौकशी करीत आहेत.हे संशयित पिंपरे,नीरा,आणि पाडेगाव परिसरातील आहेत.तर यातील काही जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे सांगण्यात येत आहे...

पिंपरे येथे एकाचा कोयत्याने गळा चिरून खून

Image
 पिंपरे येथे एकाचा कोयत्याने गळा चिरून खून    पोलीस घटनास्थळी दाखल    नीरा दि.२१   पुरंदर तालुक्यातील नीरा नाजीक पिंपरे  येथे कोयत्याचा वार करून  एकाचा खून करण्यात  आला आहे.  हरिश्चंद्र बजरंग थोपटे यांचा यामध्ये झाला मृत्यू  झाला आहे.कोयात्याचा वार करून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. जेजुरी पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्यात येतेय...        याबाबत स्थानिक लोकांनी दिलेल्या माहिती नुसार हरिश्चंद्र बजरंग थोपटे वय ४२ रा.  बेदवस्ती पिंपरे. हे रात्री साडेसात वाजता नीरा डाव्या कालव्यालरील डाव्या बाजूला गळा चालेल्या अवस्थेत मृत  आढळले.  त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने  वार केल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या गळ्यावर तीन वार करण्यात आले आहेत.. पुणे पंढरपूर महा मार्गालगत दुचाकीवरुन हिरोहोंडा  मोरे सायकल  क्रमांक एम.एच. १२- बी.आर. ७२१९ वरून ते घरी जात होते. त्यांच्या कपाळावर, नाकावर व हणवटी व मान या भागात खोलवर जखमा झाल्याचे दिसून येत आहे.

पिंपरे येथे दोन दुचाकीची समोरा समोर धडक. एक युवक ठार, तीन जखमी.

Image
 पिंपरे येथे दोन दुचाकीची समोरा समोर धडक. एक युवक ठार, तीन जखमी.   नीरा दि. ९ :-  वाहतुकीसाठी नेहमीच धोकादायक असलेल्या पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर रविवार (दि.०९) पुन्हा अपघात झाला.  निरा नजीक पिंपरे (ता.पुरंदर) येथे दोन दुचाकीस समोरासमोर धडकल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी आहेत. याबाबतची माहिती नीरा पोलिसांनी दिली आहे.  पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा ते वाल्हा दरम्यानच्या निरा डावा कालव्यावरील पुलाजवळ दोन दुचाकी समोरा समोर धडकल्या. या अपघातात किरण रामदास धुमाळ (वय २८) रा. जेऊर, ता.पुरंदर) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मावशी मिना कांतीलाल दरेकर (वय ४०) या जखमी झाल्या आहेत.  धुमाळ हे आपल्या एम. एच १२ जे. पी.३९३० या दुचाकीवरून निरा येथून जेऊरकडे निघाले होते. जेजुरी बाजूने मोहन विनायक रोंदळे (वय ३२) व भिमा बाळु  मधुकर (वय ३०) रा. शिंदवणे ता.हवेली हे दोघे एम.एच. १२ ए.डी १४९४ दुचाकीवरून भरधाव आले. रोंदळे गाडी चावलत होते. त्यांनी विरुद्ध दिशेला येऊन धुमाळ यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.  यामध्ये चौघे ही जखम...

जेजुरीचे माजी नगरसेवक मेहबुब पानसरे सशस्त्र हल्यात ठार.

Image
 जेजुरीचे मा. नगरसेवक मेहबुब पानसरे शसस्त्र हल्यात ठार.  पुरंदर :  जेजुरी नगरपरिषदेच माजी नगरसेवक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मेहबुब पाणसरे यांच्यावर धारधार तलवारीने प्राणघातक हल्ला झाला होता. पानसरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, खासदार सुप्रिया सुळे यांच्या जवळचे होते. त्यांच्या वर झालेल्या हल्ल्याची व म्रुत्यूच्या घटनेने जेजुरीसह पुरंदर तालुक्यात खळबळ माजली आहे.          शुक्रवारी संध्याकाळी जमिन खरेदी विक्री व्यव्हारातून पानसरेंवर काही लोकांनी हल्ला केला होता. त्यांना पुणे शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रात्री नऊच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान म्रुत्य झाल्याची माहिती समोर येत आहे. धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्याण ते गंभीर जखमी होते वार. जमिनीच्या खरेदीविक्री वादातून प्राणघातक हल्ला झाल्याची चर्चा आहे. जेजुरी शहरात पानसरे यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्यावरील प्राणघातक हल्ला व त्यानंतर झालेल्या म्रुत्यूमुळे जेजुरीसह पुरंदर तालुक्यातील जनतेतून हळ हळ व्यक्त होत आहे.