Tuesday, March 28, 2023

पुरंदरमध्ये कोराना रुग्ण.

 पुरंदरमध्ये कोराना रुग्ण. 



नीरा :  दि. २८


         पुरंदर तालुक्यात कोव्हिड रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यात यापूर्वी दोन रुग्णांचे अहवाल बाधित आले असुन, आता सुपे (खुर्द) येथील एक युवकाचा सोमवारी कोरोना बाधित अहवाल आला आहे. 


   मागील आठवड्यात सासवड शहर व वनपुरी येथे प्रत्येकी एक रुग्णाचा अहवाल कोरोना बाधित आला होते. ते दोघे आता पुर्ण बरे झाले असुन, सोमवारी पुण्यातील सिरम कंपनीच्या कर्मचाऱ्यांची तपासणी कंपनीत करण्यात आली होती. या दरम्यान पुरंदर तालुक्यातील पानवडी रोडवरील सुपे (खुर्द) येथील एक व्यक्तीचा अहवाल बाधित आला आहे. त्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसून तो होम आश्युलेशन मध्ये आहे. त्यांच्या संपर्कातील १३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी दिली आहे.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका, वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द

 अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका, वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द; सदावर्ते यांना नेमकं काय भोवलं?



 मुंबई. दि. २८

            प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने मोठा झटका देण्यात आलेला आहे. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून आता पुढील दोन वर्ष त्यांना कोणतीही केस लढता येणार नाही .


      मुंबईतील वकील सुशील मंचरकर यांनी बार कौन्सिल यांच्याकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवर तीन वकिलांच्या समितीने तपासणी करून गुणरत्न सदावर्ते यांना दोन वर्ष कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाही. अशा स्वरूपाची कारवाई केलेली आहे. एकूणच गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षासाठी सनद रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. बार कौन्सिलच्या नियम सात नुसार गुणरत्न सदावर्ते यांनी उल्लंघन केलं होतं आणि त्यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे.


काही महिन्यांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपातील कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडली होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढवली होती.


एसटी कर्मचाऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांची बाजू मांडत असल्याचे सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर अनेकदा सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला होता. एसटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत विलीन करून घ्यावं यासोबतच त्यांना शासनाच्या सर्व सेवा मिळाव्यात यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयीन लढा दिला होता.


वकील गुणरत्न सदावर्ते हे न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत सुनावणी झाल्यानंतर आझाद मैदानावर आंदोलन करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भेटीला येत होते. त्याच दरम्यान ते आपला न्यायालयीन गणवेश अनेकदा परिधान करून येत होते.



वकिलीचा गणवेश परिधान करून बाहेर सार्वजनिक ठिकाणी जाणे. हे बार कौन्सिलच्या नियमाला धरून नाही. इतकेच काय गणवेश परिधान केलेला असतानाही गुणरत्न सदावर्ते हे त्या ठिकाणी नृत्य करताना निदर्शनास आले होते. आणि हीच बाब बार कौन्सिलच्या नियमात बसत नाहीत.


गुणरत्न सदावर्ते यांचे आझाद मैदानावरील उल्लंघन वकील सुशील मंचरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थेट बार कौन्सिल कडे तक्रार केली होती. याच तक्रारीची दखल घेऊन गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बार कौन्सिलने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या मुंबईतील आजाद मैदानावरील संपात सहभागी होत असताना वकिलीचा गणवेश घालून तिथे केलेला डान्स वकील गुणरत्न सदावर्ते यांना चांगलाच भोवला असून दोन वर्ष त्यांना कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाहीये.

Friday, March 24, 2023

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द

 काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द



नवी दिल्ली दि.२४


देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार होते. लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, वायनाडचे खासदार 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरले आहेत.


लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे. सूरत येथील कोर्टाने दोषी ठरवल्याच्या तारखेपासून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड येथील खासदार आहेत. त्यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. राहुल गांधी आज सकाळी लोकसभेत आले. त्यांना बोलू द्यावे, अशी मागणी करत काँग्रेस खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये धाव घेतल्याने गोंधळ उडाला. काही वेळाने लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. काँग्रेसने आज देशाच्या राजधानीत मोठ्या आंदोलनाची योजना आखली होती. त्याचवेळी आज सकाळी संसदेतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात विरोधकांची बैठक झाली होती.

आंतरजातीय विवाह करा आणि बना सरकारचे जावई मिळणार 10 लाख रुपये हुंडा

 आंतरजातीय विवाह करा आणि बना सरकारचे  जावई

मिळणार 10  लाख रुपये  हुंडा 



नवी दिल्ली दि.24


   आपली भारत देशात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना नेहमीच विरोध केला जातो. आजही  जात किंवा धर्माबाहेर लग्न केल्यामुळे अनेक समाजात आणि कुटुंबात वाद होतात. किंवा अशावेळी मुला मुलींची हत्या देखील केली जाते पण आता हा विवाह झाल्यास मोठी रक्कम त्या जोडप्याला मिळणार आहे.आणि त्यामुळे समाजाने नाकारले तरी नवं जोडप्याचा रोजी रोटीचा प्रश्न मिटणार आहे.


पण सामाजिक समता आणि सलोखा राखण्यासाठी त्याच बरोबर अस्पृश्यता निर्मुलनासाठी सरकार काम करत आहे. राजस्थानमध्ये आंतरजातीय विवाहाला देण्यासाठी  प्रोत्साहन रक्कम 10 लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी ही रक्कम 5 लाख रुपये होती. 


राजस्थानमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागातर्फे संचालित डॉ. सविता बेन आंबेडकर आंतरजातीय विवाह योजना  अंतर्गत, आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन रक्कम आता 10 लाख रुपये करण्यात आली आहे.


राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रक्कम वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. योजनेअंतर्गत 8 वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या जातील. उर्वरित 5 लाख रुपये संयुक्त बँक खात्यात जमा केले जातील. 2023-24 च्या अर्थसंकल्पात गेहलोत यांनी या संदर्भात घोषणा केली होती.


Thursday, March 23, 2023

सासवड येथे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आंदोलन

 सासवड येथे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आंदोलन

राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप.

आदानी आणि मोदींचा रिस्ता काय ?

 काँग्रेस कार्यकर्त्यांची चौकशीची मागणी 



   सासवड दि.२४

  

         पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आज दुपारी काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा दिली आहे. या निर्णयाचा निषेध या आंदोलनातून करण्यातआला.

            केंद्र सरकार जाणून-बुजून राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत मोदी आणि आदानी यांचा संबंध काय ? असा प्रश्न आंदोलकांनी विचारला. तर राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये आदानी आणि नरेंद्र मोदी यांचा संबंध काय ? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळेच सरकार त्यांना त्रास देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सासवड येथील शिवतीर्थ चौकामध्ये एकत्र येत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल. काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.



   यावेळी माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे,छाया जगताप, भारती गायकवाड, सुनिता कोलते, राजेंद्र जगताप, मनीषा बडदे, निकिता होले, हरून बागवान, विठ्ठल मोकाशी, बिट्टू भांडवलकर, विश्वजीत आनंदे, अजित जगताप, सागर जगताप, चेतन महाजन, राजेंद्र बरकडे, तुषार माहुरकर, स्वाती गिरमे, आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते




१९८६ सालाच्या पदवीधराची जिद्द, मेहनत...! खडकाळ माळरानावर फुलवले शिवार

 १९८६ सालाच्या पदवीधराची जिद्द, मेहनत...! खडकाळ माळरानावर फुलवले शिवार

पुरंदर तालुक्यातील गोपाळ कदम यांची सक्सेस स्टोरी....




शासनाची मिळाली मदत, झाला शेतीत फायदा


पुणे:   शेतकरी जर उच्च शिक्षित असेल आणि त्याला शासनाच्या योजनांची साथ मिळाली तर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे पुरंदर तालुक्यातील शेतकरी  गोपाळ गजानन कदम. यांनी पुरंदर तालुक्यातील सटलवाडी  या आपल्या गावी खडकाळ माळ रानावर शेतीचा  यशस्वी प्रयोग करत  पिकांचे.शिवार फुलवले आहे. त्यांनी खडकाळ  माळ रानावर डाळींब, सीताफळ यांच्या उत्पन्न तर घेतलेच पण  ते सोबतच तरकारी मालामध्ये कारले, घेवडा कांदा आदी पिकांचे उत्पादन देखील घेतले. त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी शेती करायला सुरुवात केली आहे. 



पुरंदर तालुक्यातील सटलवाडी या दीड हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या लहानशा गावातील शेतकरी गोपाळराव कदम हे वारकरी कुटुंबातील. 1986 सालचे पदवीधर असलेल्या गोपाळरावांनी नोकरीऐवजी शेतीची वाट निवडली. त्या काळात शासकीय नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होत्या. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे त्या काळी शिक्षकाला दीड ते दोन हजार रुपये तर बँकेतील चांगल्या पदावरील नोकरदारास 6 हजारापर्यंत वेतन होते. परंतु, त्यांच्याकडील काही शे- दोनशे मोसंबीच्या झाडांपासूनच त्यांना त्यापेक्षा अधिक रक्कमेचे उत्पन्न मिळत असल्यामुळे त्यांनी शेतीच करण्याचा निर्णय घेतला. 



गोपाळराव यांची वडिलोपार्जित जमीनीपैकी काही जमीन बागायत होती. त्यामध्ये भाजीपाला, कडधान्ये, मोसंबी अशी पिके ते घेत. परंतु, डोंगराच्या जवळ असलेली 6.5 एकर जमीन पडीक खडकाळ, मुरमाड होती. हळूहळू ही जमीन त्यांनी विकसित करायला सुरुवात केली. पाण्याची खात्रीशीर सोय असल्याशिवाय शेती होऊ शकत नाही. म्हणून 1999- 2000 मध्ये विहीर खोदली. जवळपास 6 हजार फूट पीव्हीसी पाईपलाईन करुन नवीन विकसित केलेल्या शेतात पाणी आणले आणि पिकवायला सुरूवात केली. त्यावेळी बाजरी, ज्वारी, मटकी, हुलगा, कांदा थोड्या प्रमाणात हळद आदी पिके घेतली जात होती. काही डाळींबाची झाडे लावली.



विहिरीच्या पाण्यामुळे आठमाही शेतीच करता येत होती. मग सहा- सात शेतकऱ्यांचा समुह करुन राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून (एनएचएम) सामुहिक शेततळे घेण्याचा निर्णय घेतला. 3 लाख 25 हजार रुपये अनुदानातून  34 मीटर बाय 34 मीटर बाय 4.7 मीटर लांबी, रुंदी, उंचीचे आणि  50 लाख लिटर साठवण क्षमतेचे शेततळे तयार झाले. सर्व पिकांसाठी ठिबक सिंचन तंत्र वापरले जात असल्यामुळे 25 एकर शेतीला या शेततळ्याचे पाणी पुरते. त्यावेळी ठिबक सिंचन संचासाठीही 49 हजार रुपये अनुदानाचा लाभही मिळाला.


गरजेच्या कालावधीतील पाण्याची शाश्वत सोय झाल्यामुळे डाळींब आणि सिताफळ या फळबाग लागवडीवर विशेष भर दिला. 2016 च्या दरम्यान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिताफळ लागवडीसाठी 20 हजार रुपये अनुदान मंजूर झाले. त्यातून 225 सिताफळ झाडे लावली. पूर्वीची डाळींबाची झाडे जुनी झाल्यामुळे काढून टाकावी लागली. त्यानंतर पुन्हा 2017- 18 मध्ये 450 झाडे लावली. व परत 2021 मध्ये 150 झाडे लावली. 



डाळींबाच्या साडेचारशे झाडांवर पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला 15 किलो माल मिळाला. पुण्याच्या गुलटेकडी फळबाजारात 80 ते 180 रुपये प्रतिकिलो दर मिळाला. 8 ते साडेआठ लाख रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळाले. त्यानंतर आता या झाडांचा तिसरा बहार आणि नवीन लावलेल्या 150 झाडांचा पहिला बहार घेतला आहे. यावर्षी फळांचा आकार मोठा रहावा म्हणून प्रतिझाड फळांची संख्या नियंत्रणात ठेवली आहे.



एक एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेल्या फुले पुरंदर या वाणाच्या सीताफळाच्या 225 झाडांपासून 5 व्या वर्षी 3 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. एका झाडावर खतासह एकूण सर्व खर्च 300 रुपयांपर्यंत तर उत्पन्न दीड ते पावणेदोन हजार रुपये मिळाले. 


त्यांनी १ एकर क्षेत्रावर कारल्याचे पीक घेतले आहे. रोजच्या रोज सासवड आणि दिवे भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवले जाते. त्यातूनही मोठा नफा होत आहे. त्यांचे भाऊ विक्री व्यवस्थापनाकडे लक्ष देत असल्यामुळे पीकाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत असल्याचे गोपाळराव कदम सांगतात. यंदा कांद्याचे उत्पादनही चांगले असून 80 टनाहून अधिक होण्याची अपेक्षा आहे. 15 रुपयापेक्षा अधिक दर मिळाल्यास चांगला फायदा होईल, असे ते म्हणतात.


कदम यांना रोहयोतून फळबाग लागवड, ठिबक सिंचन संचासाठी अनुदान, एनएचएम मधून सामुहिक शेततळे या योजनांच्या लाभाबरोबरच कृषि उन्नती योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान मधून ट्रॅक्टरचालित औजारे खरेदी केली. रोटाव्हेटरसाठी ३५ हजार रुपये, पल्टीफाळ नांगरासाठी २३ हजार रुपये, 2016 मध्ये विद्युत पंपासाठी 10 हजार रुपये अनुदान मिळाले आहे.



शेतीत जैविक पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब


फळबागा व भाजीपाला पिकांसाठी कदम जैविक पद्धतीचा अवलंब करतात. रासायनिक खते आणि कीडनाशके यांचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत अत्यल्प ठेवले आहे. गाईचे शेण, मूत्र, गूळ, दाळीच्या पीठापासून केलेले जीवामृत फवारणे, नीम अर्कची फवारणी. कंपोस्ट तयार करण्यासाठी शेणखत, लेंडीखत, कोंबडखत, बोनमील, उसाची प्रेसमडचा शेतातच डेपो करुन त्यावर नत्र, स्फुरद, पालाश स्थिरीकरणासाठी पीएसबी, एनपीके जीवाणू सोडले जातात. ही खते प्रत्येक झाडाला देऊन कीड, बुरशी नियंत्रणासाठी जीवाणूयुक्त कीडनाशके, बुरशीनाशके वापरतात. अत्यल्प तीव्रतेचे बोर्डो मिश्रण, जैविक किटकनाशके घरीच तयार केले जाते. कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सल्ला यामध्ये वेळोवेळी मिळत असतो.



विविध पुरस्कारांनी  गौरव..


शेतात केलेल्या विविध प्रयोगांमुळे त्यांना विविध पुरस्कारही मिळाले आहेत.   शाश्वत उत्पन्नासाठी शेतीवरील खर्च मर्यादित व कमी करत उत्पन्न वाढवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास तोट्यातील शेती नफ्यात बदलणे अजिबात कठीण नाही हे गोपाळराव कदम यांच्या उदाहरणातून दिसून येते.


उच्च शिक्षितांनी शेतीकडे वळणे गरजेचे..


शेतीमध्ये सुशिक्षित वर्ग आला पाहिजे. शेती ही नियोजनबद्ध, नफा- तोट्याचा मेळ घालून आणि व्यावसायिकरित्या करण्याची बाब आहे. शिक्षण अर्धवट सोडलेला, कमी शिकलेला घटक यात मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे व्यावसायिकरित्या शेती केली जात नाही. शेतकरी शासनाच्या योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ मिळवण्यात अपुरे पडतात. त्यामुळे शेती परवडत नाही. परंतु, सुशिक्षितांनी योग्य पद्धतीने शेती केल्यास नक्कीच चांगले उत्पादन आणि उत्पन्न शेतीतून मिळू शकते.असे गोपाळ कदम सांगतात.

लग्नाच्या पहिल्याच रात्रीच नवरीन नवरदेवाला दिला मोठा झटका. सत्य समजताच नवरदेव हादरला

 लग्नाच्या पहिल्याच रात्रीच नवरीन नवरदेवाला दिला मोठा झटका. सत्य समजताच नवरदेव हादरला



नवी दिल्ली दि.२३


    आपल्याकडे समाजात लग्नाला खूप शुभ मानले जाते. ज्या घरांमध्ये लग्नं होणार आहे, तिथे आनंदाचं वातावरण असतं. मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात इतकं काम असतं की लोक रात्रंदिवस व्यस्त असतात.

लग्नाच्या काही दिवस आधी वधू-वरांच्या घरी मंगल गीते सुरू होतात. घरे सजवली जातात. पाहुण्यांची कोणतीच तक्रार नसावी म्हणून विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. दुसरीकडे, वधू आणि वर पहिल्या रात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात.


भेटीची पहिली रात्र संस्मरणीय करण्याचा दोघांचा प्रयत्न असतो. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाला धोका मिळाला तर त्याची काय अवस्था होईल? अशीच एक घटना इंदूरमध्ये काही दिवसांपूर्वी समोर आली.नवरीकडील लोकांनी कट रचून हे लग्न लावलं होतं.


दलालाने त्या व्यक्तीचं लग्न ठरवलं. ठरलेल्या तारखेला रीतिरिवाजांसह विवाह सोहळा पार पडला. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी, वर आपल्या वधूसह नवीन जीवन सुरू करण्यासाठी उत्सुक होता. मात्र नवविवाहित वधूने वराला सांगितलं की तिला मासिक पाळी सुरू झाली आहे, त्यामुळे ती शारीरिक संबंध ठेवू शकत नाही.


मात्र लग्नानंतर सात दिवसांनी भलतंच सत्य समोर आलं. 7 दिवसांनंतर नवरी फरार झाली. तपास केला असता ती लग्न जमवलेल्या दलालाच्या घरात आक्षेपार्ह स्थितीमध्ये आढळली. यानंतर हे सगळे तिथूनही फरार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तरुणाचं लग्न संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था राखून पार पडलं. लग्नानंतर नवरीने बहाणा सांगत नवरदेवाला जवळ येऊ दिलं नाही. लग्नानंतर सुमारे 7 दिवसांनी ती सोन्याचे मंगळसूत्र, टॉप्स तसेच चांदीचे दागिने आणि 3 लाख रुपये रोख घेऊन फरार झाली. वास्तविक, ती लुटेरी वधू होती, जिने लग्न करून दरोडा टाकला आणि नंतर दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला.


वधू अचानक बेपत्ता झाल्यानंतर वर आणि त्याच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. घराची तपासणी केली असता दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे आढळून आले. यानंतर संतप्त झालेल्या नवरदेवाकडील लोकांनी थेट लग्न ठरविणाऱ्या एजंटचे घर गाठले. तिथे नववधू दलालासोबत त्याच खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. यामुळे वराच्या आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. या सर्वांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामागे मोठी टोळी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शरद पवार यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये बैठक, संजय राऊत उपस्थित राहणार? : EVM चा मुद्दा ही तापणार

 

शरद पवार यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये बैठक, संजय राऊत उपस्थित राहणार? : EVM चा मुद्दा ही तापणार




लोकसभा निवडणुकांचे  वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. देशात २०२४ मधील निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी  आणि भाजप सरकारची सत्ता उलथवून देण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी एकजुटीनं प्रयत्न करायला हवेत, असा सूर उमटतोय. आणि म्हणूनच आज खा.शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी नेत्यांची एक बैठक होते आहे.या बैठकीला शिवसेनेचे नेते संजय राऊत हे देखील उपस्थित राहणार आहेत.

   भाजपचे सरकार हटवण्यासाठी  काही दिवसांपासून जोरदार हालचाली सुरु आहेत. देशभरात भाजपविरोधी नेत्यांवरील कारवाया आणि छापेमारीचं वातावरण तापलं असतानाच दिल्लीत आज एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनुभवी राजकारणी अशी ओळख असलेले शरद पवार या बैठकीचं नेतृत्व करत आहेत. देशातील विरोधी पक्षांचे बहुतांश नेते आज २३ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहतील. शिवसेना खासदार संजय राऊत या बैठकीला उपस्थित राहणार का, अशी चर्चा आहे. स्वतः राऊत यांनीच या प्रश्नाचं उत्तरं दिलंय.

संजय राऊत बैठकीला जाणार?

शिवसेना खासदार संजय राऊत दिल्लीतील विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई या बैठकीला जातील.

EVM चा मुद्दा तापणार?

दिल्लीत होणाऱ्या आजच्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक व्होडिंग मशीनचा मुद्दा महत्त्वाचा असेल, असं सांगण्यात येतय. तसंच इतरही राजकीय मुदद्यांवर चर्चा होईल. निःपक्षपाती निवडणूक पार पडण्यासाठी ईव्हीएम यंत्रणा अचूक आणि कार्यक्षम असावी लागते. त्यावर काही शंका असल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने लक्ष घालणे आवश्यक आहे, अशी विरोधकांची मागणी आहे. आजच्या दिल्लीतील बैठकीत काही तज्ज्ञ आणि क्रिप्टोग्राफर्स उपस्थित असतील .चिप बसवलेल्या कोणत्याही मशीनला हॅक करता येते, यासंदर्भात ते माहिती देतील, असं सांगण्यात येतंय.

संजय राऊत काय म्हणाले?

दिल्लीतील बैठकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ आज विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. अनिल देसाई उपस्थित राहणार आहेत. ईव्हीएम कशी हॅक होते हे दाखवणार आहे. निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या ही लोकांची भावना आहे.आपण मतदान करतो ते ज्यांना केलं ते त्यांना मिळतं का नाही याबाबत लोकांमध्ये शंका आहे. शंका असेल तर ती लोकशाही नाही. जगभरात ईव्हीएम बाद केलं आहे. मोदींच्या प्रिय अमेरिका आणि रशिया युरोपातही. त्यामुळे भारतात असा हट्ट का करतात, त्यावर शंका आहे. बैठकीत काय होईल ते पहावं लागेल.

अखेस संजय राऊत यांना पदावरून हटवले

 संजय राऊत यांना पदावरून हटवले 



नवी दिल्ली दि. २३



    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हटवण्यात आले आहे.तर त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आली आहे.


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या नियुक्तीचं अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलं आहे. 

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संसदीय नेतेपदावर गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी लोकसभेत शिवसेनेच्या मुख्य गटनेतेपदी संजय राऊत होते. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर संसदेतील शिवसेनेचं कार्यालय देखील एकनाथ शिंदे गटाला मिळालं होतं. त्यानंतर संजय राऊत यांची मुख्य गटनेते पदावरुन हाकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी होत होती. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र दिलं असून यामध्ये असं म्हटलं की, "२१ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत शिवसेनेच्या कार्यकारिणीची एक बैठक पार पडली या बैठकीत एकमतानं ठराव करण्यात आला की, संजय राऊत हे यापुढं संसदेतील मुख्य नेते नसतील तर गजानन किर्तीकर असतील. आता आमची संख्या जास्त असल्यानं संजय राऊतांची हाकालपट्टी करण्यात यावी. शिवसेनेची मी मागमी मान्य होण्याची शक्यता आहे.

महिन्याभरापूर्वीच संसदेतील मुख्य नेते पदावरुन राऊतांना हटवण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. संसदेत व्हिप काढण्याचा अधिकार संजय राऊत यांना होता, पण आता गजानन किर्तीकर यांच्याकडं हे सर्व अधिकार असतील. शिंदेंच्या सर्व खासदारांकडून किर्तीकरांचा या नियुक्तीबद्दल सत्कारही करण्यात आला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा

 काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा 

सुरत येथील न्यायालयानं सुनावली शिक्षा 



मुंबई दि.१३



    2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोलार येथे रॅली दरम्यान राहुल गांधी केलेल वक्तव्य राहुल.गांधी यांच्या एका वक्तव्याने ते चांगलेच आदचानित आले आहेत.मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात? राहुल गांधीयांनी हे वक्तव्य केलं आणि त्यावरून आता त्यांना दोषी ठरवत सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे


       सन 2019 साली राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गुजरातचे त्यावेळचे मंत्री पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीची याचिका दाखल केली होती.


2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोलार येथे रॅली दरम्यान राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं. भारतीय दंड संहिता कलम 499 आणि 500 अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरवणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयानेही त्यांना जामीन मंजूर केला आणि उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा देण्यासाठी 30 दिवसांची शिक्षा स्थगित केली.

Wednesday, March 22, 2023

पुणे जिल्ह्यातील हा मार्ग वाहतुकीसाठी करण्यात आला बंद

 नीरा मोरगाव मार्ग वाहतुकीसाठी करण्यात आला बंद

वाहन चालकांना आता नीरा जेजुरी मोरगाव असा प्रवास करावा लागणार



नीरा दि.२३


        पुरंदर तालुक्यातील नीरा ते बारामती तालुक्यातील मोरगाव दरम्यानची नगर- सातारा मार्गावरील वाहतूक बांधकाम विभागाने बंद केली आहे . त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळण्यात आली असून पुढील सात दिवस हा मार्ग बंद राहणार आहे.

    सातारा नगर मार्गावर नीरा मोरगाव दरम्यानची वाहतूक बारामती बांधकाम विभागाच्या वतीने बंद करण्यात आली आहे. या मार्गावर गुळूंचे ते कर्नलवाडी दरम्यान असलेल्या रस्त्याच्या कामासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.. आजपासून सात दिवस म्हणजेच 23 मार्च ते 27 मार्च दरम्यान हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.. याबाबतची माहिती बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.... त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा म्हणजेच नीरा-जेजुरी-मोरगाव या मार्गाचा वापर करावा असं आवाहन बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले आहे ते बेंगलोर हून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी पुणे बेंगलोर मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tuesday, March 21, 2023

कर्जत येथे मराठी पत्रकार परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

 कर्जत येथे मराठी पत्रकार परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्नसरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख यांचे उपस्थितीचे आवाहन



कर्जत (अहमदनगर)- मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा मेळावा आणि आदर्श तालुका, जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा अहमद नगर जिल्ह्यातील कर्जत येथे ७ एप्रिल २०२३ रोजी होत आहे.. या मेळाव्याच्या दिवशीच म्हणजे ७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता मराठी पत्रकार परिषदेची बैठक होणार आहे.. बैठकीस अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, सर्व उपाध्यक्ष, सर्व संघटक, विभागीय सचिव, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच डिजिटल मिडिया परिषदेचे पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, राज्य प्रसिध्दीप्रमूख यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.. कृपया नोंद घेऊन नियोजन करावे. या बैठकीस मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभणार आहे. सर्व विभागीय सचिवांनी परिषदेच्या सभासद नोंदणी व वर्गणीसह आपल्या भागातील जिल्ह्यांचा आढावा सादर करणे आवश्यक आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन परिषदेचे सरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी केले आहे.


Monday, March 20, 2023

हुर्रे संप मिटला!!! मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप घेतला मागे.....!

 हुर्रे संप मिटला!!!  मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप घेतला मागे.....!



मुंबई दि.२०


            राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांना दिलेल्या  लेखी आश्वासन नंतर राज्यात मागील सात दिवसापासून सुरू असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. राज्यातील जनतेसाठी ही खरतर आनंदाची बातमी आहे.कारण या संपामुळे सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता 

           आज राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथर शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांना लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे गेले सात दिवस सुरू असणारा संप मागे मागे घेण्यात आला आहे,याबाबतची धोषणा  विश्वास काटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन लागू करण्यासंदर्भात सहकार्य करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी समितीला सहकार्य करावे असं आवाहन केलं होतं. त्याचबरोबर सरकारने याबाबत लेखी आश्वासन सुद्धा दिला आहे त्यामुळे हा संप मागे घेण्यात आल्याचे काटकर यांनी सांगितले त्यामुळे आता उद्यापासून सर्व कर्मचारी कामावर येतील आणि जनतेची कामे पुन्हा सुरू होतील अशी आशा आता जनतेला लागली आहे. उद्यापासून सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचे आवाहन विश्वास काटकर यांनी केले आहे.

    सात दिवस चाललेल्या संपाचा कालावधी हा अर्जित रजेत वर्ग केला जाणारा असून तो कालावधी नियमित केला जाणार आहे.  तसेच संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या नोटिसा मागे घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

Sunday, March 19, 2023

पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे : एस.एम.देशमुख

 पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे


प्रसिद्धी प्रमुखाच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन



मुंबई -चळवळीच्या माध्यमातून आपण पत्रकारांचे अनेक प्रश्न सोडविले. उर्वरीत प्रश्नांसाठी आपला संघर्ष सुरु आहे. पत्रकारांना न्याय हक्क मिळवून देणे हे आपले ध्येय आहे. पत्रकारांचे संघटन म्हणून आपण आज मराठी पत्रसृष्टीत प्रथम क्रमांकावर आहोत. बड्या वृत्तपत्रांचे धनदांडगे मालक व सरकार आपल्या विरोधात आहे, आपल्या संघटनेला चहुबाजुंनी कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, आपले फळांचे झाड आहे, त्या झाडाला बहर येऊ द्यायचा की वांझोटे ठेवायचे? याचा गंभिरपणे विचार करावा. पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून परिषदेच्या प्रसिद्धी विभागाने अधिक जागृत राहून परिषद करीत असलेले विधायक काम सक्षमपणे लोकांपर्यंत पोहचविले पाहिजे’’ असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एम. देशमुख यांनी काल रात्री राज्यातील जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत मार्गदर्शन करतांना केले


एस.एम. देशमुख पुढे म्हणाले, ‘‘विरोधकांच्या अपप्रचाराकडे लक्ष न देता आपले विधायक काम करीत राहणे हेच त्यांना चोख उत्तर आहे. परिषद पत्रकारांच्या हक्कासाठी ज्या जोमाने काम करते त्या प्रमाणात आपण प्रसिद्धी करण्यात कमी पडतो अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. परिषदेची चळवळ वाढावी म्हणून प्रत्येकाने रोज कमीत कमी परिषदेच्या कामासाठी दहा मिनिटे वेळ द्यावा व येत्या 7 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे होणाऱ्या आदर्श तालुका, जिल्हा पुरस्कार वितरण सोहळा मेळावा ताकदीने यशस्वी करण्याचे यावेळी एसेम देशमुख यांनी आवाहन केले.


मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, राज्यातील पत्रकारांना हक्क मिळवून देत चळवळ पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. राज्यातील पत्रकार प्रमुख संघटना म्हणून आपल्याकडे, परिषदेकडे पाहतात. पत्रकारांचे नेतृत्व करण्यात आपली संघटना राज्यात आघाडीवर आहे, संवाद ठेवा, काम करा, ठसा उमटवा, कामाची पद्धत बदलली तर नक्कीच परिषदेचे काम अजून जोमाने वाढू शकते. चळवळीतून पत्रकाराचे अनेक प्रश्न सोडविले, याचा आपल्याला अभिमान आहेच, उर्वरीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहू या असेही आवाहन किरण नाईक यांनी केले.


दोन तास चाललेल्या या ऑनलाईन बैठक़ीचे सूत्रसंचलन परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केले होते. बैठक़ीस राज्यभरातून तीसहून अधिक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व पदाधिकारी यांनी आपला सहभाग नोंदवून संघटना वाढीबाबत चर्चेत आपला सहभाग नोंदविला व अधिक सक्रीय होण्याची हमी दिली.


या ऑनलाईन बैठकीत परिषदेचे सरचिटणीस हाजी मन्सूरभाई शेख, महिला आघाडीच्या राज्य संघटक शोभाताई जयपूरकर, उपाध्यक्ष जान्हवीताई पाटील, उपाध्यक्ष शिवराज काटकर, उपाध्यक्ष गो.पि. लांडगे, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन, राज्य डिजिटल मिडीया प्रमुख अनिल वाघमारे, किशोर महाजन, बाळासाहेब ढसाळ, अमोल वैद्य, नारायण माने, मोहन चौकेदार, किशोर महाजन, भरत निगडे, संजय हंगे, राम साळुंके, संदीप कुळकर्णी, सुभाष राऊत, कमलेश ठाकूर, राजाभाऊ अदाते, विजय होलम, दिपक केतके, सुरेश नाईकवाडे, आदी उपस्थित होते.


 


****

बापरे ! पुरंदरच्या या पट्ट्यान बारामतीत जाऊन पावरांपुढे थोपटले दंड

  बापरे ! पुरंदरच्या या पट्ट्यान बारामतीत जाऊन पावरांपुढे थोपटले दंड 

  विजय शिवतारे यांचे शरद पवार उद्धव ठाकरे यांना दम असेल तर लढण्याचे आव्हान    












अमृतपालसिंगचा शोध आज तिसऱ्या दिवशीही सुरूच

 अमृतपालसिंगचा शोध आज तिसऱ्या दिवशीही सुरूच 



नवी दिल्ली दि १९



     पंजाबमध्ये खलिस्तान समर्थक अमृतपालसिंगचा शोध आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. पंजाब पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी राज्यात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे.


शनिवारी 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल याला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो पोलिसांच्या हातून निसटण्यात यशस्वी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता एक नवीन एफआयआर दाखल केला आहे.


पोलिसांनी पहिल्यांदा २३ फेब्रुवारी रोजी अजनालाप्रकरणी अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी शनिवारी त्याच्या सात सहकाऱ्यांना जालंधरच्या मेहतपूरजवळ ताब्यात घेतलं. त्या सात जणांना आता २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.


अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. अवैधरितीने शस्त्र बाळगल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद झाला. अमृतसर (ग्रामीण)चे वरिष्ठ पोलिस अधीक्षक सतिंदर सिंह यांनी सांगितलं की, अमृतपालचे सात सहकाऱ्यांना शस्त्र अधिनियमातील तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे.


एसएसपी यांनी सांगितलं की, आम्ही काल रात्री शस्त्र अधिनियमांतर्गत एक नवीन एफआयआर दाखल केला. यामध्ये अमृतपाल मुख्य आरोपी आहे. शनिवारी अमृतपालच्या ७८ सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र अमृतपाल अजूनही फरार आहे. सलग तिसऱ्या दिवशी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


दरम्यान, अमृतपालचे वडील तरसेम सिंग यांना अमृतपाल संदर्भात विचारले असता, त्यांना त्यांचा मुलगा कुठे आहे हे माहिती नसल्याचे स्पष्ट सांगितलं. तसेच, मला स्वतः अमृतपालबद्दल काही योग्य माहिती मिळवायची आहे. पोलिसांनी त्यांच्या घरात ३ ते ४ तास शोधमोहीम राबवल्याचे त्यांनी सांगितले.


अमृतपालच्या अटकेची माहिती शनिवारी दुपारी आली, मात्र पोलिसांनी रात्री उशिरा काढलेल्या अधिकृत प्रेस स्टेटमेंटमध्ये तो फरार असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी 'वारीस पंजाब दे' संघटनेशी संबंधित 78 जणांना अटक केली आहे.

पंजाब सरकारकडून एक निवेदन देण्यात आलं आहे. 


इंटरनेट सेवा ही केल्या बंद 


सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने, पंजाबच्या प्रादेशिक कार्यक्षेत्रात सर्व मोबाइल इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा (बँकिंग आणि मोबाईल रिचार्ज वगळता) आणि व्हॉईस कॉल वगळता मोबाइल नेटवर्कवर प्रदान केल्या जाणाऱ्या सर्व डोंगल सेवा १८ मार्च ते १९ मार्च पर्यंत बंद केल्या आहेत.

Saturday, March 18, 2023

फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का ? शिरसाटांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल

 फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का ?

शिरसाटांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल

  


 मुंबई दि १८


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युतीच्या जागा वाटपबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून भाजप- शिंदे गटात नव्या वादाला तोंड फुटताना पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त ४८ जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत असून, आमदार संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहे. फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का? असा खोचक टोला शिरसाट यांनी बावनकुळेंना लगावला आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही दम नाही. बावनकुळे यांना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. कोणी दिले त्यांना अधिकार...अशाप्रकारे वक्तव्य केल्याने युतीमध्ये बे-बनाव येतोय, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. आम्ही काही मूर्ख आहोत का? फक्त ४८ जागा लढवण्यासाठी, याच्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल आणि तिथे काय तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे त्यांना तो निर्णय जाहीर करु द्यावा. बावनकुळे यांना अधिकार कोणी दिला आहे? अशामुळे पक्षाच्या कार्यकत्यांमध्ये चलबिचल होत असते. बावनकुळे यांनी अतिउत्साहाच्या भरात असे विधान केले आहे. त्यांना वाटत आहे की, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्याने माझ्या नेतृत्वाखाली जास्त जागा यायला पाहिजे. पण आपल्या अशा वक्तव्यामुळे सहकारी पक्षाला त्रास होतो. त्यामुळे आपल्या अधिकारात जेवढे आहे तेवढच बोलले पाहिजे.


मुंबईमध्ये जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी बोलताना केलेल्या वक्तव्यावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये नवीन वाद पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केले होते. विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढवणार तर ४८ जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला देणार असल्याचं बावनकुळे म्हणाले होते. बावनकुळेंच्या याच वक्तव्यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत प्रत्युत्तर दिले आहे. तर दुसरीकडे बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्याचे विपर्यास करण्यात आल्याचं म्हटले आहे.

गुरोळीच्या उपसरपंचपदी संदीप खेडेकर

 गुरोळीच्या उपसरपंचपदी संदीप खेडेकर



सासवड :


गुरोळीच्या (ता. पुरंदर) उपसरपंच पदी संदीप खेडेकर यांची एकमताने निवड झाली. ग्रामपंचायतच्या विशेष निवडणूक सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच मोहिनी मस्कु खेडेकर या होत्या .तसेच सहाय्यक म्हणून ग्रामसेविका अनिता भोस यांनी काम पाहिले गावची सार्वत्रिक निवडणूक दोन वर्षांपूर्वी झाली होती . सत्ताधारी गटांत ठरल्याप्रमाणे मधुकर खेडेकर यांनी राजीनामा दिला . त्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती . त्या जागे करीता संदीप खेडेकर यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली . खेडेकर हे राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांचे खाजगी सचिव प्रशांत खेडेकर यांचे बंधू होत. पुरंदरचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे नूतन उपसरपंच खेडेकर हे समर्थक आहेत .यावेळी कार्यक्रमास गुरोळीचे माजी सरपंच हिरामण खेडेकर, माजी उपसरपंच मधुकर खेडेकर, सदस्य जीवन खेडेकर, रेणुका खेडेकर, सुरेश भोसले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. 

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जेडणाऱ्या रेल्वे मार्गाची खा.सुप्रिया सुळे यांची मागणी

 पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जेडणाऱ्या रेल्वे मार्गाची खा.सुप्रिया सुळे यांची मागणी 

सर्व्हे करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांना लिहिले पत्र



भोर : दि.१८

         बेलसर-वाल्हा-लोणंद पासून भोर तालुक्यातून महाड जवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. तसे सर्वेक्षण करुन याबाबत निर्णय घ्यावा, असा एक मोठी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार कडे केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, मागणी केली आहे.


पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग सध्या नाही. इतकेच नाही, तर कोकणातील विविध बंदरे आणि सागरी मार्गांवरील मालवाहतूक करण्यासाठी राज्याच्या पूर्व भागाला जोडणारा समर्पित असा रेल्वेमार्गही कोणता नाही. हे पाहता लोणंद पासून भोर मार्गे महाड मध्ये रेल्वे मार्ग झाल्यास या रेल्वेमार्गाचा पश्चिम महाराष्ट्रातील माल आणि प्रवासी वाहतूकीसाठी खूप मोठा फायदा होईल, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. शिवाय ही वाहतूक आर्थिक दृष्ट्याही स्वस्त होईल, असे त्यांनी म्हटले आहे.


बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. याचा परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी मोठा फायदा होणार असून यासाठी येथील दळणवळण व्यवस्था मजबूत आणि लोकांच्या सोयीची असणे आवश्यक आहे. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा रेल्वेमार्ग असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.


असा मार्ग झाला तर पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी हे तालुके, खडकवासला विधानसभा मतदार संघ तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, वाई, माण आदी भागाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागाच्या औद्योगिक आणि इतर विकासाला चालना मिळू शकेल. हा मार्ग पुणे - मिरज - बंगळूर या मार्गाला देखील जोडता येईल. हा मार्ग अतिशय कमी अंतराचा असून तो जनतेच्या सोयीचा आहे. त्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण करुन याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.



रणजीत शिवतरे (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे,)


 "दि 11 मार्च 2023 रोजी महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे मागणी केली असता, आज आदरणीय ताईंनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे नवीन लोहमार्ग ची मागणी केली, यामुळे भोर-वेल्हा तालुक्याच्या सर्वांगीन विकासाला अधिकची चालना मिळेल.”



मोठ्या पगाराची नोकरी तरी आनंद मिळेना ; २७ वर्षांच्या तरुणान संपवलं जीवन

 PUNE BREAKING!!!!! मोठ्या पगाराची नोकरी तरी आनंद मिळेना ; २७ वर्षांच्या तरुणान संपवलं जीवन 



  पुणे दि १८

             पुण्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची नोकरी असूनही मला आनंद मिळतं नाही, म्हणून एका तरुणाने इमारतीच्या  ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंडवडमधील चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आज सकाळी आठ वाजता दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे.


विरेन जाधव असं आत्महत्या केलेल्या २७ वर्षाच्या अभियंता तरुणाचे नाव आहे. वीरेन जाधव हा टाटा मोटर्समध्ये इंजिनियर ह्या पदावर कार्यरत होता. मूळचा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेला विरेन जाधव हा चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आपल्या आईसोबत सध्या राहत होता. वीरेन जाधव याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या नोटबुक मध्ये आपल्या आत्महत्या करण्याबद्दलचे कारण लिहून ठेवला आहे.


मला चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी आहेत तरी मला आनंद मिळत नाही, असं लिहून वीरेन जाधव यांनी आपलं जीवन संपवला आहे.विरेन जाधव यांच्या मृत्यू संदर्भात सध्या चिखली पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीरेन जाधव हा मानसिक दृष्ट्या थोडा अस्वस्थ असावा, त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्यासारखा टोकाचा पाऊल उचलला असावा, अशी प्राथमिक माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे.

Friday, March 17, 2023

नायगाव सोसायटीच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न

 नायगाव सोसायटीच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न



नायगाव दि.१७

पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील नायगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित नायगाव या सोसायटीच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम नुकताच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ प्रा दिगंबर दुर्गाडे,आमदार संजय जगताप,माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले सोसायटीच्या इमारती साठी कर्ज उपलब्ध करून देऊ.नाबार्डच्या माध्यमातून काही योजना राबवू जेणे करून सोसायटीवर त्याचा बोजा पडणार नाही.पात्र शेतकऱ्यांना जे अनुदान मिळायचे आहे ते लवकरच मिळेल.शेतकऱ्यांना मिळणारी ६ टक्के व्याज रक्कम ह्या मध्ये केंद्र सरकार ३ टक्के व राज्य सरकार ३ टक्के आशी मिळते परंतु केंद्र सरकारचे ३ टक्के रक्कम न मिळाल्यामुळे राज्य सरकारची ३ टक्के रक्कम देणे बाकी आहे.तीही लवकर मिळेल.प्रत्येक तलावा पर्यंत पाईपलाइन आणणार आहे.नायगाव मधील राहिलेली कामे लवकरच पूर्ण करू.


यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ प्रा दिगंबर दुर्गाडे म्हणाले गुगल पे,फोन पे सुविधा लवकरच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देणार आहे.मोबाईल ए टी एम गाडी फिरणार आहे.शिक्षणासाठी अतिशय कमी दरात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज देते.हा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. इतरही कर्ज योग्य दरात दिली जातात.

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा साहेब,ताई,दादा यांचा आग्रह असतो.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेणार आहे.

यावेळी नायगाव सोसायटीचे अध्यक्ष संदिप खेसे,सिद्धेश्वर सोसायटीचे अध्यक्ष दादा चौंडकर,सरपंच बाळासाहेब कड,नायगाव सोसायटीचे संचालक विलास खेसे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रदीप पोमण,सुनीता कोलते,गणेश जगताप,माऊली यादव,संभाजी काळाणे, देविदास नाझीरकर,विकास इंदलकर, जयेश गद्रे,मंगेश घोणे, संतोष गिरमे,संभाजी जगताप,धनंजय निरगुडे, बापू मुळीक तसेच सोसायटीचे संचालक,

 गावातील पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन नायगावचे माजी सरपंच हरिदास खेसे यांनी केले.


सरपंचाच्या आश्वासनानंतर मुस्लिम बांधवांचे उपोषण घेण्यात आले मागे

 सरपंचाच्या आश्वासनानंतर मुस्लिम बांधवांचे उपोषण घेण्यात आले मागे




नीरा दि.१७


   नीरा (ता.पुरंदर) येथील मुस्लिम दफन भूमीमध्ये सोडण्यात आलेले सांडपाणी थांबवण्याच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांकडून नीरा ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषण सुरू करण्यात आलं होते. मात्र निरेच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी याबाबत तातडीने उपाय योजना करण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

नीरा येथील तरुण अन्वर सादिक शेख आणि अकबर सय्यद हे उपोषणास बसले होते तर त्यांना मुस्लिम समाजाकडून पाठिंबा देण्यात आला होता. 


  नीरा येथील पुणे पंढरपूर मार्गालगत वार्ड नंबर 2 मध्ये मुस्लीम समाजाची दफन भूमी आहे.या दफन भूमीच्या आसपास आता अनेक निवासी बांधकामे झाली आहेत.त्या भागातील सांडपाणी दफन भूमीतील कबरित जात आहे.आणि त्या ठिकाणी चिखल होत आहे.मुस्लिम समाजाकडून ग्रामपंचायतीला या बाबत अनेक वेळा कळवण्यात आले. मात्र ग्रामपंचायतीकडून याबाबत दखल घेण्यात आली नाही.त्यानंतर आज दि.१७ रोजी मुस्लिम ग्रामस्थांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांनी तातडीने दफन भूमीच्या भागात जाऊन पाहणी केली व तेथील नागरिकांना सांडपाणी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. त्याच बरोबर ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर सरपंच काकडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांना महिना भारत त्या भागातील सर्व सांडपाणी व्यवस्थापन करण्याचे आश्वासन दिले. त्याच बरोबर उपोषण माघारी घेण्याची विनंती केली. यानंतर उपोषणकर्त्यांनी हे उपोषण दुपारी माघारी घेतले. या वेळी सरपंच तेजश्री काकडे,उपसरपंच राजेश काकडे ,ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव, राधा माने, माजी उपसरपंच विजय शिंदे,कल्याण जेधे, चांद पठान, सुदाम बंडगर,टिके जगताप ,सीकांदर शेख ,जलील काजी,अशपाक शेख,जावेद शेख,रफिक सय्यद,आयुब मुलांनी, हजी सदृद्दिन शेख,मुन्ना डांगे,दादा गायकवाड, यांच्या सह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी

राज्यातील  महिलांसाठी आनंदाची बातमी 


एसटीचे 50 टक्के सवलतीची तिकीट योजना महिलांसाठी आजपासून सुरू



    नीरा दि.१६


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी एसटीच्या प्रवासामध्ये 50 टक्के सवलतीच्या दरात प्रवास तिकीट देण्याची घोषणा केली होती .या घोषणाची अंमलबजावणी आज दिनांक 17 मार्च पासून सुरू करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतो आहे. त्यामुळे आता महिलांचा प्रवासाचा खर्च कमी होणार आहे.



     पुरंदर तालुक्यातील नीरा एसटी स्थानकावर आज निरा येथील प्रवासी महिलांनी एकमेकींना पेढे भरून ही योजना सुरू झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. यावेळी निरा येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या राधा माने यांच्या सह अनेक प्रवासी महिला व भाजपच्या महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी एकमेकांना पेढे भरून शिंदे सरकारचे आभार मानले व शिंदे सरकारचं धोरण महिलांसाठी चांगला असल्याचे म्हटले आहे 

Wednesday, March 15, 2023

स्री पुरुषाने सहमतीने एकत्र रहाणे म्हणजे शारीरिक संबंधांना परवानगी नव्हे. उच्च न्यायालयाचा निर्वाळा

  स्री पुरुषाने सहमतीने एकत्र रहाणे म्हणजे शारीरिक संबंधांना परवानगी नव्हे. उच्च न्यायालयाचा निर्वाळा 



मुंबई दि.१५

 

एखादी महिला तिच्‍या सहमतीने पुरुषाबरोबर राहण्‍यास आली तर त्‍याचा अर्थ तिने शारीरिक संबंधांना परवानगी दिली, असा होत नाही. एखाद्या महिलेने सहवासात राहण्‍यास संमती देणे आणि शारीरिक संबंधांना परवानगी देणे, या दोन वेगवेगळ्या गोष्‍टी आहेत.


त्‍यामुळे सहवासात राहण्‍यात आली म्‍हणून महिलेची लैंगिक संबंधास परवानगी आहे, असा अर्थ पुरुष काढतो याला आधार नाही, असे स्‍पष्‍ट करत दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने झेक रिपब्लिक येथील बलात्‍कार प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.


झेक रिपब्लिक येथील आरोपीने १२ ऑक्‍टोबर २०१९ रोजी दिल्‍लीतील एका वसतिगृहात आपल्‍याच देशातील महिलेचा विनयभंग केला. यानंतर ३१ जानेवारी २०२० रोजी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज आणि ७ फेब्रुवारी २०२० रोजी बिहारमधील गया येथील हॉटेलवर महिलेवर बलात्‍कार केला, असा आरोप झेक रिपब्लिक येथील नागरिकावर होता.


आरोपीची जामिनासाठी उच्‍च न्‍यायालयात धाव


या प्रकरणी ६ मार्च २०२२ रोजी दिल्‍लीत गुन्‍हा दाखल झाला. पीडित महिलेने फिर्यादीत म्‍हटले होते की, तिच्‍या पतीचे ८ ऑगस्‍ट २०१९ रोजी निधन झाले. यानंतर आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेतला. आपण आध्‍यात्‍मिक गुरु असल्‍याचे भासवून पती निधनानंतरच्‍या धार्मिक विधी करण्‍यास मदत करण्‍याचे आश्‍वासन दिले. यानंतर प्रयागराज आणि गया येथे नेवून पीडित महिलेवर बलात्‍कार केला. या प्रकरणी दिल्‍ली पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्‍याने दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती.


पीडित महिलेची फसवणूक झाल्‍याचे उघड


जामीन याचिकेवर न्‍यायमूर्ती अनुप भंभानी यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्‍यायामूर्तींनी स्‍पष्‍ट केले की, आरोपी हा विदेशी नागरिक आहे. त्‍याला हिंदू संस्‍कार आणि धार्मिक विधींची माहितीच नाही. त्‍यामुळे पीडित महिलेची त्‍याने फसवणूक केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.


    महिलेने सहवासात राहण्‍यास संमती देणे आणि लैंगिक संबंधांना संमती देणे या दोन वेगवेगळ्या गोष्‍टी आहेत. त्‍यामुळे सहवासात राहण्‍यात आली म्‍हणून र्लैंगिक संबंध ठेवण्‍याची परवानगी मिळाली, असा अर्थ पुरुष काढतो याला आधार नाही, असे स्‍पष्‍ट करत फिर्यादी आणि मुख्य साक्षीदारांना आरोपीने धमकावण्याचा किंवा प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, हे नाकारता येत नाही, असे स्‍पष्‍ट करत फिर्यादीसह साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाल्यानंतर सत्र न्‍यायालयासमोर नव्याने जामीन अर्ज करण्याची परवानगी मागणारी आरोपीची याचिका न्‍यायमूर्ती अनुप भंभानी यांच्‍या खंडपीठाने फेटाळून लावली.



Tuesday, March 14, 2023

सरकारकडून मेस्मा कायद्याला विनाचर्चा मंजुरी संपकऱ्यांची डोके दुखी वाढली

 सरकारकडून मेस्मा कायद्याला विनाचर्चा मंजुरी 

        संपकऱ्यांची डोके दुखी वाढली 





   मुंबई दि.१५ 


जून्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्वच शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाने मंगळवारी पहिल्या दिवशी राज्यातील कारभार ठप्प झाला.यानंतर मुदत संपलेला मेस्मा कायदा पुन्हा संमत करण्यात आला असून आता या कायद्यांतर्गत सरकार कर्मचाऱ्यांवर कारवाई बडगा उगरण्यात येणार आहे.

संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात मंगळवारी अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) घाईत मंजूर केला. संप करणाऱ्यांना ताक्ताळ अटक करण्याची तरतुद करण्यात आली आहे.

  याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च 2018 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू असलेला मेस्मा कायदा 28 फेब्रुवारी 2023 रोजी संपला होता. त्यामुळे 28 फेब्रुवारीनंतर राज्यात मेमसा कायदा अस्तित्वात नव्हता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने हा कायदा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काल हे विधेयक दोन्ही सभागृहात मांडून चर्चेविना मंजूर करण्यात आले.



हा कायदा मंजूर केल्याने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. संप करणाऱ्यांना ताक्ताळ अटक करण्याची व दोषी आढळल्यास सहा महिने कारावासाची तरतुद या कायद्यात करण्यात आली आहे.


मेस्मा कायदा काय असतो?


मेस्मा हा कायदा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असतो. 1968 मध्ये असा कायदा केंद्राने आणला, आणि महाराष्ट्राने 2017 मध्ये. बस सेवा, शिक्षण, आरोग्य सेवा अशा अत्यावश्यक सेवा देण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जर या सेवा थांबवल्या किंवा मोर्चा, आंदोलनांमुळे जर या सेवा विस्कळीत झाल्या, तर त्यावर कारवाई म्हणून मेस्मा कायदा लावण्यात येतो.


6 आठवड्यांपासून ते 6 महिन्यांपर्यंत हा कायदा लागू होतो. आणि हा कायदा लागू केल्यानंतरही जर संप, आंदोलनं, मोर्चे सुरूच राहिले, तर विना वॉरंट आंदोलनकर्त्यांना यंत्रणा अटक करू शकतात. तुरूंगवास आणि दंडात्मक रक्कम भरण्याची तरतूद या कायद्यात आहे.


याआधीही मेस्मा कायदा लागू करण्यात आला आहे. 2018 मध्ये फडणवीस सरकारने अंगणवाडी सेविकांवर मेस्मा कायदा लागू केलेला. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीने विधिमंडळाचं कामकाज बंद पाडलं होतं, इतकंच नाही तर सत्तेत सोबत असलेल्या शिवसेनेनंही त्याला विरोध केलेला. 


विधानसभेत आक्रमक झालेले शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंडही पळवला होता. या प्रकरणावरुन सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता.


अत्यंत कमी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अत्यावश्यक सेवेखाली मेस्मा लावायचाच असेल तर त्यांनाही इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन द्या, अशी मागणी शिवसेनेसह विरोधकांची होती. अखेर ही कारवाई मागे घेण्यात आल्याचं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत घोषित केलं.



वाल्हे येथे रेल्वे खाली येवून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

 वाल्हे येथे रेल्वे खाली येवून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू




  नीरा दि.१४


  पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील रेल्वे स्टेशन नजीक एका अज्ञात व्यक्तीचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांना या व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. यानंतर रेल्वे पोलीस या ठिकाणी दाखल झाले. असून तो मृतदेह ताब्यात घेण्यात आलाय.


या संदर्भात रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाल्हे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आज सकाळी एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. हा व्यक्ती स्थानिक असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तर या व्यक्तीचे वय  अंदाजे  ६० ते ६५ वर्ष असावे. उंची पाच फूट तीन इंच असून  पांढरा शर्ट आणि पांढरी  प्यांट परिधान केली आहे. या वर्णनाचा  कोणाच्या घरातील व्यक्ती हरवला असल्यास रेल्वे पोलीस तसेच स्थानिक पोलिसांची संपर्क साधण्याचा आवाहन रेल्वे पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.  

Sunday, March 12, 2023

श्रीक्षेञ कानिफनाथ गडावर "रंगपंचमी" साजरी

 श्रीक्षेञ कानिफनाथ गडावर "रंगपंचमी" साजरी



सासवड (प्रतिनिधी) बोपगाव ( ता. पुरंदर ) येथील श्रीक्षेञ कानिफनाथ गडावर फाल्गुन कृष्ण पंचमीला पहाटे मंदिरात ४ ते ६ काकडा, सकाळी ६ते ७ आभिषेक पुजा होऊन श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्ट व समस्त ग्रामस्थाच्या वतीने दुपारी १२ वाजता नाथांची आरती झाली. त्यानंतर १२.३० वा. पारंपारीक वाद्यांच्या गजरात प्रथम देवांच्या अंगावर रंग शिंपण्यांत आला. मंदिराच्या शिखरावरुन भाविकांच्या अंगावर रंगांची शिंपण रंगपंचमी ने यात्रा उत्साहात संपन्न झाली.


         श्रीक्षेञ कानिफनाथ गडावर "रंगपंचमी आनंदोत्सव याञा" पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी झाली. सकाळी ९ वाजता बोपगाव येथून पालखी - काठी वाजत कानिफनाथ मंदिरावर गेली. त्यानंतर औताडवाडी, होळकरवाडी, वडकी, उरुळी देवाची, सासवड, भिवरी, गराडे, चांबळी, येथील मानाच्या शिखर काठ्यांनी रंगपंचमी आनंदोत्सव यात्रेत सहभाग घेतला. पुणे येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळ यांच्यावतीने सर्व भाविक भक्तांना सुगंधी दूध वाटप करण्यात आले. 

    ग्रंथराज ज्ञानेश्वरी व नवनाथ पारायण सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते. दिनांक ३ ते ११ मार्च कथाकार नाथभक्त हारेषजी गिरी महाराज विंचुरकर यांच्या वतीने नवनाथ 

विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर उद्या दि १३ रोजी कनिफनाथ गडावर कुस्त्यांचा जंगी आखाडा साजरा होणार असून या आखाड्यासाठी मल्यानी उपस्थित राहवे आसे आवाहन कमिटी च्या वतीने करण्यात आले.



         नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे, ट्रस्टचे उपाध्यक्ष नामदेव फडतरे, सचिव जयवंत फडतरे, खनिजदार नागेश फरतडे, विश्वस्त शिवाजी जगदाळे, प्रकाश का. फडतरे, शिवाजी फडतरे, आप्पा फरतडे, दिपक फडतरे, संदिप फडतरे, सुनिल फडतरे, नागेश फडतरे, महादेव फडतरे, नितीन फडतरे, नागेश फरतडे, रमेश फडतरे, व्यवस्थापक संतोष गोफणे, आदिसह विविध सेवाभावी मंडळांनी ''रंगपंचमी आनंदोत्सव यात्रा '' यशस्वी होण्यासाठी नियोजन केले.

..............................

          

Saturday, March 11, 2023

नीरा येथे माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल

   नीरा येथे माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल 



  नीरा दि.११


  नीरा ता.पुरंदर येथे माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी जेजुरी पोलिसात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नीरेचे माजी उपसरपंच कुमार मोरे यांनी या बाबतची फिर्याद दिली आहेत तर मारहाणीत ते जखमी झाले असून त्यांच्या पायाला मारलागला आहे.


    माजी उपसरपंच कुमार मोरे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार कुमार मोरे यांनी जनरल स्टोअरचे दुकान चालवण्यासाठी शकुंतला जगताप यांच्याकडून वार्ड नंबर २ मधील सिटी सर्वे नंबर 432 व 433 मध्ये एक गुंठे जागा भाड्याने घेतली होती या ठिकाणी त्यांनी दुकानासाठी १० x १० ची टपरी टाकली होती. मात्र ही टपरी नितीन नितीन कांतीलाल बोरा यांच्या दुकानाच्या पुढील बाजूचे असल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला दिनांक ९ मार्च 2023 रोजी सकाळी साडेआठ वाजलेच्या सुमारास मोरे हे त्यांचे दुकान उघडण्यासाठी गेले असता नितीन कांतीलाल बोरा यांनी मोरे यांना जातीवाचक शिवीगाळ केली.त्याच बरोबर हातात गज घेऊन मोरे यांना मारहाण केली. त्याचवेळी बोरा यांचा भाऊ डॉ. दिलीप बोरा हा देखील हातात काठी घेऊन आला. त्याने सुद्धा मोरे यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यांच्या अंगावर धावून गेला. यानंतर मीना दिलीप बोरा यादेखील तेथे आल्या. त्यांनी मोरे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. अशा प्रकारची फिर्याद मोरे यांनी जेजुरी पोलिसात दिली आहे. हा प्रकार नीरेच्या भर पेठेत सुरू होता. त्यामुळे त्या ठिकाणी बघायची मोठी गर्दी जमली होती. या घटनेचे अनेकांनी व्हिडिओ चित्रणही केले.यानंतर दिनांक १० मार्च २०२३ रोजी रात्री उशिरा याबाबतची फिर्याद जेजुरी पोलिसात दाखल करण्यात आले आहे. याबाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस करत आहेत


    

Friday, March 10, 2023

नीरा येथे मोटरसायकल कंटेनरच्या अपघातात एकाचा मृत्यू

 नीरा येथे मोटरसायकल कंटेनरच्या अपघातात एकाचा मृत्यू

कंटेनरच्या चाकाखाली डोक चिरडल्याने झाला जागेवरच मृत्यू



    नीरा १०

         नीरा (ता.पुरंदर)येथे असलेल्या नीरा नदीच्या पुलावर झालेल्या कंटेनर आणि मोटारसायकलच्या अपघातात पाडेगाव येथील एकाचा मृत्यू झालाय.. मोटासायकलस्वार कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झालाय..अशोक रघुनाथ भोसले अस या मृत व्यक्तीचं नाव आहे...


    याबाबत प्रत्यक्ष द्रशी लोकांनी दिलेल्या माहिती नुसार पाडेगाव येथील आंबेडकर सोसायटी येथील राहणारे अशोक रघुनाथ भोसलेहे नीराकडे येत होते त्यावेळी लोणंद कडून एक कंटेनर येत होता.कंटेनर मोटार सायकल ला ओव्हर टेक करीत असताना मोटार सायकलला धक्का लागला त्यामुळे त्यांची मोटरसायकल पडली यावेळी भोसले देखील खाली पडले त्यांचे डोके कंटेनर च्या चाकाखाली गेले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला .. लोणंद पोलिसांनी मृत ताब्यात घेतला असून पुढील तपासणी साठी लोणंद येथे पाठवण्यात आलाय..


       पोलिसांच्या हद्दीच्या वादात मृत देह एक तास रस्त्यावर 


    नीरा नदी ही नीरा शहारा जवळून जात असली तरी या नदीचा बराचसा भाग हा सातारा जील्ह्यात येतो. या पुलावर अपघात झाल्यास पोलिसांमध्ये हद्दिवरून नेहमीच वाद होत असतात.आजही लोणंद पोलीस आणि नीरा पोलिसांचा वाद पाहायला मिळाला. त्यामुळे मृतदेह एक तास रस्त्यावर होता.तर त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता .


Thursday, March 9, 2023

मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्याला घवघवीत यश

 मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्याला घवघवीत यश


अर्थमंत्र्यांकडून पत्रकार कल्याण निधीत 50 कोटीची वाढ

 



मुंबई- मराठी पत्रकार परिषदेने केलेला पाठपुरावा आणि मागणीनुसार स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या ठेवीत आणखी ५० कोटींची वाढ करण्यात आल्याची घोषणा आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतांना केली आहे.. त्यामुळे ठेवीतील रक्कम आता १०० कोटी झाली आहे.. या ठेवीच्या व्याजातून पत्रकार आरोग्य योजना आणि पत्रकार सन्मान योजना चालविल्या जातात..ठेवीतील रक्कम वाढविल्यामुळे पत्रकार सन्मान योजनेचा लाभ आता अधिकाधिक जेष्ठ पत्रकारांना मिळेल अशी अपेक्षा मराठी पत्रकार परिषदेने व्यक्त केली असून अधिक ५० कोटींच्या घोषणेबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने धन्यवाद दिले आहेत.



Saturday, March 4, 2023

आधी मटण खाल्ल,मग देवदर्शन ?

 आधी मटण खाल्ल,मग देवदर्शन ?

येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला ||, शिवतारे यांची खोचक टीका


शिवतारे यांनी फेसबुक पोस्ट करून केली टीका 

शिवतारे यांनी मटणाचा व्हिडिओ आणि दर्शनाचे फोटो केले पोस्ट 

 




बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सासवड येथे नागेश्वर मंदिर आणि संत सोपान काका मंदिरात जाऊन दर्शन घेतले.. त्याच बरोबर त्यांनी मंदिराच्या माहिती घेतली... यानंतर पुरंदरचे माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून टीका केलीय.. सुळे यांनी अगोदर मटन खाल्लं आणि नंतर देवदर्शन घेतलं असं म्हणत त्यांनी फेसबुक वर सुळे यांचा एका हॉटेलमधील मटणाच्या थाळी बद्दल बोलत असतानाचा व्हिडिओ आणि फोटो त्यांनी फेसबुक वर शेअर केलेत..


  शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील देवदर्शनाचे चार फोटो शेअर केले आहेत. तसेच हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यावर कमेंट केली आहे. " आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला ||, अशी खोचक टीका शिवतारे यांनी केलीय.


पवार कुटुंबीय कधीच अंधश्रद्धा पाळत नाहीत : ह.भ. प.साळवे महाराज 
       देव दर्शनासाठी भाव महत्त्वाचे असतात.काय खाल्ले हे महत्वाचे नाही .पांडुरंग तर वारीत बोंबील खणाराला ही पावल्याचे उदाहरण असल्याचे हरिभक्त परायण सुनील महाराज साळवे यांनी न्युज मराठीशी बोलताना म्हटलंय त्यामुळे काय खाऊन देशन घेतले हे फारसे महत्त्वाचे नसल्याचे लोकांकडून बोलला जातंय.तर संतांनी अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलंय.. सुळे या सुद्धा अंधश्रद्धाळू नसल्याचं त्यांनी म्हटलंय.



छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ बालाजी जाधव यांची निवड

 छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ बालाजी जाधव यांची निवड स्वागत अध्यक्षपदी प्रशांत पाटणे निमंत्रकपदी सुनील धिवार व सचिन भोंडे : दशरथ यादव यांची माहिती



सासवड, ता. ४ः राज्य स्तरीय १४ व्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डाॅ बालाजी जाधव यांची निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्षपदी प्रशांत पाटणे यांची निमंत्रकपदी सुनील धिवार व सचिन भोंडे यांची निवड करण्यात आली आहे, उदघाटक म्हणून शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे मुख्यसंयोजक व प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.


 मराठी साहित्य संशोधन परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या वतीने दरवर्षी सासवड (ता.पुरंदर) येथे १२ मार्च रोजी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. संमेलनाचे हे १४ वे वर्षे आहे.



 डॉ जाधव इतिहासाचे अभ्यासक असून त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत, औरंगाबाद येथे पंचफुला प्रकाशन चालवीत आहेत, 


स्वागताध्यक्ष प्रशांत पाटणे पुरंदर प्रतिष्ठान चे अध्यक्ष असून, पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, व्याख्याने, ग्रंथालय चळवळ, विविध उपक्रम ते राबवीत असतात, बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार सामाजिक कार्यक्रमात सहभागी असतात, निमंत्रक  सचिन भोंडे सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत, 


संमेलनाचे अध्यक्ष पदाचा मान यापुर्वी इतिहास संशोधक अँड अनंत दारवटकर, डाँ प्रभाकर ताकवले, प्रा. नामदेवराव जाधव, अ.रा.कदम, प्रा.गंगाधर बनबरे, बाबासाहेब सौदागर, श्रीराम पच्छिंद्रे, शरद गोरे, डॉ जयप्रकाश घुमटकर, डाँ.भा.ल.ठाणगे, गुलाब वाघमोडे यांना मिळाला आहे. 


आचार्य अत्रे सांस्कृतिक नाट्यगृहात संमेलन होणार आहे, सकाळी ११ वाजता ग्रंथपूजन दुपारी १२ वाजता संमेलन उद्घाटन, पुरस्कार वितरण समारंभ होईल, दुपारी २ वाजता साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज या  विषयावर परिसंवाद असून, सायंकाळी ४ वाजता कविसंमेलन आणि समारोप समारंभ होईल, 

संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय जगताप, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजय कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, भारतीय जनता पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे आदी उपस्थित राहणार आहेत, 


संमेलनाचे संयोजन राजाभाऊ जगताप, शामकुमार मेमाणे, नंदकुमार दिवसे, दत्ता भोंगळे, सुनील लोणकर, गंगाराम जाधव, दत्ता कड, संजय सोनवणे, दीपक पवार, विजय तुपे सुरेश वाळेकर आदी करीत आहेत,

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...