राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी
एसटीचे 50 टक्के सवलतीची तिकीट योजना महिलांसाठी आजपासून सुरू
नीरा दि.१६
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी एसटीच्या प्रवासामध्ये 50 टक्के सवलतीच्या दरात प्रवास तिकीट देण्याची घोषणा केली होती .या घोषणाची अंमलबजावणी आज दिनांक 17 मार्च पासून सुरू करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतो आहे. त्यामुळे आता महिलांचा प्रवासाचा खर्च कमी होणार आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा एसटी स्थानकावर आज निरा येथील प्रवासी महिलांनी एकमेकींना पेढे भरून ही योजना सुरू झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. यावेळी निरा येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या राधा माने यांच्या सह अनेक प्रवासी महिला व भाजपच्या महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी एकमेकांना पेढे भरून शिंदे सरकारचे आभार मानले व शिंदे सरकारचं धोरण महिलांसाठी चांगला असल्याचे म्हटले आहे