सरपंचाच्या आश्वासनानंतर मुस्लिम बांधवांचे उपोषण घेण्यात आले मागे
नीरा दि.१७
नीरा (ता.पुरंदर) येथील मुस्लिम दफन भूमीमध्ये सोडण्यात आलेले सांडपाणी थांबवण्याच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांकडून नीरा ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषण सुरू करण्यात आलं होते. मात्र निरेच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी याबाबत तातडीने उपाय योजना करण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.
नीरा येथील तरुण अन्वर सादिक शेख आणि अकबर सय्यद हे उपोषणास बसले होते तर त्यांना मुस्लिम समाजाकडून पाठिंबा देण्यात आला होता.
नीरा येथील पुणे पंढरपूर मार्गालगत वार्ड नंबर 2 मध्ये मुस्लीम समाजाची दफन भूमी आहे.या दफन भूमीच्या आसपास आता अनेक निवासी बांधकामे झाली आहेत.त्या भागातील सांडपाणी दफन भूमीतील कबरित जात आहे.आणि त्या ठिकाणी चिखल होत आहे.मुस्लिम समाजाकडून ग्रामपंचायतीला या बाबत अनेक वेळा कळवण्यात आले. मात्र ग्रामपंचायतीकडून याबाबत दखल घेण्यात आली नाही.त्यानंतर आज दि.१७ रोजी मुस्लिम ग्रामस्थांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांनी तातडीने दफन भूमीच्या भागात जाऊन पाहणी केली व तेथील नागरिकांना सांडपाणी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. त्याच बरोबर ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर सरपंच काकडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांना महिना भारत त्या भागातील सर्व सांडपाणी व्यवस्थापन करण्याचे आश्वासन दिले. त्याच बरोबर उपोषण माघारी घेण्याची विनंती केली. यानंतर उपोषणकर्त्यांनी हे उपोषण दुपारी माघारी घेतले. या वेळी सरपंच तेजश्री काकडे,उपसरपंच राजेश काकडे ,ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव, राधा माने, माजी उपसरपंच विजय शिंदे,कल्याण जेधे, चांद पठान, सुदाम बंडगर,टिके जगताप ,सीकांदर शेख ,जलील काजी,अशपाक शेख,जावेद शेख,रफिक सय्यद,आयुब मुलांनी, हजी सदृद्दिन शेख,मुन्ना डांगे,दादा गायकवाड, यांच्या सह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.