Posts

Showing posts from November, 2025

भाजप नेते रंजनकुमार तावरे यांचे आव्हान — “पैशाचा वापर न करता निवडणूक जिंकून दाखवा”

Image
 माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत विकास आघाडी विरुद्ध अजित पवारांचा सामना भाजप नेते रंजनकुमार तावरे यांचे आव्हान — “पैशाचा वापर न करता निवडणूक जिंकून दाखवा” बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर येथील पहिल्याच निवडणुकीत जोरदार राजकीय लढत रंगणार आहे. भाजप पुरस्कृत विकास आघाडी विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे चित्र आहे. माळेगाव ग्रामपंचायत असताना अनेक वर्षे भाजप नेते रंजनकुमार तावरे यांच्या ताब्यात सत्ता होती. तेव्हाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र असताना देखील तावरे यांनी आपला प्रभाव कायम ठेवला होता. आता नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर १७ प्रभाग आणि एक नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत असून, बारामती तालुक्याच्या राजकीय समीकरणांना नव्या दिशा मिळणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान देत रंजनकुमार तावरे म्हणाले, “पैशाचा वापर न करता निवडणूक जिंकून दाखवा.” तावरे यांनी केले आहे. तर बारामतीचा विकास केला म्हणता माळेगावाचा विकास के...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अ.प) आघाडीवर ; पुरंदर विधानसभा मतदारसंघातील नगरपरिषद, जि.प. व पंचायत समितीच्या ९७ इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती

Image
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अ.प) आघाडीवर ; पुरंदर विधानसभा मतदारसंघातील नगरपरिषद, जि.प. व पंचायत समितीच्या ९७ इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती  पुरंदर :      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आघाडी घेतली आहे. नगरपरिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. युती आघाडी होवो न होवो राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मागणी अर्ज स्वीकारुन ९७ इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेत निवडणूक प्रक्रियेत आघाडी घेतली आहे.       नगरपरिषद, नगरपालिकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तर पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या आरक्षण सोडती झाल्या असून तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील सासवड, जेजुरी, फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात आज सोमवारी झाली आहे. या निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असेल्या उमेदवारांची चाचपणी राष्ट्र...