भाजप नेते रंजनकुमार तावरे यांचे आव्हान — “पैशाचा वापर न करता निवडणूक जिंकून दाखवा”
माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत विकास आघाडी विरुद्ध अजित पवारांचा सामना
भाजप नेते रंजनकुमार तावरे यांचे आव्हान — “पैशाचा वापर न करता निवडणूक जिंकून दाखवा”
बारामती :
बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर येथील पहिल्याच निवडणुकीत जोरदार राजकीय लढत रंगणार आहे. भाजप पुरस्कृत विकास आघाडी विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे चित्र आहे.
माळेगाव ग्रामपंचायत असताना अनेक वर्षे भाजप नेते रंजनकुमार तावरे यांच्या ताब्यात सत्ता होती. तेव्हाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र असताना देखील तावरे यांनी आपला प्रभाव कायम ठेवला होता. आता नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर १७ प्रभाग आणि एक नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत असून, बारामती तालुक्याच्या राजकीय समीकरणांना नव्या दिशा मिळणार आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान देत रंजनकुमार तावरे म्हणाले, “पैशाचा वापर न करता निवडणूक जिंकून दाखवा.” तावरे यांनी केले आहे. तर बारामतीचा विकास केला म्हणता माळेगावाचा विकास केला म्हणता तर निवडणूक विकासाच्या मुद्ध्यावरच लढवा असं आव्हान तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. त्यांच हे आव्हान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. स्थानिक पातळीवर अजित पवारांच्या कार्यशैलीला आणि त्यांच्या गटाला आव्हान देणारे हे विधान मानले जात आहे.
नगरपंचायत निवडणूक केवळ स्थानिक सत्तासंघर्षापुरती मर्यादित न राहता बारामतीच्या राजकीय प्रभावाची दिशा ठरणार आहे. दोन्ही बाजूंकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरू असून, माळेगावात विकास, कामगिरी आणि प्रभाव या तीन मुद्यांवरच मतदारांचे मन वळवण्याची रणनीती आखली जात आहे.
रंजन तावरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भुमिका स्पष्ट केली आहे. त्याच बरोबर पक्षादेश जो असेल तो पाळणार असल्याचे ही म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा दाखला. देतं सन्मानपूर्ण वागणूक मिळणार सेल तर एकत्र लढण्यासाही अनुकूलता दर्शवली आहे.
माळेगाव ग्रामपंचायतीचे पाच वर्षा पूर्वी माळेगाव नगर पंचायत मध्ये रूपांतरण करण्यात आलं . ग्रामपंचायत असताना 17 सदस्य आणि त्यातून सरपंच निवडला जायचा. नगरपंचायत झाल्यावर देखील 17 प्रभागामधून 17 नगरसेवक निवडले जाणार असून एक नगराध्यक्ष असणार आहे. माळेगाव नगरपंचायतीच्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेल आहे. या निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून उद्या संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.


Comments
Post a Comment