Sunday, November 9, 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अ.प) आघाडीवर ; पुरंदर विधानसभा मतदारसंघातील नगरपरिषद, जि.प. व पंचायत समितीच्या ९७ इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अ.प) आघाडीवर ; पुरंदर विधानसभा मतदारसंघातील नगरपरिषद, जि.प. व पंचायत समितीच्या ९७ इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती 



पुरंदर : 

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आघाडी घेतली आहे. नगरपरिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. युती आघाडी होवो न होवो राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मागणी अर्ज स्वीकारुन ९७ इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेत निवडणूक प्रक्रियेत आघाडी घेतली आहे. 


     नगरपरिषद, नगरपालिकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तर पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या आरक्षण सोडती झाल्या असून तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील सासवड, जेजुरी, फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात आज सोमवारी झाली आहे. या निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असेल्या उमेदवारांची चाचपणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून युद्धपातळीवर सुरू झाली आहे. रविवारी (दि.०९) सकाळी सासवड येथे सासवड नगरपरिषदेच्या तसेच वीर-भिवडी व दिवे-गराडे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दुपारी जेजुरी येथे जेजुरी नगरपरिषदेच्या तसेच बेलसर-माळशिरस व नीरा-कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 


      सासवड नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी ४ उमेदवारांच्या, सदस्य पदासाठी २३, जेजुरी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी ९ उमेदवारांच्या, सदस्य पदासाठी ४० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.‌ बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटासाठी ५ बेलसर गणासाठी २, तर माळशिरस गणासाठी ४ उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. नीरा-कोळविहीरे जिल्हा परिषद गटासाठी ३ उमेदवारांच्या नीरा गणातून १ उमेदवाराची, तर कोळविहीरे गणातून ६ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याची माहिती पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष उत्तम धुमाळ यांनी दिली. 


    महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व पुरंदर तालुका निवडणूक निरीक्षक सुरेश घुले यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार संभाजीराव कुंजीर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा दिगंबर दुर्गाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, सनदी अधिकारी संभाजी झेंडे, पुरंदर तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे, सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, संचालक जितेंद्र निगडे, अमित झेंडे, आदिंनी इच्छूक उमेदवारांचे म्हणने ऐकून मुलाखती घेतल्या. 


कोट 

  "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तळागाळातील कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून संधी देण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रत्येक जागेवर निवडून येणारे सक्षम उमेदवार देण्याची तयारी झाली आहे. युती आघाडी होईल तेंव्हा वरिष्ठ निर्णय घेतील. पण कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांनी या निवडणुका राष्ट्रवादीने स्वबळावरच लढवण्याची तयारी केली आहे. 


सुरेश घुले : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष

No comments:

Post a Comment

Featured Post

बाबुर्डी येथे MAHAVISTAR AI अ‍ॅपचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 बाबुर्डी येथे MAHAVISTAR AI अ‍ॅपचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  बारामती :           डिजिटल तंत्रज्ञानाच्या साह...