वीर धरणाच्या सांडव्यातून विक्रमी विसर्ग नीरा नदी धोक्याची पातळीवर : २०२२ सालचा १ लाख क्युसेक्सचा विक्रम मोडतोड का?

वीर धरणाच्या सांडव्यातून विक्रमी विसर्ग नीरा नदी धोक्याची पातळीवर : २०२२ सालचा १ लाख क्युसेक्सचा विक्रम मोडतोड का? पुरंदर : पुणे व सातारा जिल्ह्याची सिमा असलेल्या नीरा नदीवरील वीर धरणात मोठ्याप्रमाणावर पाणी येत असल्याने गेली दोन दिवस मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल शनिवारी सायंकाळी पाच वाजता ६३ हजार २७३ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता. रात्री तो कमी केला. आज रविवारी दिवसभर ३३ हजार ८०९ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता. सायंकाळच्या सुमारास विसर्ग वाढवण्यात आला असुन आता नऊ वाजल्यापासून या हंगामातील विक्रमी ७१ हजार ३४९ क्युसेक्सने सुरू, रात्री पुन्हा विसर्ग वाढला जाऊ शकतो. त्यामुळे आता नीरा नदी धोक्याच्या पातळीवर असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी सकाळी ०६ वाजता २४ हजार ५३५ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता. नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत राहिला परिणामी सकाळी ०७ वाजता नीरा देवधर धरणातून ५ हजार १०५ क्युसेक्सने, भाटघर धरणातून ९ हजार ३३१ क्युसेक्सने तर गुंजवणी धरणातून ७३३ क्युसेक्सने विसर्ग सुरू ...