Friday, August 23, 2024

उद्याचा निरा बंध मागे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी बंदची दिली होती हाक : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद मागे.

 उद्याचा निरा बंध मागे. 


बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी बंदची दिली होती हाक : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद मागे. 




पुरंदर : 

         बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याच अनुषंगाने पुरंदरमधील काँग्रेस, शिवसेना उ.बा.ठा. गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्यावतीने पुरंदर बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद ठेवणे गैर असल्याचे म्हटल्याने निरा ग्रामपंचायतीच्या वतीने बंद न ठेवण्याचे सूचना नीरा ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. 


     उद्या शनिवार दिनांक 24/08/2024 रोजी, बदलापूर येथे जो अत्याचार लहान मुलींवर झाला आहे, त्याचा निषेधार्थ जो बंद पुकारण्यात आला होता, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने तो मागे घेण्यात आला आहे, त्यामुळे उद्या कुठलाही बंद राहणार नाही. याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी. 

आपले नम्र = नीरा शिवतक्रार ग्रामपंचायत 

या बाबत नीरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश काकडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

No comments:

Post a Comment

Featured Post

🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव

 🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव पुणे ग्रामीण | प्रतिनिधी एकतर्फी प्रेमातून निर्मा...