वामन म्हात्रे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल अटक करण्याची मागणी : एस. एम. देशमुख

 वामन म्हात्रे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल 

अटक करण्याची मागणी : एस. एम. देशमुख 




मुंबई : बदलापूर येथील महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी असभ्य, अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल शिंदे गटाचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या विरोधात अँट्ॉसिटी आणि महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मोहिनी जाधव काल दुपारपासून वामन म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करीत होत्या मात्र वामन म्हात्रे यांचे राजकीय संबंध लक्षात घेऊन बदलापूर पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करीत होते. मात्र राज्यभरातील पत्रकारांची संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेऊन पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करणे भाग पडले. आज बुधवारी सायंकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वामन म्हात्रे यांच्यावर खालील कलमे लावण्यात आली आहेत.

भारतीय न्याय संहिता 2023 कलम 74

भारतीय न्याय संहिता 2023 कलम 79

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989

 कलम 3(1) ( व ) (2)

कलम 3(2) (va)

दोन्ही गुन्हे अजामीनपात्र असल्याने पोलिसांनी वामन म्हात्रे यांना लगेच अटक करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.