पुणे जिल्हा पत्रकार संघाची आढावा बैठक उत्साहात
मुळशी तालुका संघ परिषदेशी संलग्न, आरोग्य विषयी मार्गदर्शन, नवनियुक्तांचे सत्कार असे भरगच्च कार्यक्रम.
बारामती :
मराठी पत्रकार परिषद मुंबई संचलित पुणे जिल्हा पत्रकार संघाची बैठक बारामती येथे उत्साहात पारपडली. जिल्हा पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. जिल्हा कार्यकारणी सदस्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तर बारामती तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी योगेश भोसले यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. मुळशी तालुका पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषद व पुणे जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न करण्यात आले. हेल्थ कोच अविनाश (तात्यासाहेब) घाटे यांनी आरोग्य विषय मार्गदर्शन केले.
शुक्रवारी (दि.०९) रोजी पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या बैठकीचे आयोजन बारामती शहरातील नंदन दुध संघाच्या सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे होते. यावेळी पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, राज्य सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, सरचिटणीस सतिश सांगळे, महिला जिल्हाध्यक्षपदी श्रावणी कामत, जिल्हा संघटक अनिल वडघुले, चिराग फुलसुंदर, चिंतामणी क्षिरसागर, रमेश निकाळजे, संतोष म्हस्के, कोषाध्यक्ष प्रा. संतोष काळे, कार्यालयीन चिटणीस जीवन शेंडकर, पुणे जिल्हा सोशल मीडियाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, जिल्हा समन्वयक मारुती बाणेवार, रविंद्र वाळके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन मेदनकर, वरीष्ठ जिल्हा सल्लागार दत्तानाना भोंगळे, जिल्हा निवडणुक निरीक्षक रविंद्र पाटील, जिल्हा कार्यकारीणी सदस्य किरण भदे, ए.टी. माने, अमर गायकवाड, सुनील जाधव, सुनील शिरसाट, महिला उपाध्यक्ष सुनिता कसबे, सचिव छाया नानगूडे, सुजाता गुरव, कार्यकारणी सदस्य वर्षा चव्हाण, पुणे शहर अध्यक्ष बाबा तारे, शिरूरचे अध्यक्ष संजय बारहाते, इंदापूरचे अध्यक्ष राजकुमार थोरात, हवेलीचे अध्यक्ष स्वप्नील कदम, दौंडचे अध्यक्ष नरेंद्र जगताप, पुरंदरचे खजिनदार निलेश भुजबळ यांसह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.
प्रास्ताविकात बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी कार्यमूक्त होण्याची इच्छा व्यक्त करत योगेश भोसले यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकावी अशी सुचेना केल्याने मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी भोसले यांची नियुक्ती जाहीर केली. योगेश भोसले यांची निवड जाहीर होताच बारामती तालुक्यातील पत्रकार संघाचे सदस्य आसिफ शेख व पत्रकार सदस्यांनी भोसले यांना विशेष भेटवस्तू देऊन सत्कार केला.
पत्रकारांना वेळेचे नियोजन करता येत नाही. कोणत्या क्षणी घटना घडत असतात. आशा वेळी तहान भूक विसरुन पत्रकार बातमी कव्हर करताना हाल होत असतात. अवेळी जेवण, झोप तसेच व्यायाम करण्यात टाळाटाळ केली जाते. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे कितेक पत्रकार व्याधीग्रस्त आहेत. अशी वेळ कोणावरही येऊ नये म्हणून परिषद आरोग्य शिबीर आयोजित करते. शुक्रवारी बैठकी आधी हेल्थ कोच अविनाश (तात्यासाहेब) घाटे यांनी आरोग्य विषय मार्गदर्शन केले.
पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या आढावा बैठकीत मुळशी तालुका पत्रकार संघाने मराठी पत्रकार परिषद व पुणे जिल्हा पुणे जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न होण्याची इच्छा तालुका अध्यक्ष विनोद माझीरे व जेष्ठ पत्रकार बंडू दातीर यांनी व्यक्त केली. याला सर्व सदस्यांनी पाठिंबा देत सकारात्मकता दर्शवली. राज्य अध्यक्ष शरद पाबळे विभागीय सचिव गणेश मोकाशी व जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी तात्काळ माझीरे व दातीर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नुकतेच पुणे जिल्हा पत्रकार संघाची नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. यावेळी जिल्हा महिला कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी सुनिता कसबे यांची नियुक्ती झाली होती. शुक्रवारी कसबे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. महिला कार्यकारणी सदस्य म्हणून वर्षा चव्हाण यांना ही नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड सोशल मिडिया अध्यक्षपदी महावीर जाधव यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार परिषदेच्या वतीने करण्यात आला.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत महिला कार्यकारणी सदस्या सुजाता गुरव यांनी स्वागत गीताने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारामती तालुका पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी केले. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे विभागीय सचिव गणेश मोकाशी, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, राज्य सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बारामती तालुका पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष योगेश भोसले यांनी केले तर, आभार पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस सतिश सांगळे यांनी मानले. बारामती तालुका पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था केली होती.