🚨 वीर धरणातून पुन्हा विसर्ग सुरू 🚨
मोठ्याप्रमाणावर विसर्ग वाढवला, नदि काठच्यांना धोक्याचा इशारा.
पुरंदर :
गेली दोन दिवसांत निरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणे पुन्हा ओव्हरफ्लो झाल्याने नदि पात्रात पाणी सोडले ज तर आहे. सोमवारी सायंकाळी ०८.२० वाजल्यापासून निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग २३ हजार ३३५ क्युसेक्स होणार आहे.
आज सोमवारी (दि. १९/०८/२०२४ रोजी) सायंकाळी ०८.२० वाजता वीर धरणाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच भाटघर धरणातून विसर्ग सुरू केला असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाऊस वाढला असून पाण्याची जादा आवक होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दिनांक १९/०८/२०२४ रोजी सायंकाळी ०८.२० वाजता निरा नदीमध्ये वीर धरणाच्या निरा डाव्या कालव्याच्या अतीवाहका द्वारे यापूर्वी १५० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला विसर्ग तसाच ठेवून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे निरा नदीमध्ये २३ हजार १८५ क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. आता निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग २३ हजार ३३५ क्युसेक्स होणार आहे.
पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल.
याद्वारे विनंती करण्यात येते कि, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी. असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
रात्री ०९ वाजल्यापासून निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग ३२ हजार ६०९ क्युसेक्स होणार आहे.
नीरा खोरे - नदीत सोडलेला विसर्ग
दिनांक-19-8-24 (09:00)
भाटघर = 8631 Cusecs
नीरा देवघर = 00 Cusecs
गुंजवणी = 250 Cusecs
--------------------------------
एकुण = 250 Cusecs
-----------------------------------
वीर = 32,609 Cusecs