Type Here to Get Search Results !

🚨 वीर धरणातून मोठ्याप्रमाणावर विसर्ग सुरू 🚨 विसर्ग वाढवल्याने नदि दुथडी वाहतेय, नदी काठच्यांना धोक्याचा इशारा.

 🚨 वीर धरणातून मोठ्याप्रमाणावर विसर्ग सुरू 🚨 


  विसर्ग वाढवल्याने नदि दुथडी वाहतेय, नदी काठच्यांना धोक्याचा इशारा. 




पुरंदर : 

       गेली दोन दिवसांत निरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणे पुन्हा ओव्हरफ्लो झाल्याने नदि पात्रात पाणी सोडले जात आहे. शनिवारी रात्री ०१ वाजल्यापासून निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग १४ हजार २११ क्युसेक्स झाला होता, रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्याने पहाटे पर्यंत तसाच ठेवला होता आता सकाळी १० वाजता पुन्हा विसर्ग वाढवून तो आता १५ हजार २११ क्युसेक्सने सुरू झाला आहे. ११ वाजल्यापासून ३३ हजार ७५९ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. तर प्रसिद्ध दत्तघाटाच्या पायऱ्यांना पाणी लागले आहे.




     नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. निरा देवघर धरणातून ३७५ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता, भाटघर धरणातून १ हजार २३६ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता त्यामुळे वीर धरणाच्या सांडव्यातून रात्री ०१ ते पहाटे ०६ वाजेपर्यंत १४ हजार २११ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता. सकाळी ०८ वाजता वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात ५ हजार ९३७ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. तर सकाळी १० वाजता पुन्हा विसर्ग वाढवून तो आता १५ हजार २११ क्युसेक्सने सुरू झाला आहे. 


      

दिनांक  २४/०८/२०२४, सकाळी १०.०० वा.मि. 


    आज दिनांक २४/०८/२०२४ रोजी वीर धरण १००% भरलेले असून पाणी पातळी मध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.तसेच भाटघर व निरा देवघर धरणातून विद्युत गृहाद्वारे विसर्ग सुरू असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊस पडत आहे.वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दिनांक २४/०८/२०२४ रोजी सकाळी १०.००वाजता निरा नदीमध्ये वीर धरणाच्या निरा डाव्या  कालव्याच्या अतीवाहका द्वारे  ३०० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला विसर्ग तसाच ठेऊन निरा उजव्या कालव्याच्या अतीवाहकाद्वारे १००० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे.वीर धरणाच्या सांडव्याद्वारे १३९११ क्यसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात येत आहे.आता *निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग १५२११क्युसेक्स असणार आहे.

पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल.याद्वारे विनंती करण्यात येते कि,नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी. 


कार्यकारी अभियंता,नीरा उजवा कालवा विभाग,फलटण,जिल्हा सातारा 


*नीरा खोरे - नदीत सोडलेला विसर्ग*

*दिनांक-24-8-24(10:00)*

*भाटघर*=10031 Cusecs

*नीरा देवघर*=750 Cusecs

*गुंजवणी*    =00 Cusecs 

--------------------------------

*एकुण* =10781  Cusecs 

-----------------------------------

*वीर* =15211 Cusecs


*नीरा खोरे - नदीत सोडलेला विसर्ग*

*दिनांक-24-8-24(10:45)*

*भाटघर*=12131 Cusecs

*नीरा देवघर*=750 Cusecs

*गुंजवणी* =00 Cusecs 

--------------------------------

*एकुण* =12881 Cusecs 

-----------------------------------

*वीर* =24485 Cusecs

*नीरा खोरे - नदीत सोडलेला विसर्ग*

*दिनांक-24-8-24(11:15)*

*भाटघर*=12131 Cusecs

*नीरा देवघर*=750 Cusecs

*गुंजवणी* =250 Cusecs 

--------------------------------

*एकुण* =13131 Cusecs 

-----------------------------------

*वीर* =33759 Cusecs


*नीरा खोरे - नदीत सोडलेला विसर्ग*

*दिनांक-24-8-24(13:00)*

*भाटघर*=19131 Cusecs

*नीरा देवघर*=750 Cusecs

*गुंजवणी* =250 Cusecs 

--------------------------------

*एकुण* =20131 Cusecs 

-----------------------------------

*वीर* =43083 Cusecs


*नीरा खोरे - नदीत सोडलेला विसर्ग*

*दिनांक-24-8-24(16:15)*

*भाटघर*=22631 Cusecs

*नीरा देवघर*=750 Cusecs

*गुंजवणी*    =250 Cusecs 

--------------------------------

*एकुण* =23631  Cusecs 

-----------------------------------

*वीर* =55197 Cusecs

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies