Posts

Showing posts from November, 2023

महात्मा फुले उद्योगरत्न पुरस्काराने हॉटेल लोणकरवाडा उद्योग समूह सन्मानित

Image
महात्मा फुले उद्योगरत्न पुरस्काराने हॉटेल लोणकरवाडा उद्योग समूह सन्मानित पुरंदर (प्रतिनिधी) : दि.२९         भिवरी( ता.पुरंदर) येथील सुनील लोणकर, संदिप लोणकर, सुभाष लोणकर, गणेश लोणकर या लोणकर बंधूंच्या हॉटेल लोणकरवाडा उद्योग समूहास खानवडी (ता. पुरंदर) येथे १६ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले मराठी प्रबोधन साहित्य संमेलनात भाजपा नेते बाबाराजे जाधवराव, संमेलनाध्यक्षा डॉ. स्वाती शिंदे- पवार, पुरंदर तालुका भाजपा अध्यक्ष निलेश जगताप, ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांच्या शुभहस्ते हॉटेल लोणकरवाडा उद्योग समूहाचे संचालक संदिप पांडुरंग लोणकर यांना महात्मा फुले उद्योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सन्मान सोहळा वितरण प्रसंगी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, दै. लोकमतचे पत्रकार, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष, हॉटेल लोणकरवाडा संचालक सुनील लोणकर, अजिंक्यतारा पान शॉपचे मालक पंढरीनाथ उर्फ पिंटूशेठ कटके, भैरवनाथ पूजा भांडारचे मालक शिवाजी उर्फ बाबू शेठ कटके आदींसह विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.      सासवड -कोंढवा रस्त्यावरील भिवर...

आम आदमी पार्टीचा 11वा वर्धापन दिन व संविधान दिन सोहळा पुरंदरला उत्साहात साजरा

Image
 आम आदमी पार्टीचा 11वा वर्धापन दिन व संविधान दिन सोहळा पुरंदरला उत्साहात साजरा दि.26 नोव्हेंबर सासवड येथे आप पुरंदर तालुका जनसंपर्क कार्यालयात आम आदमी पक्षाचा 11वा वर्धापन दिन व संविधान दिन आप पुणे जिल्हाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी 26/11 च्या मुंबई येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या वीरांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. दरम्यान भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल देवकाते यांच्या नेतृत्वात करून भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी मनोगत व्यक्त करताना आप युवा प्रदेशअध्यक्ष मयूर दौंडकर यांनी पक्षाचा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना आप हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा एकमेव पक्ष असल्याचे सांगितले. आप पुरंदरचे अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी चालू राजकीय घडामोडींवर भाष्य करताना येणाऱ्या काळात संविधान बचावाचे कार्य आप कार्यकर्ते करणार असल्याचे सांगितले. या वेळी जिल्हा व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घरकुल हे प्रविण जोशींचे पुस्तक क्रांतीची ठिणगी पेटवणारे ठरेल ! आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे

Image
 घरकुल हे प्रविण जोशींचे पुस्तक क्रांतीची ठिणगी पेटवणारे ठरेल ! आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे  नीरा दि. १७    "घरकुल ही दीर्घकथा आत्ताच्या परिस्थितीचे वास्तव समाजापुढे मांडते. एका अल्पशिक्षित तरुणाच्या बंडाची ही कथा समाजातील विपरीत गोष्टींवर सडकून टीका करणारी आहे. राजकारणातील नियमबाह्य प्रकारांना मांडणारी आहे. वास्तवाचे भान ठेवून सरकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना होत नसल्याचे वास्तव लेखकाने पुढे आणले आहे. क्रांतीची ठिणगी पेटवणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे." असे प्रतिपादन जिल्ह्याचे आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांनी केले.     नीरा (ता.पुरंदर) येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात परीस पब्लिकेशन पुणे यांच्या मार्फत प्रकाशित व प्रसिद्ध ग्रामीण लेखक प्रविण जोशी यांच्या 'घरकुल' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. वाघमोडे तसेच सोमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बापूराव गायकवाड होते.     डॉ.वायदंडे म्हणाले, "सरकारी योजनांबाबत एका शिक्षक लेखकाचे निरीक्षण पाहण्यासारखे आहे. पुस्त...

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ स्वाती शिंदे -पवार

Image
 महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षपदी डॉ स्वाती शिंदे -पवार स्वागताध्यक्षपदी ह. भ. प. जगदीश महाराज उंद्रे, निमंत्रकपदी नितीन भागवत सासवड, दि. १७ खानवडी (ता.पुरंदर) येथे होणा-या सोळाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री डॉ स्वाती शिंदे -पवार यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्षपदी ह. भ. प. जगदीश महाराज उंद्रे यांची तर निमंत्रकपदी नितीन भागवत यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली. महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलन भरविले जाते.  संमेलनाध्यक्ष डॉ स्वाती शिंदे या गेली तीस वर्षे राज्यभर साहित्य चळवळीत सहभागी आहेत. वाटेवरती काचा गं हे त्यांचे कवितेचे पुस्तक विशेष गाजले.  डॉ . स्वाती शिंदे - पवार जिल्हा परिषद केंद्रशाळा मंगरूळ . ता. खानापूर शिक्षण -एम.ए; एम.एड; पीएच.डी; डी .लीट . मा.अधिसभा सदस्...

वाल्हे येथील महात्मा फुले स्मारक हजारो दिव्यांनी उजाळले. रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी

Image
  वाल्हे येथील महात्मा फुले स्मारक हजारो दिव्यांनी उजाळले. रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी पुरंदर :       वाल्हे येथील महात्मा फुले विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी पाडवा निमित्त फुले स्मारकावर दीपउत्सवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले स्मारक हे पुणे पंढरपूर महामार्ग लगत असून या महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम वेगाने चालू आहे. त्यामुळे हे स्मारक येथून हलवावे लागणार असल्याने हा येथील शेवटचा दीपोत्सव असल्याने तरुणांमध्ये वेगळा उत्साह दिसून आला. रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करत यावेळी हजारो दिव्यांनी स्मारक उजाळून निघाले होते.     यावेळी माजी सभापती गिरीश नाना पवार, माजी सरपंच दत्तानाना पवार, अमोल खवले, वागदरवाडीचे सरपंच सुनील पवार, सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सागर भुजबळ, अमित पवार, हरी दुबळे, सत्यवान सूर्यवंशी, डॉ. रोहिदास पवार, माजी सदस्य समदास राऊत, जयवंत भुजबळ, दीपक कुमठेकर, सतीश तात्या, भालचंद्र भुजबळ, सागर भुजबळ, किरण भुजबळ, अक्षय खुडे, रोहित भोसले त्याचबरोबर प्र...

नीरेत फटाक्यांच्या ठिणगीने ऊस पेटला. ज्युबिलंटच्या फायरब्रीगेडने केले शर्तीचे प्रयत्न.

Image
  नीरेत फटाक्यांच्या ठिणगीने ऊस पेटला. ज्युबिलंटच्या फायरब्रीगेडने केले शर्तीचे प्रयत्न. पुरंदर :     पुरंदर तालुक्यातील नीरा शहराला लागून असलेल्या शेतातील ऊसाला आग लागली होती. मंगळवारी (दि. १४) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास फटाक्यांची ठिणगी पडल्याने केशव लक्ष्मण बंडगर यांच्या शेतातील ऊस पेटल्याने मोठे नुकसान झाले आहे.     नीरा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मागील बाजूस असलेल्या शेतातील उभा ऊस अचानक पेटला. गेली तीन दिवस दिवाळी निमित्त मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास स्कायशॉट फटाक्यांची ठिणगी केशव बंडगर यांच्या शेतातील २० गुंटे क्षेत्रातील १५/७ /२०२२ ची लागण असलेल्या उसाच्या फडात पडली. त्यामुळे उभा ऊस पेटू लागला. स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले पण आग आटोक्यात येत नसल्याने ज्युबिलंट कंपनीच्या अग्निशमन दलाला फोन करण्यात आला. ज्युबिलंटचे फायर कर्मचारी तात्काळ दाखल झाले.    आग लागलेल्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता अत्यंत अरुंद होता. त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी पोहचण्यात अडचणी आल्या. तरीही...

जरांगे पाटील नीरेत मार्गदर्शन करणार नीरेकराच्या वतीने होणार भव्य स्वागत.

Image
  जरांगे पाटील नीरेत मार्गदर्शन करणार नीरेकराच्या वतीने होणार भव्य स्वागत. पुरंदर :     मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरंगे पाटील राज्यभरात दौरा करत आहेत. गुरुवार दि.  १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:०० वाजता नीरेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहेत. याबाबत नीरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आज मंगळवारी सायंकाळी सहा वाजता नीरा ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन जरांगे पाटलांच्या दौऱ्याबाबत चर्चा केली. जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनानंतर जरांगे पाटील सातारा जिल्ह्यातील मायणी कडे जाताना नीरेत थांबणार आहेत.       नीरेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज बंधवा व मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या विविध समाजाच्या संघटना जरांगे पाटलांचे भव्य स्वागत करतील, नंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थित समाज बांधवांना मराठा आरक्षण संदर्भात मार्गदर्शन करणार असल्याची माहिती नीरा सकल मराठा समाज बांधवांकडून आज देण्यात आली. यावेळी नीरा व पंचक्रोशीतील मराठा बांधवांंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन टी....

कृषी विषयात पीएचडी मिळवणाऱ्या पुष्पांजली भोसलेचां नीरा ग्रामस्थांनी केला सत्कार

Image
   कृषी विषयात पीएचडी मिळवणाऱ्या पुष्पांजली भोसलेचां नीरा ग्रामस्थांनी केला सत्कार   नीरा दि.१२    नीरा ता. पुरंदर येथील तरुणी पुष्पांजली भोसले हिने नुकतीच कृषी विषयात पी.एच.डी. अर्थात डॉक्टरेट प्राप्त केली आहे.कमी वयात तिने हे यश संपादन केले आहे.शेतकऱ्यांच्या मुलीने शेती क्षेत्रातच संशोधन करीत डॉक्टरेट मिळवल्याने नीरा येथील ग्रामस्थांनी पुष्पांजली भोसले हीचा आज नीरा ग्रामपंचायत कार्यालयात सन्मान केला.      नीरा येथील शेतकरी व नीरा शहराचे एके काळी उपसरपंच राहिलेल्या बाळासाहेब भोसले यांची कन्या पुष्पांजली भोसले हिने कृषी विभागात निशिगंधाच्या फुलांच्या सुगंधा बाबत संशोधन केले.त्यात तिने डॉक्टरेट संपादित केली .नीरा येथील नीरा विकास आघाडी व नीरा ग्रामपंचायतीच्यावतीने नीरा ग्रामपंचायत कार्यालयात लक्ष्मी पूजनाचे निमित्त साधत तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ सहितिक व.बा.बोधे, नीरा शहराच्या सरपंच तेजश्री काकडे,उपसरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नीरा विकास आघाडीचे मार्गदर्शक तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नाना ग...

घरकुल दीर्घकथेचे १६ नोव्हेंबर रोजी प्रकाशन

Image
 घरकुल दीर्घकथेचे १६ नोव्हेंबर रोजी प्रकाशन नीरा ता.१२     प्रसिद्ध ग्रामीण लेखक, कवी, कथाकार प्रविण अशोकराव जोशी यांच्या आगामी घरकुल या दीर्घकथेचे प्रकाशन गुरुवार (ता.१६) नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. नीरा (ता.पुरंदर) येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सायंकाळी ७:०० वाजता पुस्तक प्रकाशन होणार आहे.     सनदी अधिकारी व जिल्ह्याचे आयकर आयुक्त इनकम टॅक्स डॉ. नितीन वाघमोडे तसेच मुगुटराव साहेबराव काकडे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास वायदंडे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे. यासाठी पंचायत समिती माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शंकरराव भेलके महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. जगदीश शेवते, टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. महादेव रोकडे, शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. वैजीनाथ राख, व्याख्याते डॉ. प्रदीप पाटील, लेखक संतोष शेंडकर, बारामती सत्र न्यायालयाचे विशेष सरकारी वकील ऍड. बापूसाहेब शिलवंत, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जगताप, कांचनदादा निगडे, उत्तमराव निगडे आदी उपस्थित राहणार आहेत.    ...

नीरा येथील मोटरसायकल चोरी प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याला ठोकल्या बेड्या

Image
 नीरा येथील मोटरसायकल चोरी प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याला ठोकल्या बेड्या    कोर्टाने केली येरवडा जेल मध्ये केली रवानगी  नीरा दि. १२      पुरंदर तालुक्यातील नीरा शहरामध्ये मोटरसायकल चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. यानंतर पोलिसांनी याबाबत तपास करत असताना या मोटरसायकल चोरीमध्ये प्रत्यक्ष एक कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे त्याच्याकडून आठ मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या असून या मोटरसायकल खरेदी करणाऱ्या दोघांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांना कोर्टाकडून जामीन देण्यात आला आहे. तर मुख्य आरोपीला येरवडा कारागृहात पाठवले आहे.   या संदर्भातून जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विनोद मारुती नामदार याला मोटरसायकल चोरी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्याने आठ मोटरसायकल चोरीची कबुली दिली आणि या आठ मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी पोलिसांनी निरा येथील मोटरसायकल खरेदी करणारे अस्लम मुलानी आणि मुरूम येथील पृथ्वीराज ठोंबरे यांना देखील ताब्यात घेतलं होतं कोर्टाने...

कोण? सपडलारे कोण...? बडा मासा गळाला लागलाय काय ? त्या वाहन चोरांची नीरेत जोरदार चर्चा

Image
 कोण? सपडलारे कोण...? बडा मासा गळाला लागलाय काय ?   त्या वाहन चोरांची नीरेत जोरदार चर्चा     नीरा दि ११     पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलिसांनी मागील दोन दिवसात मोठी कारवाई करून वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.हे चोर ताब्यात घेतल्या पासून नीरा शहरात कोण ? सापडला रे कोण... ? अशा चर्चा नीरा शहरात जोरदार सुरू आहे. पोलिसांची गुप्त कारवाई सुरू असल्याने व आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पोलीस अजूनही याबाबत माध्यमांना काही सांगत नाहीत.मात्र मागील दोन दिवसा पासून पोलिसांनी नीरा येथील काही लोकांना ताब्यात घेतले असून.त्यांच्याकडून काही दुचाकींची रिकव्हरी देखील केली आहे.मात्र याबाबत लोकांना काहीच कळत नसल्याने नक्की पोलिसांनी पकडलेला चोर कोण? या बाबत नीरा परिसरात सध्या दबक्या आवाजात चर्चेला ऊत आला आहे.       नीरा (ता.पुरंदर) येथे मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यातच मोटरसायकल चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. मागील तीन महिन्याच्या कालावधीमध्ये नीरा आणि परिसरातून एकूण ३५ पेक्...

नीरा ग्रामपंचायतीच्यावतीने कामगारांना देण्यात आला 45 दिवसाच्या पगारा इतका बोनस

Image
 नीरा ग्रामपंचायतीच्यावतीने कामगारांना देण्यात आला 45 दिवसाच्या पगारा इतका  बोनस ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड नीरा दि.९    पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरा ग्रामपंचायतीच्या कामगारांना ग्रामपंचायतीच्यावतीने दिवाळीसाठी ४५ दिवसाचा पगार हा बोनस म्हणून देण्यात आला आहे. आज गुरुवारी निरा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कामगारांना दिवाळी फराळ (मिठाई) वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच राजेश काकडे यांनी ही माहिती दिली    नीरा ग्रामपंचायतीच्यावतीने दरवर्षी ग्रामपंचायतीच्या सर्वच कामगारांना दिवाळी बोनस दिला जातो. यावर्षी कामगारांच्या पगारात जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट बोनस मिळाला आहे. यावर्षी कामगारांना ४५ दिवसाचा पगार हा बोनस म्हणून देण्यात येत असल्याची माहिती उपसरपंच राजेश काकडे यांनी दिली. तर कामगारांनी मागील काही दिवसात कामात केलेल्या सुधारणा बद्दल काकडे यांनी कामगारांचे कौतुक केलं व पुढील काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामगारांचे हित जपलं जाईल कामगारांनी सुद्ध...

कर्नलवाडीच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीच्या समर्थकांनी प्रस्थापित कॉंग्रेच्या समर्थकांचा धुव्वा उडवला सरपंच शिवसेना राष्ट्रवादीच्या तर सात पैकी चार सदस्य भरघोस मतांनी विजयी

Image
  कर्नलवाडीच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीच्या समर्थकांनी प्रस्थापित कॉंग्रेच्या समर्थकांचा  धुव्वा उडवला सरपंच  शिवसेना राष्ट्रवादीच्या तर सात पैकी चार सदस्य भरघोस मतांनी विजयी पुरंदर :     पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेना राष्ट्रवादीच्या सुवर्णा तानाजी महानवर यांना ७१५ तर कॉंग्रेच्या अहिल्या शंकर वाघापुरे यांना ५७५ मते पडल्याने महानवर या विक्रमी १५४ मताने निवडून आल्या आहेत. प्रभाग क्रमांक एक मधून शिवसेना राष्ट्रवादीच्या आशा सचिन चव्हाण यांना २४७ तर कॉंग्रेच्या प्रियंका रणजीत निगडे यांना २०८ मते पडल्याने चव्हाण ३९ मतांनी निवडून आल्या आहेत. कॉंग्रेच्या प्रतीक्षा सागर महानवर यांना २३९ तर  शिवसेना राष्ट्रवादीच्या  प्रतिक्षा रामचंद्र गदादे यांना २२३ मते पडल्याने महानवर या ११ मताने विजयी झाल्या. कॉंग्रसचे अनिल गणपत निगडे यांना २५२ तर  शिवसेना राष्ट्रवादीचे  दिपक रामचंद्र भोसले यांना २११ मते पडल्याने निगडे ४१ मतांनी निवडून आले. वार्ड नं २ मधुन  शिवसेना राष्ट्रवादीचे  नंदकुमार वसंतराव निगडे ...

नीरा येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाचा दुसरा दिवस मनोज जरांगे पाटील यांना पाठिंब्यासाठी उपोषण संध्याकाळी कॅन्डल मार्च निघणार आहे.

Image
 नीरा येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाचा दुसरा दिवस  मनोज जरांगे पाटील यांना पाठिंब्यासाठी उपोषण  संध्याकाळी कॅन्डल मार्च निघणार आहे.  पुरंदर :                 नीरा येथे मराठा समाजाच्यावतीने मंगळवार पासून आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषण करतायत त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे साखळी उपोषण करण्यात येत आहे. नीरा आणि परिसरातील नागरिक यामध्ये सहभागी झाले    आहेत. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. तर मराठा आरक्षण आंदोलना बाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. आज बुधवारी उपोषणाचा दुसरा दिवस आहे. संध्याकाळी कॅन्डल मार्च निघणार आहे.          नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. नीरा येथील सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर नीरा पंचक्रोशीतील सकल मराठा स...