नीरा येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाचा दुसरा दिवस
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंब्यासाठी उपोषण
संध्याकाळी कॅन्डल मार्च निघणार आहे.
पुरंदर :
नीरा येथे मराठा समाजाच्यावतीने मंगळवार पासून आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषण करतायत त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे साखळी उपोषण करण्यात येत आहे. नीरा आणि परिसरातील नागरिक यामध्ये सहभागी झाले
आहेत. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. तर मराठा आरक्षण आंदोलना बाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. आज बुधवारी उपोषणाचा दुसरा दिवस आहे. संध्याकाळी कॅन्डल मार्च निघणार आहे.
नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. नीरा येथील सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर नीरा पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आल आहे. बुधवारी पंचक्रोशीतील लोकांनी भजन गात जरांगे पाटलांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी विठ्ठलाला साकडे घातले. सरकारने जर यावर लवकर निर्णय घेतला नाही तर उद्या गुरूवार रस्ता रोको करण्याचा इशारा मराठा बांधवांनी दिला आहे. मंगळवारी सुरू झालेल्या या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना व विविध जाती धर्माच्या लोकांनी पाठिंबा दिला आहे.या आंदोलनात ही त्यांनी सहभाग घेतला.
चौकट
आज बुधवारी नीरा येथील मराठा बांधव कॅन्डल मार्च काढणार आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकतून हा मोर्चा सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होईल. अहिल्या देवी होळकर चौक, लक्ष्मी रोडवरुन, घुले अक्का चौक, बुवासाहेब चौक, नगररोड मार्गे, पालखी तळ, पंढरपूर पालखी मार्गावरुन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक हा कॅन्डल मार्च निघणार असुन परिसरातील मराठा बांधवांंनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सचिन मोरे यांनी केले आहे.