वाल्हे येथील महात्मा फुले स्मारक हजारो दिव्यांनी उजाळले.
रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी
पुरंदर :
वाल्हे येथील महात्मा फुले विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी पाडवा निमित्त फुले स्मारकावर दीपउत्सवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले स्मारक हे पुणे पंढरपूर महामार्ग लगत असून या महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम वेगाने चालू आहे. त्यामुळे हे स्मारक येथून हलवावे लागणार असल्याने हा येथील शेवटचा दीपोत्सव असल्याने तरुणांमध्ये वेगळा उत्साह दिसून आला. रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करत यावेळी हजारो दिव्यांनी स्मारक उजाळून निघाले होते.
यावेळी माजी सभापती गिरीश नाना पवार, माजी सरपंच दत्तानाना पवार, अमोल खवले, वागदरवाडीचे सरपंच सुनील पवार, सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सागर भुजबळ, अमित पवार, हरी दुबळे, सत्यवान सूर्यवंशी, डॉ. रोहिदास पवार, माजी सदस्य समदास राऊत, जयवंत भुजबळ, दीपक कुमठेकर, सतीश तात्या, भालचंद्र भुजबळ, सागर भुजबळ, किरण भुजबळ, अक्षय खुडे, रोहित भोसले त्याचबरोबर प्रतिष्ठानचे नूतन अध्यक्ष संतोष भुजबळ, सूर्यकांत भुजबळ, शंकर भुजबळ, अनिल भुजबळ, दादासाहेब राऊत, महावीर भुजबळ, तुषार भुजबळ, मनोज भुजबळ, वैभव भुजबळ, गणेश भुजबळ, हनुमंत भुजबळ, स्वप्निल भुजबळ, कुणाल भुजबळ, निलेश कुदळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.