कर्नलवाडीच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीच्या समर्थकांनी प्रस्थापित कॉंग्रेच्या समर्थकांचा धुव्वा उडवला
सरपंच शिवसेना राष्ट्रवादीच्या तर सात पैकी चार सदस्य भरघोस मतांनी विजयीपुरंदर :
पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेना राष्ट्रवादीच्या सुवर्णा तानाजी महानवर यांना ७१५ तर कॉंग्रेच्या अहिल्या शंकर वाघापुरे यांना ५७५ मते पडल्याने महानवर या विक्रमी १५४ मताने निवडून आल्या आहेत. प्रभाग क्रमांक एक मधून शिवसेना राष्ट्रवादीच्या आशा सचिन चव्हाण यांना २४७ तर कॉंग्रेच्या प्रियंका रणजीत निगडे यांना २०८ मते पडल्याने चव्हाण ३९ मतांनी निवडून आल्या आहेत. कॉंग्रेच्या प्रतीक्षा सागर महानवर यांना २३९ तर शिवसेना राष्ट्रवादीच्या प्रतिक्षा रामचंद्र गदादे यांना २२३ मते पडल्याने महानवर या ११ मताने विजयी झाल्या. कॉंग्रसचे अनिल गणपत निगडे यांना २५२ तर शिवसेना राष्ट्रवादीचे दिपक रामचंद्र भोसले यांना २११ मते पडल्याने निगडे ४१ मतांनी निवडून आले.
वार्ड नं २ मधुन शिवसेना राष्ट्रवादीचे नंदकुमार वसंतराव निगडे यांना ३०४ मते पडली तर कॉंग्रेचे अशोक ज्ञानेश्वर निगडे यांना १५३ मते पडल्याने नंदकुमार निगडे हे विक्रमी १५१ च्या फरकाने मात केली. अपक्ष मेघराज सुधाकर निगडे यांना १५ मते पडली. शिवसेना राष्ट्रवादीच्या स्वप्नाली विराज निगडे यांना २८५ मते तर कॉंग्रेच्या अनिता सत्यवान निगडे यांना १८३ मते पडल्याने तब्बल १०२ मताधिक्याने स्वप्नाली निगडे या विजयी झाल्या.
प्रभाग ३ मधुन कॉंग्रसचे कपिल मारुती कोंडे यांना २२७ तर शिवसेना राष्ट्रवादीचे अरविंद गुलाबराव निगडे यांना १३३ मते पडल्याने कोंडे हे ९४ मतांनी विजयी झाले. शिवसेना राष्ट्रवादीच्या अनिता जगन्नाथ कर्णवर यांना १८५ मतांनी निवडून आले तर कॉंग्रेच्या अलका अरविंद कर्णवर यांन १७३ मते पडली. अनिता कर्णवर यांनी ३२ मतांनी मात केली आहे.
कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेच्या संजय जगताप समर्थक व शिवसेना शिंदे गट तसेच माजी राज्यमंत्री विजय शिवतारे व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या समर्थकांनी विरोधात मोठे आव्हान दिले. मात्र जनशक्तीच्या जोरावर मोठ्या फरकाने मात केली.