आम आदमी पार्टीचा 11वा वर्धापन दिन व संविधान दिन सोहळा पुरंदरला उत्साहात साजरा
दि.26 नोव्हेंबर
सासवड येथे आप पुरंदर तालुका जनसंपर्क कार्यालयात आम आदमी पक्षाचा 11वा वर्धापन दिन व संविधान दिन आप पुणे जिल्हाच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी 26/11 च्या मुंबई येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या वीरांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. दरम्यान भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल देवकाते यांच्या नेतृत्वात करून भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी मनोगत व्यक्त करताना आप युवा प्रदेशअध्यक्ष मयूर दौंडकर यांनी पक्षाचा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना आप हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा एकमेव पक्ष असल्याचे सांगितले. आप पुरंदरचे अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी चालू राजकीय घडामोडींवर भाष्य करताना येणाऱ्या काळात संविधान बचावाचे कार्य आप कार्यकर्ते करणार असल्याचे सांगितले.
या वेळी जिल्हा व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.