महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ स्वाती शिंदे -पवार

 महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या 

अध्यक्षपदी डॉ स्वाती शिंदे -पवार



स्वागताध्यक्षपदी ह. भ. प. जगदीश महाराज उंद्रे, निमंत्रकपदी नितीन भागवत

सासवड, दि. १७ खानवडी (ता.पुरंदर) येथे होणा-या सोळाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री डॉ स्वाती शिंदे -पवार यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्षपदी ह. भ. प. जगदीश महाराज उंद्रे यांची तर निमंत्रकपदी नितीन भागवत यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.



महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलन भरविले जाते. 

संमेलनाध्यक्ष डॉ स्वाती शिंदे या गेली तीस वर्षे राज्यभर साहित्य चळवळीत सहभागी आहेत. वाटेवरती काचा गं हे त्यांचे कवितेचे पुस्तक विशेष गाजले. 

डॉ . स्वाती शिंदे - पवार

जिल्हा परिषद केंद्रशाळा मंगरूळ . ता. खानापूर

शिक्षण -एम.ए; एम.एड; पीएच.डी; डी .लीट .

मा.अधिसभा सदस्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार .



-साहित्यसंपदा -

१) स्त्रिकोष( एम.ए व्दितीय वर्ष अभ्यासक्रमात समावेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ ,औरंगाबाद .) 

२) प्रेम म्हणजे प्रेमच ( महाराष्ट्र टाईम्स - बंडखोर कवयित्री)

३) वाटेवरती काचा गं

(इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात शिर्षक कवितेचा समावेश )

४)वेदनेच्या खोल तळाशी( बी.ए .भाग एक अभ्यासक्रमात पुस्तकातील जातं कवितेचा समावेश .स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड . )

५) माती मोकळी होताना( कवी अनंत फंदी पुरस्कार, संगमनेर )

६) काळजासाठी काही ओळी(बी.ए. भाग -१ च्या अभ्यासक्रमात ५ कविता -स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड .)

७)मास्तरकी अंधारात मठ्ठ काळा बैल ( मिडीया रेकॉर्ड शिर्षक कविता )

८) अरुणोदय - समिक्षाग्रंथ(एम .ए . भाग 2 संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर. संदर्भग्रंथ व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय यादीत समावेश .

लेखनाला ऐंशीहून अधिक पुरस्कार. 

स्वागताध्यक्ष श्री उंद्रे हे अध्यात्मिक विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असून, वात्सल्य धाम गोशाळा ते चालवितात. ज्ञानलीला वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आहे, साप्ताहिक ज्ञानलीला चे ते संपादक आहेत. निमंत्रक नितीन भागवत हे कामगार चे रहिवासी असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.


 संमेलनास उद़्घाटक म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते बाबाराजे जाधवराव उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सजंय जगताप, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, विजयराव कोलते, सुदामअप्पा इंगळे, दत्ताशेठ झुरुंगे. डाँ दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित राहणार आहेत. मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर, कवयित्री ललिता गवांदे उपस्थित राहणार आहेत. 

या संमेलनात ग्रंथपूजन, उदघाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

दुपारी १२,३० वा. संमेलनाचे उदघाटन होणार असून, दुपारी २ ३० वा. क्रांतीसूर्य महात्मा फुले या विषयावर डॉ जगदीश शेवते यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. 

यापूर्वी झालेल्या महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, इतिहासाचार्य मा.म.देशमुख, म.भा.चव्हाण, प्रा.गंगाधर बनबरे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रा. रतनलाल सोनग्रा, डाँ सय्यद जब्बार पटेल, डाँ जयप्रकाश घुमटकर, दशरथ यादव, भा.ल.ठाणगे, रावसाहेब पवार, अविनाश ठाकरे यांनी भुषविले आहे. संमेलनाचे संयोजन राजाभाऊ जगताप, दत्तानाना भोंगळे, गंगाराम जाधव, शामराव मेमाणे, सुनील लोणकर, नंदकुमार दिवसे, दत्ता कड रवींद्र फुले, दत्ता होले, अरविंद जगताप, संजय सोनवणे, दिपक पवार, विजय तुपे, यांनी केले आहे,

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.