जरांगे पाटील नीरेत मार्गदर्शन करणार नीरेकराच्या वतीने होणार भव्य स्वागत.

 जरांगे पाटील नीरेत मार्गदर्शन करणार

नीरेकराच्या वतीने होणार भव्य स्वागत.




पुरंदर :
    मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरंगे पाटील राज्यभरात दौरा करत आहेत. गुरुवार दि.  १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:०० वाजता नीरेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहेत. याबाबत नीरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आज मंगळवारी सायंकाळी सहा वाजता नीरा ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन जरांगे पाटलांच्या दौऱ्याबाबत चर्चा केली. जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनानंतर जरांगे पाटील सातारा जिल्ह्यातील मायणी कडे जाताना नीरेत थांबणार आहेत.

      नीरेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज बंधवा व मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या विविध समाजाच्या संघटना जरांगे पाटलांचे भव्य स्वागत करतील, नंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थित समाज बांधवांना मराठा आरक्षण संदर्भात मार्गदर्शन करणार असल्याची माहिती नीरा सकल मराठा समाज बांधवांकडून आज देण्यात आली. यावेळी नीरा व पंचक्रोशीतील मराठा बांधवांंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन टी. के. जगताप यांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.