Thursday, June 30, 2022

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिली उभे रांगण उत्साहात.

 माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिली उभे रांगण उत्साहात.



चांदोबाचा लिंब येथे दोन्ही अश्वानी धावत धावत रथाला प्रदक्षिणा मारली. 


उभ्या रिंगण सोहळ्याने वारकर्‍यांमध्ये नवचैतन्य


नीरा : ३०


      वारीच्या वाटचालीत नवचैतन्य निर्माण करणारा पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा आज (गुरुवार ) मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात चांदोबाचा लिंब येथे पार पडला. सायंकाळी हा सोहळा तरडगांव मुक्कामी विसावला. उद्या हा सोहळा दोन दिवसाच्या फलटण मुक्कामासाठी मार्गस्थ होइल. 


      लोणंद येथील अडीच दिवसांच्या विश्रांतीनंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याची तरडगांव मुक्कामी जाण्याची तयारी सुरू झाली. परंपरेप्रमाणे पहाटे संस्थानचे प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई यांच्या हस्ते माऊलींची महापूजा व आरती करण्यात आली. कोकण, आंध्र, कर्नाटकासह सांगली, सातारा, कोल्हापूर आदि जिल्ह्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले व ते सोहळ्यात सहभागी झाले. 



फलटण तालुक्यात स्वागत

 लोणंद येथील अडीच दिवसांच्या विश्रांतीनंतर दुपारी १ वाजता श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणासाठी तरडगांवकडे मार्गस्थ झाला. लोणंद व्यापारी पेठ, एस. टी. स्टॅण्ड, अहिल्यादेवी होळकर चौक येथील स्वागत व निरोप स्विकारून सोहळा लोणंद-फलटण मार्गावर आला. दुपारी २.३० वाजता कापडगांव येथे सोहळ्याचे फलटण तालुक्याच्या वतीने प्रांताधिकारी शिवाजी जगताप, तहसिलदार समीर यादव, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, गटविकास अधिकारी अमित गावडे यांच्यासह असंख्य ग्रामस्थानीं माऊलींसह सोहळ्याचे स्वागत केले. 


नेत्रदीपक रिंगण सोहळा 

दुपारी दिड वाजता आकाशात मेघ दाटून आले आणि काही वेळातच रिमझीम पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने वारकऱ्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. या पावसाने वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. 


 उभ्या रिंगणासाठी साडेतीन वाजता माऊलीचा व स्वाराचा अश्‍व चांदोबाचा लिंब येथे दाखल झाले. सायंकाळी ४ वाजता माऊलींचा रथ रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचला. श्री स्वामी समर्थ आर्टच्या रांगोळी कलाकार राजश्री जुन्नरकर यांनी सुंदर अशा रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या. पहिलाच रिंगण सोहळा असल्याने लाखो भाविकांनी गर्दी केली होती. चोपदार उध्दव यांनी रिंगण लावून घेतले. सायंकाळी सव्वा चार वाजता रिंगणासाठी अश्‍व सोडण्यात आले आणि दोन्ही अश्‍वांनी रथासमोरील २७ तर रथामागील २ दिंड्यांपर्यंत नेत्रदिपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सुरूवातीला स्वाराचा मोती हा अश्व पुढे धावला तर त्यामागे माऊलींचा हिरा हा अश्व धावला. दोन्ही अश्वानी धावत धावत रथाला प्रदक्षिणा मारली. रथाजवळ येवून अश्‍वांनी माऊलींचे दर्शन घेतले. सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील यांनी अश्‍वाला प्रसाद दिला. त्यानंतर माऊलीचा अश्‍व पुढे तर स्वाराचा अश्‍व त्याच्या मागे धावत सोहळ्याच्या अग्रभागी जावून पोहोचले. बाळासाहेब चोपदार हे रथाजवळ उभे राहिले. त्यांनी चोप उंचावल्यानंतर तुकाराम तुकाराम नामाचा जयघोष झाला व रिंगण सोहळा पूर्ण केला. या रिंगण सोहळ्यानंतर दिंड्यादिड्यांमध्ये विविध खेळ खेळण्यात आले. 


      सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने वारकऱ्यांच्या खेळात रंगत आली. उभ्या रिंगण सोहळ्याने वारकर्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले . दिंड्यादिंड्यातील विविध खेळानंतर वैष्णवांची पावले तरडगांवच्या दिशेने झेपावली. पालखी सोहळ्यातील हा पहिला उभ्या रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांसह लोणंद, कापडगाव, चव्हाणवाडी, आरडगांव, पर्‍हार (खुर्द), हिंगणगांव, राहुडी, माळेवाडी, शिंदेमळा आदि गांवातील हजारो भाविक उपस्थित झाले होते. लोणंद ते तरडगांव या वाटचालीत ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी व भाविकांनी माऊलींसह सोहळ्याचे स्वागत करून दर्शन घेतले. तरडगांव येथे नव्याने तयार केलेल्या विस्तीर्ण अशा पालखी तळावर सायंकाळी ६ वा. हा सोहळा पोहोचला. समाज आरतीनंतर सोहळा विसावला. येथे सोहळ्याचा एक दिवस मुक्काम असून उद्या (शुक्रवार) हा सोहळा दोन दिवसांच्या फलटण मुक्कामाकडे मार्गस्थ होईल. पालखी सोहळ्यात सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अजय बंसल यांच्या नेतृत्वाखाली लोणंद ते तरडगाव या मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली होती. पालखी मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Monday, June 27, 2022

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाल्हे मुक्कमी विसावला

 

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाल्हे मुक्कमी विसावला 




वाल्हे / प्रतिनिधी 

 कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानराज माऊलींनी रामायणकार महर्षि वाल्मिकींच्या कर्मभूमीत प्रवेश केला. माऊलींचे विश्‍वरूप दर्शन देणार्‍या समाज आरतीनंतर सोहळा वाल्ह्यात विसावला. उद्या ( मंगळवार ) हा सोहळा नीरा स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल.


राम राम म्हणा वाट चाली |

यज्ञ पाऊलो पाऊली ॥

धन्य धन्य ते शरीर|

तीर्थ व्रतांचे माहेर ॥


  तपोनिधी महर्षि वाल्मिकींच्या वाल्हे नगरीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे दुपारी दिड वाजता आगमन झाले. 

 पहाटे माऊलींची महापूजा प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई यांच्या हस्ते झाली. त्यानंतर खंडोबारायांची जेजूरीनगरी सोडून माऊली सकाळी ७ वा. वाल्हेकडे मार्गस्थ झाल्या. माऊलींसह आलेल्या लाखो भाविकांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या खंडोबाचे दर्शन घेवून कडेपठारावरून दौंडज खिंडीत सोहळ्यात सहभागी झाले. सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरण निर्माण झाले. अशा ढगाळ वातावरणातच वारकरी विठ्ठल भेटीच्या ओढीने टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाच्या जयघोषात मार्गक्रमण करीत होते. १२ कि.मी. चा प्रवास असल्याने व दुपारपर्यंत पोहोचण्याचे असल्याने वैष्णवांची पावले वाल्हे गावाच्या दिशेने झपझप पडत होती. सकाळी साडेनऊ वाजता सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी दौंडज खिंडीत पोहोचला. येथे वारकर्‍यांनी सकाळची न्याहरी उरकली. कांदा, मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी असे म्हणत भाकरी, उसळा, विविध प्रकारच्या चटण्या व मेवा घेवून वारकर्‍यांनी सकाळची न्याहरी उरकली. सकाळी साडेदहा वाजता हा सोहळा दौंडजकडे मार्गस्थ झाला. दौंडज येथे सोहळा पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. दौंडज परिसरातील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. विश्रांतीनंतर हा सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ झाला. टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाच्या जयघोषात सह्याद्रिच्या पर्वतरांगा दुमदुमून गेल्या होत्या.

सोहळा दुपारी दिड वाजता वाल्हे येथे पोहोचला. येथे सरपंच अमोल खवले , उपसरपंच अंजली कुमठेकर , ग्रामसेवक बाळासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. येथील स्वागत स्विकारून दुपारी ३ वाजता सोहळा मदनेवस्ती-शुकलवाडी येथे पोहोचला. समाज आरतीनंतर सोहळा येथे विसावला.


पालखीचनिरा स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश

 श्री ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा उद्या ( मंगळवार ) दि. २८ रोजी सकाळी ६.३० वाजता वाल्हे येथून लोणंद मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे. सकाळी हा सोहळा ११.३० पर्यंत नीरा येथे पोहोचेल. दुपारचा नैवेद्य व भोजन घेऊन विश्रांतीनंतर दुपारी अडीच वाजता हा सोहळा लोणंदकडे मार्गस्थ होईल. नीरा स्नानानंतर सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल.

Saturday, June 25, 2022

ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

 पत्रकारिता समाजाधिष्ठीत असावी : विक्रम गोखले


शहरात पत्रकार भवन उभारू : राजेश पाटील


ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

पुणे दि.25



 पुणे (प्रतिनीधी) पत्रकारिता आणि राजकारण समाजाधिष्ठीत असावे. आदर्श पत्रकारीतेच्या जवळ जाणारी अनेक माणसं होऊन गेली. परंतु सध्याच्या तरुण पत्रकार पिढीचा अभ्यास नाही आणि पत्रकारीतेत अभ्यासाला पर्याय नाही. लोकांना शहाणं करून सोडण्यासाठी पत्रकारिता निर्माण झाली आहे. त्यामुळेच लोकशाहीचा चौथा खांब म्हणून पत्रकारिता ओळखली जाते. वार्तांकन करताना समोरील सद्यपरिस्थिती सांगावी. तुम्हाला काय वाटते हे सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता अशी परिस्थिती सध्या आहे. विशिष्ट राजकीय विचाराला वाहून घेतलेले एक वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनी यांच्या नादी किती लागायचं आणि आपला कणा ताठ ठेवायचा का नाही हे ठरवण्याची वेळ पत्रकारितेत आली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले यांनी पिंपरी येथे केले.



        मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व सोशल मीडिया परिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांना विक्रम गोखले यांच्या हस्ते "जीवनगौरव पुरस्कार" देवून सन्मानित करण्यात आले.


         शनिवारी पिंपरीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद काथे, ऍड. असीम सरोदे, पुरस्कारार्थी एस. एम. देशमुख, शोभना देशमुख, परीषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, कोषाध्यक्ष विजय जोशी, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, समन्वयक सुनील जगताप, सोशल मिडिया अध्यक्ष जनार्दन दांडगे, परिषद प्रतिनिधी एम.जी.शेलार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, सोशल मीडियाचे अध्यक्ष सुरज साळवे, ज्येष्ठ सल्लागार अरुण उर्फ नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ, डि. के. वळसे, रोहित खर्गे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रवीण शिर्के, सरचिटणीस मारुती बानेवार, छायाचित्रकार मार्गदर्शक देवदत्त कशाळीकर, व्हिडीओग्राफर मार्गदर्शक गुरुदास भोंडवे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे पहिल्या सत्रातील कार्यशाळेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.



       दुसऱ्या सत्रात एस. एम. देशमुख यांचा विक्रम गोखले यांच्या हस्ते मानपत्र, शिंदेशाही पगडी, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शोभना देशमुख यांचा शबनम सैयद, माधुरी कोराड, श्रावणी कामत, ऍड. सविता वडघुले, शकुंतला कांबळे यांनी साडी देवून सन्मान केला.


        आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतर्फे पिंपरी चिंचवड शहरात एक पत्रकार भवन उभारण्याचा प्रयत्न आहे. याविषयी योग्य ती कार्यवाही करू. पिंपरी चिंचवड शहराला राजकीय, सांस्कृतिक, मार्गदर्शन करण्यामध्ये तसेच चांगले उपक्रम नागरिकांपर्यंत पोहचवण्यामध्ये पत्रकारांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा वाढविण्यामध्ये राज्यातील पत्रकारांचे मोलाचे योगदान आहे. अग्निपथ मधील विक्रम गोखले यांची भूमिका मला मानसिक तसेच नैतिक पाठबळ वाढवणारी आणि प्रेरणा देणारी वाटली. पत्रकार संघाचा हा उपक्रम उत्तम असल्याचे प्रतिपादनही आयुक्त राजेश पाटील यांनी केले.


     छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर म्हणाले की, छायाचित्रकाराची एखादी प्रतिमा एखाद्या देशाला, जगाला योग्य दिशा देण्याचे काम करते. त्यांनी सोमाली येथील दुष्काळ, भोपाळ येथील वायू दुर्घटना, मुंबई पुण्यासारख्या महानगरातील सफाई कामगारांचे प्रश्न, कामाठीपुरा तसेच बुधवार पेठ येथील वेश्यांचे प्रश्न, कोरोना महामारी या काळात छायाचित्रकारांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची माहिती स्लाईड शो द्वारे सादर केली. छायाचित्रकाराने समोर घडणारा प्रसंग योग्य पद्धतीने योग्य माध्यमातून नागरिकांनी पुढे आणण्याचे काम करावे. पद्मश्री छायाचित्रकार सुधाकर ओलवे यांनी मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न छायाचित्रांद्वारे मांडल्यामुळे या सफाई कामगारांकडे "माणूस" म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी राज्य सरकारला धोरणे आखावी लागली अशीही माहिती कशाळीकर यांनी यावेळी दिली.


    ऍड. असीम सरोदे म्हणाले की, पत्रकारांनी एखाद्या बातमीमुळे आपल्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी काय दक्षता घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. एखादा पत्रकार चुकल्यास त्यांनी मनापासून माफी देखील मागावी. समाजात घडणाऱ्या घटनांचा प्रभाव पत्रकारांवर पडतो आणि त्याचे पडसाद त्याच्या बातमीत दिसतात. एखाद्या गुन्ह्याशी संबंधित बातमीचे वृत्तांकन करताना "आरोपी" ऐवजी "संशयित आरोपी" असा उल्लेख करावा असेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन आरोप सिद्ध होत नाही तो पर्यंत तो संशयित आरोपी असतो. घटनेची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय बातमी देवू नये.


     सत्काराला उत्तर देताना एस. एम. देशमुख म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटक पत्रकारांना गृहीत धरतात. पत्रकारांनी सचोटीने, प्रामाणिकपणे, निरपेक्ष आणि निष्पक्ष काम करावे असे सांगितले जाते. मात्र, पत्रकारांच्या अडचणी, प्रश्न यांच्यावर साधा विचारही कोणी करोत नाही. पत्रकार देखील सर्वसामान्य व्यक्तींसारखाच कौटुंबिक, आर्थिक बाबतीत त्रासलेले असू शकतो, याची जाण समाजाने ठेवावी एवढीच अपेक्षा आहे.

स्वागत अनिल वडघुले, प्रास्ताविक बाळासाहेब ढसाळ, सूत्रसंचालन संदीप साकोरे, आभार नाना कांबळे यांनी मानले.

..............................

Thursday, June 23, 2022

गुळूंचेच्या सरपंचपदी संतोष निगडे यांची बिन विरोध निवड

 गुळूंचेच्या सरपंचपदी संतोष निगडे यांची बिन विरोध निवड



नीरा दि.२३


    गुळूंचे ता.पुरंदर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष निगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आज दिनांक 23 जून रोजी झालेल्या या निवडणुकीत संतोष निगडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी चव्हाण यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.



     गुळुंचे गावचे माजी सरपंच संभाजी कुंभार यांच्या नातेवाइकांचे सरकारी जागेत अतिक्रमण असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र ठरवले होते.त्यानतंर गुळूंचे गावचे सरपंच रिक्त झाले होते.यानतंर आता आज दिनांक २३ रोजी सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली यामध्ये संतोष निगडे यांची बिन विरोध निवड झाली.



तालुक्यातील पालखी सोहळ्याची प्रशासनाची तयारी पूर्ण ; आमदार संजय जगताप

 तालुक्यातील पालखी सोहळ्याची प्रशासनाची तयारी पूर्ण ; आमदार संजय जगताप





नीरा दि.23


   उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुरंदर तालुक्यात येत आहे.तर दिनांक २५ ज्यून रोजील सोपानकाकांचा पालखी सोहळा प्रस्थान करतो आहे.त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वच प्रशासनाकडून याबाबतची तयारी पूर्ण झाली असून हा सोहळा आनंदीमय वातावरणात निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सर्व प्रशासन प्रयत्नशील असल्याचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी म्हटले आहे.



   आ. संजय जगताप व पुरंदरच्या तहसीलदार यांनी आज पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी वाल्हे,नीरा या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या मार्गातील विसावा स्थळांची व मार्गाची पाहणी केली. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजना पुरेशा आहेत का? याबाबत त्यांनी आढावा घेतला. यानंतर त्यांनी नीरा येथील पालखीतळावर आल्यावर पत्रकारांशी संवाद साधत चांगल्या प्रकारची तयारी झाली असून पालखी सोहळा पारपाडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांनी म्हटले आहे. तालुक्यातील पिसुर्टी आणि दौंडज खिंड या ठिकाणी असलेल्या अरुंद रस्त्या बद्दल त्यांनी नॅशनल हायवे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना आपण दिल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांच्यासोबत पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, तालुका आरोग्याधिकारी विक्रम काळे, सासवडचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सौरभ गांधी , पुरंदर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमन, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जि.प.सदस्य विराज काकडे, सदस्य आभिषेख भालेराव,संदीप धायगुडे,वैशाली वाडेकर, सुदाम बंडगर, महसूल विभागातील तलाठी, ग्रामपंचायतीचे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



       यावेळी पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत म्हणाल्या की, सोहळ्यासाठीची प्रशासनाकडून पूर्णतः तयारी झाली असून नजरचुकीने एखादी गोष्ट राहिली असल्यास नागरिकांनी निदर्शनास आणून द्यावी. तर पंचायत समिती प्रशासनाच्यावतीने पिण्याचे पाणी , शौचालय उपलब्ध करून देण्यात आली असून संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी एक हजार शौचालये तर संत सोपानकाका पालखी सोहळ्यामध्ये मुक्कामाच्या ठिकाणी शंभर शौचालये उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी आमर माने यांनी दिली आहे.तर पिण्याच्या पाण्याची व आरोग्य याबाबतही पूर्ण तयारी झाल्याचे ते म्हणाले.


Wednesday, June 22, 2022

येत्या रविवारी होणार नवीन सरकारचा शपथ विधी?

 येत्या रविवारी होणार नवीन सरकारचा शपथ विधी?

 फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर



 मुंबई दि.२३


            शिवसेनेमध्ये बंडाळी करून बाहेर पडलेले शेनेचे गटनेते एकनाथ खडसे यांनी वेगळी चूल मांडलीआहे. त्यामुळे राज्यांमध्ये नवीनच सरकार स्थापन होणार असे स्पष्ट झाले. हे सरकार रविवारपर्यंत स्थापन होईल आणि या सरकारचा शपथविधी या रविवारी होईल अशा हालचाली आता सध्या सुरू झालेल्या आहेत.

           महा विकास आघाडीचे सरकार जाणार हे आता निश्चित झाले आहे. त्यानंतर आता भाजपच्यावतीने सरकार स्थापण्यासाठीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. येत्या रविवारी भाजपचं सरकार राज्यात येईल याबाबतच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. भाजपच्यावतीने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणीस आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये स्थापन केलेल्या 80 तासांच्या सरकारमध्ये अजित पवारांना जी ऑफर दिली होती तीच ऑफर भाजपने शिंदे यांना दिली आहे. शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदासह बारा मंत्रिपदे मिळतील अशी शक्यता आहे. शिंदे गटाला मंत्रिमंडळाकडून मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25% खाते मिळणार असल्याची माहिती समोर येते आहे तर दहा जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्यासाठी या मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. 


      शिवसेनेचे एकामागून एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गोटात जात असतानाच कॉंग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे. दरम्यान सरकार कोसळण्याची वेळ आल्यास मध्यावधी निवडणुका नको. असा सूर काँग्रेसच्या आमदारांकडून येत आहे. वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसून अशी मागणी काँग्रेस आमदारांनी कमलनाथ यांच्याकडे केली आहे. विधानसभा बरखास्त करू नका अशी मागणी कॉंग्रेसच्या कडून करण्यात येतेत आहे.

महाविकास आघाडी सरकार जाणार हे निश्चित

 महाविकास आघाडी सरकार जाणार हे निश्चित


एकनाथ शिंदे गट काढणार सरकारचा पाठिंबा 



मुंबई . दि.२३


    राज्यातील शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता  आघाडीचं सरकार जाणार हे आता निश्चित झाले आहे. लवकरच शिवसेनेचे गटनेते आणि वेगळा गट स्थापन करणारे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच पत्र राज्यपालांना देतील अशी माहिती समोर येतेय. त्यामुळे आघाडी सरकार आल्पमतात येणार आहे.

       एकनाथ शिंदे गटाकडे यापूर्वी 30 पेक्षा जास्त आमदार आले होते. त्यात आता आणखी तीन आमदारांची भर पडली आहे. त्यामुळे वेगळा गट स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या 36 आमदारांची संख्या एकनाथ शिंदे गटाकडे झाली आहे. एकनाथ शिंदे आज कोणत्याही क्षणी राज्यपालांकडे उद्धव ठाकरे सरकार यांचा पाठिंबा काढल्याचे  पत्र देणार असल्याची माहिती समोर येते आहे. यानंतर उद्धव ठाकरे सरकारला आपले संख्याबळ सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकार लवकरच जाणार हे आता स्पष्ट होत आहे. गुहाटी  येथील आमदार असलेल्या रेडीसन हॉटेल बाहेर मोठा बंदोबस्त पाहायला.मिळतो आहे.  एकनाथ शिंदे यांच्याकडे या पूर्वी 33 ते  34 आमदार  होते यानंतर आता आणखी तीन आमदार या गटाला मिळाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ हे फुटीर  गटाकडे वाढले  आहे. गुहाटी येथून आता घडामोडी वाढलेल्या आहेत .या ठिकाणी जास्तीचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आघाडी सरकार आता जाणार हे निश्चित झाले आहे

सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते एस.एम. देशमुख यांना देण्यात येणार जीवन गौरव पुरस्कार

 सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते एस.एम. देशमुख यांना देण्यात येणार जीवन गौरव पुरस्कार




पुणे दि.२२


         पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक आणि मराठी पत्रकार परिषदेने मुख्य विश्वस्त, राजकीय विश्लेषक एस.एम देशमुख यांना पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.. शनिवार दिनांक २५ जून रोजी पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात सकाळी ११ वाजता हा दिमाखदार सोहळा संपन्न होत आहे..


            ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते देशमुख यांना सन्मानित करण्यात येत आहे.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय महाराष्ट्र वाहिनीचे संपादक प्रसाद काथे असतील तर विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते अँड. असिम सरोदे उपस्थित राहात आहेत. ..यावेळी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला संघटक जान्हवी पाटील, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन आदि परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत..


           एस.एम देशमुख यांनी पत्रकारांच्या हक्कासाठी आणि हितासाठी आपले आयुष्य वेचले.. त्यांच्या सतत तीस वर्षांच्या अथक परिश्रमातून आणि संघर्षातून राज्यातील पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळाले, पत्रकार संरक्षण कायदा असणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.. याचे सर्वस्वी श्रेय एस.एम यांना आहे.. पत्रकार पेन्शन योजना, पत्रकार आरोग्य योजनेसह पत्रकारांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावून पत्रकारांना मोठा आधार दिला.. एखादा पत्रकार आजारी असेल, एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला असेल तर संबंधित पत्रकारांना पहिल्यांदा देशमुख यांची आठवण होते आणि ते गरजू पत्रकारांच्या मदतीला धावून देखील जातात याचा अनुभव राज्यातील अनेकांनी घेतला.. राज्यातील पत्रकारांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारया एस.एम यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य असल्याचे पिंपरी - चिंचवड पत्रकार संघाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे..


            पत्रकारांचे कंठमणी असलेल्या एस.एम. यांच्या सत्कार सोहळ्यास राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, संघटक सुनील नाना जगताप, सोशल मिडीया परिषदेचे जिल्हा प्रमुख जनार्दन दांडगे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, बाळासाहेब ढसाळ,अरूण नाना कांबळे आदिंनी केले आहे..सत्कार सोहळयापुर्वी सकाळी ९.३० वाजता पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.. यामध्ये अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत..



पालखीच्या मार्गातील हे व्यवसाय राहणार बंद

 पालखीच्या मार्गातील मांस विक्रीची दुकाने व  मद्यालये  राहणार बंद 



नीरा दि.२२


       संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा दरम्यान पालखी महामार्गावरील मांसाहारी  हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे ग ज्या गावातून पालखी सोहळा जाणार  आहे त्या गावातील मांसाहारी हॉटेल मद्यालये मच्छीमार्केट  व मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत.


दिनाक २१ मार्च ते २४ जून या दरम्यान पालखी सोहळा मार्गातील मुक्कामाच्या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमात असतात त्यावेळी तिथे मांस विक्रीची दुकाने, मांसाहारी हॉटेल,कत्तलखाने, मच्छीमार्केट,  मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावीत अशी मागणी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज  संस्थान कमिटी व श्री.संत तुकाराम महाराज संस्थानाने विनंती केली होती. त्याला अनुसरून  दोन्ही पालख्यामध्ये भाविकांची संख्या मोठी असल्याने पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल,कत्तलखाने,मच्छीमार्केट,माद्यालये ही पालखी सोहळा पुढे जाई पर्यंत बंद देवण्याबाबत व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.त्यामूळे आता पालखी ज्या गावात असेल तिथे या सर्व गोष्टी विक्री बंद असणार आहेत.


Tuesday, June 21, 2022

लाखो वारक-यांची उपस्थिती ; श्रींचे चलपादुका पालखीची ग्रामप्रदक्षिणा

 लाखो वारक-यांची उपस्थिती ; श्रींचे चलपादुका पालखीची ग्रामप्रदक्षिणा




आळंदी / प्रतिनिधीं : वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेली गळ्यात तुळशीमाळ,हातात भगव्या पताका मुखाने हरिनामाचा गजर करीत यावर्षी कोरोना महामारीच्या संकटाचे सावट फारसे नसल्याने लाखो भावीकांचे उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात माउलींच्या पालखीचे प्रस्थान भक्ती मार्गाचे दैवत श्री विठ्ठल भगवान पांडुरंगाचे दर्शन आणि वारीला जाण्यास माउली मंदिरातील विना मंडपातून मंगळवारी (दि.२१ )   रात्री 8 ; 30 च्या सुमारास हरिनाम गजरात झाले. यावर्षी प्रस्थानला लाखो वारकरी भाविकांची गर्दी झाल्याने प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. वारकरी,भाविकांचे उपस्थितीत श्रींचे पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले. आळंदी देवस्थानने प्रस्थान सोहळा थेट प्रक्षेपण व्यवस्था केल्याने लाखो भाविक, नागरिकांना सोहळा आपापल्या घरात राहून सुरक्षित पणे पाहत आनंदवारी सोहळ्याचा आनंद घेण्याची पर्वणी लाभली.      



 या प्रसंगी शिवसेनेचे खासदार बंडु जाधव,आमदार दिलीप मोहिते, रोहित पवार, श्रीकांत भारती, माजी मंत्री बाळा भेगडे,जिल्हाधिकारी डॉ्.राजेश देशमुख,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांत विक्रांत चव्हाण, उर्जितसिंह शितोळै सरकार, महादजी शितोळे, पालखी सोहळा प्रमुख अँड विकास ढगे पाटील, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर,राजेंद्र आरफळकर , प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त डॉ.अभय टिळक, आळदी नगरपरिषद प्रशासक तथा खेड तहसीलदार वैशाली वाघमारे, माजी नगराध्यक्षा वैजयंता उमर्गेकर, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, प्रेरणा कट्टे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, मानकरी बाळासाहेब कु-हाडे, योगेश आरु, अनिल कु-हाडे, मंडलाधिकारी स्मिता जोशी,दिंडी प्रमुख, फडकरी,दिंंडीकरी, मानकरी यांचे उपस्थितीत झाले. प्रस्थान दिनी श्रींचे पूजेचे पौरोहित्य अमोल गांधी,महेश जोशी,राजाभाऊ थेटे,योगेश चौधरी यांनी केले.  



   प्रस्थान सोहळ्याचे नियोजन यावर्षी थेट शासनाचे हस्तक्षेपात झाले. शासनाने वारी ला परवानगी दिली. मात्र गर्दी वाढेल या शक्यतेने पोलीस बंदोबस्त मोठा तैनात करीत स्थानीक नागरिकांना रहदारीला गैरसोय झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यावर्षी सोहळ्यावर कोरोना या महामारीचे संकट नसल्याने देखील प्रशासनाने पुरेशी दक्षता व काळजी घेत महसूल व पोलीस प्रशासनाने नियोजन करून आळंदी देवस्थान सोहळ्यातील संबंधित घटकांना विश्वासात घेऊन प्रस्थान पार पडले. प्रशासनास आळंदीकर नागरिक व भाविकांनी ही मोठा प्रतिसाद दिल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविता आले. यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त लावला.



 अलंकापुरीत प्रस्थान सोहळ्या पूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. मंदिरात भाविकांना दर्शनास दुपार पर्यंत सोय करण्यात आली होती. श्रींचे संजीवन समाधी दर्शनास भाविकांनी गर्दी केली.



 दरम्यान नऊ वाजता वीणा मंडपात परंपरेने कीर्तन सेवा झाली. दुपारी परंपरेने मंदिरात श्रीनां महानैवेद्य झाला. यासाठी प्रथम सेवेकरी व स्वकाम सेवक यांनी स्वच्छता स्वयंसेवक यांचे माध्यमातून सेवा रुजू केली. मंदिर प्राकार व श्रींचा गाभारा स्वच्छ केला. दरम्यान पाऊणे तींचे सुमारास दींड्या मंदिरात येण्यास हरिनाम गजरात सुरुवात झाली. वारकरी परंपरेच्या संप्रदायीक खेळ,हरिनाम गजराने स्वर टिपेला पोहोचला.मंदिर बाहेर भाविक वारकरी यांची मोठी गर्दी उसळली. दिंड्या सोडण्यास मात्र यावेळी आत येण्यास उशीर झाला. यावर्षी पालखी पायी वारी सोहळा असल्याने सोहळ्यातील इतर कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. सोहळ्यास यावर्षी परंपरेने सुरुवात झाली. दरवर्षी प्रस्थान दिनी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास श्रींचे रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात सोहळ्यातील परंपरे प्रमाणे चोपदार यांचे सूचनां प्रमाणे महाद्वारातून प्रवेश देण्यास सुरुवात झाली.मात्र आत येण्यास विलंब झाला.यावर्षी दिंड्या व संबंधित दिंडी प्रमुख, वारकरी घटकांचे स्थानिक प्रतिनिधी यांना देखील प्रवेश देण्यात आला. दरम्यान श्रींचे मंदिरात माउलींच्या समाधीवर ब्रह्मवृंदाच्या वतीने श्रीनां वैभवी पोशाख झाल्या नंतर श्री गुरू हैबतरावबाबांच्या वतीने माउलींच्या समाधीची परंपरेने आरती हरिनाम गजरात झाली. त्यानंतर माउली संस्थांनचे तर्फे श्रींची आरती करण्यात आली. दरम्यान श्रींचे वैभवी चांदीचे पादुका प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या चौथ-या वर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या. श्रींचे चलपादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाली. या वेळी सोहळ्यातील नियमा प्रमाणे आळंदी संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना पागोटे वाटप, श्रीगुरू हैबतरावबाबांच्या वतीने दिंडी प्रमुखांना पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर,बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते नारळ प्रसाद वाटप झाले. श्रींचे संजीवन समाधी गाभाऱ्यात आळंदी देवस्थान च्या वतीने परंपरेने मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला.परंपरेने धार्मिक उपक्रम होताच श्रींचे चलपादुका देवस्थान तर्फे पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र व बाळासाहेब आरफळकर यांचे कडे देण्यात आल्या. मालक आरफळकर यांचे नियंत्रणात श्रींचे पादुका पालखीतून मंदिर प्रदक्षिण हरिनाम गजरात झाली. श्रींची वैभवी चलपादुका मालकांकडे हरिनाम गजर करीत पालखीत ठेवूंन विधिवत पूजा होताच श्रींची पालखी आळंदीकर ग्रामस्थ यांनी नाम जय घोष करीत खांद्यावर उचलीत माउलींच्या वारीला जाण्यास वीणा मंडपातून सायंकाळी पंढरी कडे प्रस्थान ठेवले. माऊलींचे पादुकां पालखीची हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर श्रींचे पादुका पालखी सोहळा आजोळघरा लगतच्या जुन्या रामवाड्याचे गांधी वाड्यात दर्शनबारी सभागृहात हरिनाम गजरात आणण्यात आल्या. येथे सोहळ्यातील परंपरांचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा सोहळा विसावला. येथे गांधी परिवार तर्फे परंपरेने सोहळ्याचा पाहुणचार होत आहे.आळंदीत यावर्षी पहिला एक मुक्काम होत श्रींची पालखी पुढील दोन दिवसांचे मुक्कामासाठी पुण्या बुधवारी ( दि.२२) मार्गस्थ होईल. यावर्षीची पायी वारी असल्याने लाखो भाविकांची सोहळ्यास उपस्थिती राहिली. आळंदी देवस्थान ने श्रींचे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण व्यवस्था केल्याने घरी राहून लाखो नागरिकांना सोहळा पाहता आला. यावर्षी श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा, ग्राम प्रदक्षिणा हरिनाम जय घोषित झाली. आळंदी मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट व आकर्षक रंगावली, मंदिरात व इंद्रायणी नदी घाटावर लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली. नदी घाटावर देहू आळंदी विकास समितीचे वतीने विविध लोकशिक्षण पार कार्यक्रम झाले. विद्युत रोषणाईने भाविकांची मने जिकली. थेट प्रक्षेपण असल्याने नागरिकांनी घरात राहून पालखी सोहळ्याचा आनंद लुटला.  

श्रींचे प्रस्थान दिनी मंदिरात श्रींचे पौरोहित्य करण्यासाठी पहाटे काकडा आरती चार वाजता , पवमान अभिषेख व श्रींची पहाट आरती पूजेसाठी श्रीक्षेत्रोपाध्ये पुजारी वेदमूर्ती प्रसाद जोशी, अमोल गांधी, सौरभ चौधरी यांनी तसेच प्रस्थांची मुख्या पूजे साठी योगेश चौधरी,अमोल गांधी, सौरभ चौधरी, महेश जोशी यांनी परंपरेने पौरोहित्य केले.



 श्रींचे नगरखान्याचे मानकरी बाळासाहेब भोसले यांनी श्रींचे पालखी प्रस्थान साठी लक्षवेधी नगारखाना सजविला. श्रीचे पालखी व्यापारी तरुण मंडळ माऊली ग्रुप ने तर पालखी रथ सुदीप गरुड आणि परिवाराने सजविला. यावर्षी रथ ओढण्यासाठी सेवा पांडुरंग वरखडे आणि तान्हाजी वरखडे यांनी रुजू केली आहे. श्रींचे वैभवी पालखी रथाला शोभेल अशी आकर्षक बैलजोडी ने रथाचे तसेच सोहळ्याचे वैभव वाढविले आहे. यासाठी सोन्या माउली बैलजोडही यावर्षीची रथ सेवा देणार आहे. श्रींचे सोहळ्यात चवरी ढाळण्याची सेवा योगीराज कुऱ्हाडे यांचे कडे तर अबधागिरी सेवा योगेश आरू, माजी नगराध्यक्ष राहुल चीताळकर पाटील, आरतीचे मानकरी अनिल कुऱ्हाडे यांचे कडे आहे. यावर्षीची परंपरेने श्रींचे सोहळ्यात चोपदार बाळासाहेब रणदिवे यांची सेवा रुजू होत आहे. ताथवडे गावचे प्रगतशिल शेतकरी ह,भ,प, प्रकाश पवार यांचा चार वर्षांचा नातु रुद्रंराज सोमनाथ पवार श्रींचे प्रस्थान दिनी लक्षवेधी वारकरी वेशात सजला होता. श्रींची कोठी सजावट व जमवाजमव अगदी मिठापासून मिरची, हळद, हिंग, मोहरी, सुई दोरा, रथाचे नियोजन पर्यंत वारी सोहळ्यासाठी आवश्यक साहित्य व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी संकलन केले.

Monday, June 20, 2022

राष्ट्रवादीने पाच मते ठेवली राखून

 राष्ट्रवादीने पाच मते ठेवली राखून



मुंबई दि.२०

राष्ट्रवादीने  काँगेस पक्षाने आपल्या पाच महत्वाच्या नेत्यांची मते मागे ठेवली आहेत.त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील उत्सुकता आता वाढली आहे.त्यातच  असताना  एक भाजपा एक नेता  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेला आहे.


           भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. यातच आमदार रवी राणा विधान भवनात पोहोचले आहेत. यामुळे बावनकुळे हे नेमके कशासाठी अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेत हे समजू शकलेले नाही. दरम्यान, अजित पवार, एकनाथ खडसे आणि बावनकुळेंमध्ये चर्चा सुरु असल्याचे समजते.




शिवसेनेच्या आमदारांची बस  यायला उशीर झाला होता. वाहतूक कोंडीत ही बस अडकली होती. यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी भाजपा, राष्ट्रवादीनंतर मतदान करण्यास सुरुवात केली. श उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारांना कोणाला, कसे मतदान केले याचे मार्गदर्शन केले. परंतू दोन आमदार विधान भवनात आलेच नव्हते. आणखी दोन आजी-माजी मंत्री तुरुंगात असल्याने ही दोन मते देखील राष्ट्रवादीला मिळणार नाहीएत.


या निवडणुकीत   आतापर्यंत २०३ आमदारांनी मतदान केले आहे. भाजपाने १०५ हून अधिक आमदारांचे मतदान झाले आहे. तर राष्ट्रवादीने देखील आपल्या आमदारांचे मतदान पार पाडले आहे. परंतू, पाच महत्वाचे नेते मागे राहिल्याने ही नेमकी खेळी कशासाठी याबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

शरद- विजय सोसायटीच्या नीरा येथील नवीन इमारतीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

 कर्नलवाडी येथील शरद- विजय सोसायटीच्या नीरा येथील नवीन इमारतीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन



नीरा दि.२०


      पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या नीरा येथे बाढण्यात आलेल्या नवीन इमारतीचे आज दिनांक १८ जून रोजी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.कर्नलवाडी सारख्या छोट्या गावातील सोसायटीने चांगल्या प्रकारची इमारत बांधल्या बद्दल आमदार संजय जगताप यांनी कौतुक केले.



         २०० सभासद आणि तुटपुंज्या भंडवलावर ही संस्थ सुरू झाली असली तरी या संस्थेने चांगली इमारत बांधली, खते व शेती उपयोगी साहित्याचे दुकानं सुरू केले. त्याच बरोबर सभासाद संख्याही आता ६०० झाली आहे.असे म्हणत त्यांनी संस्थेच्या प्रगती बद्दल कौतुक केले.



  यावेळी ,माजी आमदार अशोकराव टेकवडे, सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, विजय कोलते, उपसरपंच राजेश काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे,संचालक जितेंद्र निगडे,माजी उपाध्यक्ष उत्तम धुमाळ, माजी संचालक दिलीप थोपटे, काँग्रेसचे प्रदीप पोमन, महेश राणे, माणिकराव चोरमले,राजेंद्र बरकडे. किरण गदादे, संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव बुवासाहेब निगडे व्हॉईस चेअरमन दिलीप बबन निगडे, संचालक अशोक निगडे, बाळासो निगडे, प्रमोद निगडे, श्रीकांत निगडे, रणजित निगडे, निलेश भोसले, नरेंद्र रासकर, ज्योतीराम कर्णवर, भानुदास पाटोळे, शुभांगी निगडे,विमल निगडे, कृष्णराव निगडे, मच्छिंद्र गदादे, सचिव संदीप ताकवले सहाय्यक मंगेश उर्फ निखिल निगडे, इत्यादीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Sunday, June 19, 2022

सोशल मिडीयाची कार्यशाळा व एस.एम. देशमूखांना जिवनगौरव पुरस्कार.

 सोशल मिडीयाची कार्यशाळा व एस.एम. देशमूखांना जिवनगौरव पुरस्कार.


पिंपरी- चिंचवड शहर पत्रकार संघाने भव्यदिव्य कर्यक्रमाचे केले आयोजन.



पुणे : दि.२०

    मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ व पुणे जिल्हा सोशल मिडिया परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल मिडीयाची कार्यशाळा व परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस.एम.देशमुख यांना जिवनगौरव पुरस्कार सोहळा होणार आहे. पिंपरी- चिंचवड शहर पत्रकार संघाने हा भव्यदिव्य कर्यक्रमाचे आयोजीत केला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक रविवार दि. १९ रोजी झुम अँप द्वारे झाल्याची माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी दिली आहे.



      पुणे जिल्ह्यातील सोशल मिडीया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची कार्यशाळा व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस.एम.देशमुख यांना  जिवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. हा भव्यदिव्य सोहळा पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाने शनिवार दि. २५ जून रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमा बाबत झुम मिटिंग रविवारी सायंकाळी ५ वाजता यशस्वी पद्वतीने झाली. या बैठकील बहुसंख्येने मराठी पत्रकार परिषदेचे, पुणे जिल्हा संघाचे, सोशल मिडिया परिषदेचे सदस्य हजर होते. प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे आपले मत मांडत कार्यक्रम भव्य दिव्य करण्याचे तसेच आपल्या तालुक्यातील व परिसरातली जस्तीत जास्त पत्रकार बांधव या कार्यशाळेसाठी आणण्याची ग्वाही दिली. 




  या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस.एम.देशमुख, कर्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा समन्वयक सुनिल जगताप, परिषद प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार एम.जी. शेलार, सुनील वाळूंज, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, सोशल मिडिया परिषदचे जिल्हा प्रमुख जनार्दन दांडगे, उपाध्यक्ष राहुल शिंदे, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडगूले, सचिन कांकरिया, संतोष वळसे पाटील, दादाराव आढाव, राजेंद्रबापू काळभोर, जयेश शहा, दौंड तालुका अध्यक्ष रविंद्र खोरकर, वेल्हा तालुका अध्यक्ष राजेंद्र रणखांबे, बारामती तालुका अध्यक्ष हेमंत गडकरी, पुरंदर सोशल मिडियाचे सचिव स्वप्नील कांबळे आदिंनी सहभाग घत मते मांडली.

कर्नलवाडी येथे झारखंड मधील ३० वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या.

 कर्नलवाडी येथे झारखंड मधील ३० वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या.



नीरा दि.१९


 पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे आज दि.१९ जून रोजी एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.  घटने नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन  मृत व्यक्तीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


      याबाबत प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कर्नलवाडी येथे प्रेमकुटी या  पुण्यातील जोगळेकर यांच्या फॉर्म हाऊस मध्ये  झारखंड येथील मूळ रहिवासी असलेल्या मुकेश ठाकूर या ३० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.   त्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कामगारांसाठी बनवलेल्या खोली मध्ये हा मृत देह आढळून आला. नीरा दूर्क्षेत्राचे फौजदार सुदर्शन होळकर, हवालदार संदीप मोकाशी व निलेश जाधव,पोलीस पाटील दिनेश खोमणे यांनी घटनास्थळी जावून या बाबतचा प्राथमिक तपास केला. यानंतर  मृत देह उत्तरीय तपासणीसाठी जेजुरी येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.दरम्यान पोलिसांनी याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.याबाबत अधिकाचा तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुदर्शन होळकर करीत आहेत.

Thursday, June 16, 2022

नीरा येथे राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई ; लाखो रुपयांचा विदेशी दारू केली जप्त

 नीरा येथे  राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई ; लाखो रुपयांचा विदेशी दारू केली जप्त

     


 

नीरा दि.१६

   नीरा ता.पुरंदर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने  धडक कारवाई करत विदेशी दारूचा मोठा मद्यसाठा जप्त केला आहे. यामध्ये ६६ लक्ष रुपयाची तस्करी करण्यात येत असलेली दारू सह एकूण ९१७७६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

        याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार दि.१५ जुन २०२२  रोजी राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक यांना मिळाल्यालेल्या गुप्त बातमी नुसार पुरंदर तालुक्यातील नीरा गावच्या हद्दीत नीरा - लोणंद रोडवर  हॉटेल न्यू प्रसन्ना समोरील रोडवर गोवा राज्यातून विक्री असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती समजली . त्या अनुषंगाने नीरा गावच्या परिसरातील हॉटेल न्यू प्रसन्न समोरील रोडवर  राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक क्रमांक २  पुणे विभागाने सापळा लावला असता मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार भारत बेंज कंपनीचा ट्रक त्यांना दिसून आला. सदर ट्रक चालकास ट्रक रोडच्या कडेला घेण्याचा इशारा केला असता, ट्रकचालकाने सदर रोडच्या कडेला उभा केला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा व बिअरचा साठा ममिळाला त्यावरून ट्रक चालक प्रवीण परमेश्वर पवार वय २३ वर्षे राहणार तांबोळे, तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याला जागीच अटक करून ताब्यात घेतले आहे.

 

 ही कारवाई आयुक्त कांतीलाल उमाप ,संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अधीक्षक चरण सिंग बी.राजपूत, उपाधीक्षक संजय आर. पाटील ,युवराज एस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २  या पथकाने केली आहे. सदर कारवाई निरीक्षक तानाजी शिंदे,डी. परब, दुय्यम निरीक्षक, बी.बी. नेवसे, जी. नागरगोजे, पी. डी.दळवी,वाय.एस.लोळे, एम.डी.लेंढे, सर्वश्री जवान एस. बी. मांडेकर ,एन.जे. पडवळ,बी. राठोड, एम. कांबळे, बनसोडे ए.यादव, आर. पोटे व महिला जवान  मनिषा भोसले यांनी सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक तानाजी शिंदे हे करीत आहेत.

Tuesday, June 14, 2022

ग्रामस्थांनी स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे : तेजश्री काकडे

 ग्रामस्थांनी स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे : तेजश्री काकडे


नीरेत नवीन घंटागाडीचे लोकार्पण



नीरा: दि.१४


     नीरा (ता.पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आणखी एका नव्याने घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी काकडे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, उपसरपंच राजेश काकडे, सदस्य अभिषेक भालेराव, अनंता शिंदे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री काकडे सदस्या राधा माने, सारिका काकडे, माधुरी वाडेकर यांच्या हस्ते या घंटागडीचे पूजन करण्यात आले. माजी उपसरपंच विजय शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून ही गाडी ग्रामपंचायतीचा स्वच्छ्ता विभागाच्या ताब्यात देण्यात आली. 



यावेळी उपसरपंच राजेश काकडे म्हणाले की,१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ही घंटागाडी घेण्यात आली आहे. ग्रामपंचायतीकडे असलेल्या काही घंटागाड्या अद्याप नादुरुस्त आहेत. त्याही दुरुस्त करून सेवेत आणल्या जाणार आहेत. त्यामुळे चार घंटागाड्या आणि एक ट्रॅक्टर ग्रामपंचायतीकडे असणार आहे. पुढील काळात वेळापत्रक ठरवून नीरेतील सर्व वार्ड मधून या घंटागाड्या मार्फत कचरा गोळा केला जाईल. 

मागील काळात स्वच्छते संदर्भात ग्रामपंचायतीने केलेल्या उपयोजना लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. स्वच्छ नीरा सुंदर नीरा हे आमचे ब्रीद आहे. तशी स्वच्छता ठेवण्याचा आमचा सततचा प्रयत्न आहे. ग्रामस्थांनी या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच तेजश्री काकडे यांनी केले. 

फोटोओळ : नीरा ग्रामपंचायतीच्या नव्या घंटागाडीचे पुजन करताना सरपंच तेजश्री काकडे व ग्रामपंचायत सदस्या.

वडाच्या झाडांची संख्या घटल्याने महिलांना करावी लागते कुंडीतील वडाची पूजा

 

शहरी, निमशहरी भागात वडाच्या झाडाची संख्या घटल्याने महिलांना करावी लागतेय कुंडीतील वडाची पूजा.



आपले कुटुंब एकत्र राहावं त्याच बरोबर निसर्गाचाही संवर्धन  व्हाव हा संदेश देणारा वटपौर्णिमेचा सण आज सर्वत्र साजरा होतोय. मात्र शहरी आणि निमशहरी भागांमध्ये वडाची मोठी झाडेच नसल्याने महिलांना नाईलाजाने परंपरा म्हणून कुंडीतील वडाच्या झाडांची पूजा करावी लागतेय



  भारतीय संस्कृती नुसार अनेक सन उत्सव व  परंपरांचं पालन केलं जातं. यातून कुटुंब व्यवस्था बळकट कशी राहील यासाठी प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर मनुष्य निसर्गाच्या सानिध्यात राहून त्याच्या मनामध्ये निसर्गाबद्दल प्रेम आणि जिव्हाळा वाढावा म्हणून वेगवेगळ्या प्रथा निर्माण केल्याl आहेत.. तिकडे पाश्चात्त्य देशात घटस्फोटाचं प्रमाण वाढत असताना आपल्या देशात मात्र पती-पत्नीचं नातं वृद्धिंगत व्हाव म्हणून वर्षानुवर्षे वटपौर्णिमा सारखे सण साजरे केले जातात. यावेळी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.  वडाचे झाड म्हणजे २४ तास ऑक्सिजन देणारे आणि सावली देणार झाड मनुष्याच्या आणि प्राण्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त झाड. याचं जतन व्हावे असा संदेश या सणातून दिला गेला आहे. मात्र जशी लोकसंख्या वाढत जाते तस-तशी गावातील वडाच्या झाडांची संख्या सुद्धा संपुष्टात आली आहे. आता तर महिलांना पूजेसाठी सुद्धा वडाचे झाड शहरात दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे महिलांना कुंडीतील वडाच्या झाडाची किंवा फांदीची पूजा करून हा सण साजरा करावा लागतो  पुरंदर तालुक्यातील नीरा येथील महिलांनी सुद्धा आज दिनांक 14 जून रोजी कुंडीतील वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची व सात जन्म साथ निभावण्याची मनोकामना व्यक्त केलीय..

Monday, June 13, 2022

चंदुकाकांची परंपरा कुटुंबाने पुढे चालविली.                   

 चंदुकाकांची परंपरा कुटुंबाने पुढे चालविली:रदार कुलतारसिंग संधवान

    चंदुकाका जगताप स्मृती छाया स्मारकाचे  लोकार्पण.    



सासवड दि.१३                                     

           सहकार रत्न स्व.चंदूकाका जगताप यांच्या विकासाची आणि जनसेवेची परंपरा त्यांच्या कुटुंबाने पुढे चालविली. या कुटुंबाला उज्वल भवितव्य आहे. चंदूकाकांच्या कर्तृत्वाची धमक, जिद्द आणि चिकाटी या जोरावर त्यांनी  32 किमी वरून पिण्याचे पाणी आणून फार मोठे काम केले आहे,अशा शब्दांत पंजाबचे विधानसभा अध्यक्ष सरदार कुलतार सिंग संधवान यांनी चंदुकाका जगताप यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.                                            

             दिवंगत लोकनेते सहकाररत्न चंदूकाका जगताप यांच्या 73 व्या जयंतीनिमित्त शनिवारी सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्मारकातील स्व.जगताप यांच्या 10 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच जीवन कार्य व प्रवासातील विविध प्रसंगाबाबतची छायाचित्रांसह माहिती  'चंदुकाका जगताप स्मृति छाया स्मारक',चंद्रानंद सभागृह आणि शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सीबीएसई विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सरदार कुलतार सिंग यांच्या हस्ते झाले .याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार गजानन कीर्तिकर, खासदार सुप्रिया सुळे, आनंदी काकी जगताप,राजेंद्र जगताप,आमदार संजय जगताप, राजेंद्र मोगल पाटील,डाॅ.अस्मिता जगताप,राजवर्धिनी जगताप,अर्चना संजय मोरे, सोनाली सिद्धार्थ शिंदे यांसह काकांचे कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण करण्यात आले आणि जनक नावाने प्रकाशित होत असलेल्य स्मरणिकेचे अनावरण त्याचप्रमाणे भारतीय डाक विभागाच्या अंतर्गत सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 1हजार  मुलींच्या पॉलिसीचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले.         

            आमदार संजय जगताप यांनी चंदूकाकांची शिस्त, संस्कार,आदरयुक्त भीती, अथक परिश्रमाची शिकवण अशा आठवणींना उजाळा दिला.सहकारी, शैक्षणिक,सामाजिक संस्थात्मक कामाचा आढावा घेत मान्यवरांचे स्वागत केले. तर सनदी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी प्रास्ताविकातून स्व.चंदूकाका जगताप यांची सुरुवातीपासूनची कौटुंबिक माहिती,स्वभाव, संघर्ष, जिद्द आदी विविध पैलूंवर बोलत जीवनप्रवास उलगडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल उरवणे, प्रा. नंदकुमार सागर, महेश राऊत ,सागर जगताप यांनी तर प्रदीप पोमण यांनी आभार मानले.

       चंदुकाकांच्या स्मृती जपत संजयला जपा.         

               चंदूकाकांचे व्यक्तिमत्व राजहंसाप्रमाणे होते. परिस्थितीवर मात करून शेकडो संस्था उभ्या करण्याचे त्यांचे रेकॉर्ड ठरेल.काकांच्या कामांचा वारसा समर्थपणे राजेंद्र जगताप व आमदार संजय जगताप पुढे घेऊन जात आहेत.त्यांचे भवितव्य चांगले असून एक कष्टाळू आमदार पुरंदरला मिळाला आहे.त्यांना जपण्याचे आणि वाढवण्याचे काम सर्वांनी करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महसूलमंत्री थोरात याप्रसंगी म्हणाले.


बालविवाहावरुन वातावरण तापले : गावच्या मूलभूत सुविधा बघायच्या का ? पोरा - पोरींच्या लग्नाचे वय

 बालविवाहावरुन वातावरण तापले : गावच्या मूलभूत सुविधा बघायच्या का ? पोरा - पोरींच्या लग्नाचे वय तपासायचे , सरपंच परिषद आक्रमक





      दि.१३:- बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या  अंमलबजावणीवरुन गावकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. गावातील मूलभूत सोयी-सुविधा बघायच्या, निधी खेचून आणायचा की, गावातील मुला-मुलींच्या लग्नाचे वय तपासयाचे असा आक्रमक पवित्रा अखिल भारतीय सरपंच परिषदेने घेतला आहे. गावात बालविवाह रोखण्यात अपयश आल्यास त्याची किंमत सरपंचांनीच का चुकवायची असा सवाल परिषदेने केला आहे. अगोदरच गावांसाठी विकास निधी आणताना नाकीनऊ येत  व हा भलता ताप कशाला अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. गावात बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि नोंदणी अधिका-यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्यावर कामात कसूर म्हणून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर राज्य सरकारने त्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याविषयीची माहिती एका कार्यक्रमादरम्यान दिली. त्यानंतर या निर्णयाला सरपंचांनी विरोध सुरु केला आहे.

गावातील सरपंच, सदस्यां व्यतिरिक्त पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विविध सहकारी संस्था, आमदार आणि खासदार हे सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना सोडून लोकप्रतिनिधी म्हणून सरकार सरपंचांनाच का जबाबदार धरत आहे. गावकीच्या व्यापात सामाजिक जबाबदा-या सरपंच म्हणून पार पाडव्याच लागतात. पण कायद्याचे बंधन घालून सरपंचावरच कारवाईचा बडगा का उगारण्यात येत आहे, अशी विचारणा सरपंच परिषदेने विचारली आहे. या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शविला आहे. बालविवाह रोखण्याची जबाबदारी सर्वांचीच असून यासाठी समाजात जागरुकता आणण्याची गरज असल्याचे परिषदेने म्हटले आहे. परिषदेचे जयंत पाटील यांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.

सरंपचांपेक्षा सामाजिक संस्था अग्रेसर

पुणे येथे आयोजीत एका कार्यशाळेत चाकणकर यांनी सामाजिक संस्थांची पाठ थोपटत सामाजिक संस्थांनी बालविवाह रोखण्यात सिंहाचा वाटा उचलल्याचे कौतूक केले होते. पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सरपंच यांच्यापेक्षा त्यांनी केलेली कामगिरी सरस असल्याचा दावा त्यांनी केला होता. बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार, बालविवाह झाल्यास नववधू-वराचे आई-वडिल, मंगल कार्यालयाचे मालक, पुरोहित आणि छायाचित्रकार यांच्यावर गुन्हा दाखल होतो. शासनाने या कायद्याची व्याप्ती वाढवत यामध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि नोंदणी अधिका-यांचा समावेश केला आहे. बालविवाह कायद्यान्वये कुटुंबासोबतच गावातील ग्रामपंचायतीचा गाडा हाकणा-यांनाही सरकारने बालविवाह रोखण्यासाठी जबाबदार धरले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हाच नाही तर त्यांना पदावरुन पायउतार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आळंदीत माऊलींचे पालखी रथ बैलजोडीची मिरवणूक

 आळंदीत माऊलींचे पालखी रथ बैलजोडीची मिरवणूक





आळंदी दि.१३ : येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी रथ आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यातील श्रींचा वैभवी रथ ओढणा-या बैलजोडीचा यावर्षी पांडुरंग वरखडे तानाजी वरखडे यांना मिळाला असून त्यांनी रथ ओढण्यास आणलेल्या बैलजोडीची आळंदीत श्री स्वामी महाराज मठ येथून नगरप्रदक्षिणा मार्गे माऊली मंदिर अशी मिरवणूक हरिनाम जयघोषात झाली. यावेळी शहरात ठीक ठिकाणी ग्रामस्थांनी बैलजोडीचे स्वागत पूजा करून केले. 

 माऊलींचे मंदिर महाद्वारात ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे बैलजोडीची पूजा करण्यात आली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख  विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, माजी नगरसेवक नंदकुमार कुऱ्हाडे विलास घुंडरे, डी. डी. भोसले पाटील, रामदास भोसले, तुषार घुंडरे, विष्णू वाघमारे, ज्ञानेश्वर रायकर, श्रींचे मानकरी योगिराज कुऱ्हाडे, योगेश आरु, मयुर घुंडरे,प्रमोद कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिघे, संदेश तापकीर, नितीन घुंडरे, पुष्प सजावटीचे सेवेकरी सुदीप गरूड, माऊली वहिले, हनुमंत घुंडरे, माऊली गुळुंजकर, गोविंद कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. 

  कोरोनाचे महामारीचे संकट काळाने गेल्या दोन वर्षातील श्रींचा वैभवी पालखी सोहळा मोजक्या भाविकांत अटी शर्तीचे बंधनात झाला. यावर्षी मात्र कोरोनाचे संकट फारसे नसल्याने शासनाने अति आणि शर्ती घालून सोहळ्यास परवानगी दिली असल्याने सोहळा मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरा होणार असल्याचे चित्र आहे. आळंदी देवस्थानचे बैल समितीने दिलेल्या मंजुरी प्रमाणे येथील ग्रामस्थ चेअरमन पांडुरं वरखडे आणि तानाजी वरखडे यांनी श्रींचे सोहळ्याचे वैभव वाढविण्यासाठी रथाची बैलजोडी  पुण्यातील फुरसुंगी मधील प्रगतशिल शेतकरी खुडवड यांचेकडून विकत घेतली आहे. या बैलजोडीची आळंदीत भव्य मिरवणूक उत्साहात वाजत गाजत , हरिनाम जयघोषात झाली. यावेळी भाविक,नागरिकांनी मोठी गर्दी केली. स्वामी महाराज मठापासून चाकण चौकातून मिरवणूक सुरु झाली. स्वामी महाराज यांचे पुजारी श्रीक्षेत्रोपाध्ये गांधी परीवारांतर्फे पुजा करण्यात आली.

सासवड जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर .

 सासवड जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर .



सासवड दि.१३


   सासवड आणि जेजुरी   नगरपरिषदेच्या  निवडनुकीसाठीचीआरक्षण सोडत आज दिनांक १३ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे.सासवड नगर परिषदेसाठी या निवडणुकीत एकूण ११  प्रभाग असणार आहेत. प्रत्येक प्रभागात  २ जागा असणार आहेत.

        यामध्ये प्रभाग क्रमांक ४ मध्ये एक जागा अनुसूचित जातीच्या महीलेसाठी राखीव असणार आहे तर एक जागा सर्वसाधारण असणार आहे.प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक जागा अनुसूचित जमातीसाठी तर एक जागा सर्वसाधारण महीले करता राखीव असणार आहे. इतर सर्व प्रभागांमध्ये एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी व एक जागा सर्वसाधारण असणार आहे.अशा प्रकारची सोडत उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी जाहीर केली आहे.आरक्षण सोडती बाबत हरकती व सूचना असल्यास दिनांक १५ जून पर्यंत नगरपरिषद कार्यालयात सादर कराव्यात असे मुख्याधिकारी निखील मोरे यांनी म्हटले आहे.


 जेजुरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये एका जागा अनुसूचित जातीसाठी व  १ जागा  सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असणार आहे. 

     प्रभाग क्रमांक 2 ,३,४,५,६ ,७ आणि १० या प्रभागामध्ये सर्वसाधारण महिला साठी प्रत्येकी एक जागा  व सर्वसाधारण खुल्या गटासाठी प्रत्येकी एक जागा असणार आहे. तर प्रभाग क्रमांक ८ मध्ये अनुसूचितजातीच्या महिलेसाठी एक जागा   व एक जागा सर्वसाधारण खुली असणार आहे,  प्रभाग क्रमांक ९  मध्ये अनुसूचित महिलेसाठी एक  व सर्वसाधारण खुल्या वर्गाची एक जागा असणार आहे.अशा प्रकारे जेजुरी नगर परिषदेसाठीच्या निवडणुकीची  आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

पिंपरी येथील महिलेची जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक एका वकिलासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

 पिंपरी येथील महिलेची जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक एका वकिलासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल



सासवड दि.13

पुरंदर तालुक्यातील पिंपरी येथे राहणाऱ्या एका महिलेला वारसाची नोंद करायचे आहे असे सांगून तिच्याकडून जमिनीची खरेदी खत करून घेऊन तिला कोणत्याही प्रकारे पैसे न देता तिची फसवणूक केल्याचा प्रकार पुरंदर तालुक्यात उघड झलाय.... यासंदर्भात पिंपरी येथे राहणाऱ्या संगीता महादेव सेंडकर यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी मयत एडवोकेट किरण सुरेश फडतरे, सौरभ रामचंद्र वडणे, सुरेश फडतरे, तुषार विजय मिरजकर, अनिल विनायक जगताप, सर्वांनी मार्च 2016 ते डिसेंबर 2021 या दरम्यान त्यांची फसवणूक केली.. त्यांच्या पतीची पिंपरी येथे असलेल्या जमिनीवर वारस नोंद करायची आहे असे सांगून.... फसवणूक करून त्यांचे गट नंबर 104, 407,456 मधील जमीन त्यांच्याकडून खरेदीखत करून घेतली यासाठी त्यांचं पॅनकार्ड आणि ॲक्सिस बँकेत काढण्यात आले. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारे लिहिता वाचता येत नसताना सुद्धा त्यांची खोटी सही करून त्यांची फसवणूक केली. याबाबतची फिर्याद त्यांनी दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 420 ,468,471, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे

सासवड शहरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

 सासवड शहरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

जुगार चालवणाऱ्या दोघांना अटक 



सासवड दि.१३

पुरंदर तालुक्यातील  सासवड शहरातील खंडोबनगर परिसरामध्ये सुरू असलेल्या  जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी हा अड्डा चालवणाऱ्या दोघांना अटक केलीय. पोलिसांनी त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिस कॉन्स्टेबल प्रतीक दिवाण यांनी सरकारी फिर्याद दिली आहे.

      

     यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड येथील खंडोबानगर परिसरामध्ये दिनांक 12 जून 2022 रोजी आरोपी सतीश शितोळे व सोमनाथ बाळासाहेब खोमणे हे  चिवचिव जुगार अड्डा चालवत  होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी  त्यांच्याकडून  जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये एकूण  १५०४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत अधिक तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

पिंगोरी येथील सोसायटीचा चेअरमनपदी कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड

 पिंगोरी येथील सोसायटीचा चेअरमनपदी कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड


 तर व्हाईस चेअरमनपदी अजय भोसले यांची निवड



नीरा दि.१३


पिंगोरी (ता.पुरंदर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली, तर व्हाईस चेअरमनपदी अजय भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आज सासवड येथे झालेल्या या निवडीच्या कार्यक्रमात कैलास गायकवाड व अजित भोसले यांचे एकमेव अर्ज आल्याने ही  निवड  निवडनुक निर्णय अधिकारी उर्मिला मदने यांनी बिनविरोध झाल्याचे घोषित केले.


        पिंगोरी येथील विविध कार्यकारी सोसायटीची संचालक पदाची निवडणूक अत्यंत अतीतटीच्या संघर्षमय वातावरणात बिनविरोध झाली होती. काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून या निवडणुकीमध्ये सामना करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र  ऐनवेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी लक्ष घालून ही निवडणूक बिनविरोध केली होती. यामध्ये एका गटाला चार जागा मिळाल्या होत्या, तर दुसऱ्या गटाला सात जागा मिळाल्या होत्या. यामुळे सात जागा असलेल्या गटाचा चेअरमन होईल अशी अटकळ बांधली जात होती.मात्र  अचानक सात सदस्य असलेल्या गटाचे व माजी चेअरमन असलेल्या महादेव शिंदे यांनी माघार घेत कैलास गायकवाड यांना चेअरमन पदासाठी पाठिंबा दिला आणि त्यामुळे कैलास गायकवाड हे चेअरमन झाले.त्याच बरोबर अजय भोसले यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कैलास गायकवाड  गटाचे संचालक असलेले कल्याण धुमाळ यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला यश आल्याने ही निवडणूक बिनविरोध पारपडली या नव निर्वाचित चेअरमन व्हा.चेअरमन यांचे सरपंच जीवन शिंदे, उपसरपंच प्रकाश शिंदे,पोलीस पाटील राहुल शिंदे,दत्ताराजे शिंदे, संतोष शिंदे,राजकुमार यादव, अमोल शिंदे,भाऊ शिंदे, व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

करिअर प्लॅनिंग आणि कौशल्य विकास

 

करिअर प्लॅनिंग आणि कौशल्य विकास



करियर निवड करणे म्हणजे काय? याचा विचार करताना अनेक समज गैरसमज पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतात. एखाद्या विषयात चांगले गुण मिळतात म्हणजे त्या विषयाशी निगडित क्षेत्रात उत्तम करिअर होईल ,असा गैरसमज असू शकतो. करियर विषयी फक्त अंदाजे  निर्णय घेणे भविष्यात समस्या निर्माण करू शकते .                                               

             स्वतः जवळील गुणांचा किंवा क्षमतांचा अभ्यास करून ,त्यांचा विकास करून आपल्या आवडीच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी करून समाधान मिळवणे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे याला करिअर म्हणतात.करिअर म्हणजे काय हे एकदा निश्चित समजले की ,करिअर प्लॅनिंग चे महत्व लक्षात येते. करिअर प्लॅनिंग कसे आणि कधी करावे याही बद्दल विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात प्रश्न असतात.सर्वसाधारणपणे इयत्ता दहावी नंतरचे करिअर प्लॅनिंग ची सुरुवात करणे योग्य ठरते. दहावीपर्यंत विद्यार्थी शालेय जीवनात अत्यंत सुरक्षित वातावरणात असतात मात्र त्यानंतरच अभ्यास,नोकरी, व्यवसाय अशी नवी आव्हाने सुरू होतात. योग्य करिअर प्लॅनिंग असेल तर ही आव्हानेही यशस्वीरित्या पेलता येतात.                                                        

                दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वाणिज्य, विज्ञान किंवा कला या मूलभूत शाखा निवडण्यापूर्वी करिअर प्लॅनिंग महत्त्वाचे ठरते. वाणिज्य, विज्ञान किंवा कला शाखा हा पर्याय निवडत असताना कोणते विषय निवडावे लागतील, पुढील प्रवेश परीक्षा कोणत्या याविषयीची माहिती घेणे हा करिअर प्लॅनिंग मधील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ही माहिती तज्ञ मार्गदर्शक आणि शिक्षक यांचे मार्गदर्शन घेऊन मिळवता येते.फक्त माहितीच्या आधारे करिअर प्लॅनिंग करू नये. विविध शाखांची माहिती घेतल्यानंतर स्वतःचे मूल्यांकन करणे आवश्यक ठरते.म्हणजे स्वतःचे सामर्थ्य ओळखणे. सकारात्मक गोष्टी कोणत्या आणि त्यांचा उपयोग करियरसाठी कसा होऊ शकेल याचे मूल्यमापन करणे.                                  गणितीय बुद्धिमत्ता,भाषिक बुद्धिमत्ता,संवाद कौशल्ये या गोष्टी प्रत्येकाकडे कमी-जास्त प्रमाणात असू शकतात. म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वास काय अनुकूल आहे हे समजून घेणे करिअर प्लानिंग साठी आवश्यक ठरते.कोणत्याही करिअरचे नियोजन करत असताना शिक्षण पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा तसेच भविष्यातील नोकरी व व्यवसायाच्या संधी यांचाही सारासार विचार करणे आवश्यक ठरते.                                      

              आजकालच्या युगात कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे ठरवले आणि प्रवेश घेऊन शिक्षण घेतले इतकेच यशस्वी होण्यासाठी पुरेसे नाही.

 बहुराष्ट्रीय कंपन्या, बँका, सेवा क्षेत्रातील कंपन्या आजकाल नोकरीसाठी बहुआयामी कौशल्य असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देतात. बहुतांश महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जागृती केली जाते.म्हणजेच चांगल्या शिक्षणासोबतच पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत नवनवीन कौशल्य शिकण्याचे नियोजन ही करावे लागते.यामध्ये इंग्रजी आणि परकीय भाषा कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स, आयटी संबंधित कौशल्ये वाढवणे महत्त्वाचे ठरते.                                              

                करिअर प्लॅनिंग करत असताना प्रत्येकाने नोकरी करणे हाच पर्याय स्वीकारावा असे नाही. एखादा नवीन व्यवसाय सुरू करून काही वर्षात तो वाढवत नेऊनही उत्तम करिअर करता येते. त्यासाठी पदवी शिक्षणासोबतच व्यवसायिक कौशल्ये वाढवण्यासाठी प्रयत्न करणे.  पदवी आणि त्यानंतरचे शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय या विषयीचे जे प्लॅनिंग आधी केलेले असते त्यामध्ये काही कारणांमुळे किंवा बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याची वेळ येऊ शकते.त्यामुळे करिअर प्लॅनिंग करत असताना बॅकअप प्लॅन तयार ठेवणेही आवश्यक ठरते. म्हणजेच आवश्यकता पडल्यास बॅकअप प्लॅननुसार करिअर करता येऊ शकते.

                    नोकरी आणि व्यवसायामध्ये सतत वाढत असलेल्या तीव्र स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी उत्तम करिअर निवडणे आणि त्यामध्ये पुढे जात राहणे ही अतिशय आव्हानात्मक गोष्ट पालक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ठरत आहे.


Sunday, June 12, 2022

सरपंचांनो सावधान ! गावात बालविवाह झाल्यास पद गेलेच म्हणून समजा,

 सरपंचांनो सावधान ! गावात बालविवाह झाल्यास पद गेलेच म्हणून समजा, राज्य सरकारने घेतलाय निर्णय 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची माहिती




पुणे:

       बालविवाह प्रतिबंध कायद्याची व्याप्ती वाढवत आता दोन कुटुंबापुरता त्याचा आवाका न ठेवता या कायद्याचा परीघ वाढविण्यात आला आहे. आता आपल्या गावात बालविवाह झाल्यास व त्याची नोंद घेतल्यास गावकारभारी म्हणजेच सरपंचांन दोषी धरत त्यांचे पद जाऊ शक्ते. याबाबतचा निर्णय घेतल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांंनी दिली आहे.


आता गावात बालविवाह झाल्यास त्याचा फटका सरळ गावकीचे पुढारपण करणाऱ्यांना बसणार आहे. राज्य सरकारने या कायद्याची कठोर अंमलबजावणीचे संकेतच दिले असूून त्याविषयी  च् गंभीरतेचा इशारा दिला आहे. गावात बालविवाह झाल्यास आता सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि नोंदणी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. एवढयावरच न थांबता राज्य सरकारने त्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे. नुकतीच मुंबई उच्च न्यायलयाने वाढत्या बालविवाहविषयी चिंता व्यक्त करत राज्य शासनाचे कान टोचले होते. बालविवाह रोखण्यात पुढारी स्वारस्य दाखवत नसल्याने शासन अॅक्शन मोड मध्ये आलेले आहे. त्यामुळे कायद्याचा धाक दाखवत बालविवाह रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


कुटुंबीयांसोबतच गाव पुढारी ठरणार दोषी


बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार, बालविवाह झाल्यास नववधू-वराचे आई-वडिल, मंगल कार्यालयाचे मालक, पुरोहित आणि छायाचित्रकार यांच्यावर गुन्हा दाखल होतो. आता कायद्याची व्याप्ती वाढवत यामध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि नोंदणी अधिकाऱ्यांचा ही समावेश करण्यात आला आहे. बालविवाह कायद्यान्वये कुटुंबासोबतच गाव पुढारी रडारवर आले आहेत. त्यांच्यावर गुन्हाच दाखल होणार असून त्यांना पदावरुन ही पायउतार व्हावे लागणार आहे.


सामाजिक संस्थांची पाठ थोपटली


जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ‘बेटी बाचाव बेटी पढाओ’ योजनेतंर्गत बाल लिंग गुणोत्तर कमी असलेल्या गावातील पदाधिकाऱ्यांसाठी पुणे येथे कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. त्यात चाकणकर यांनी सामाजिक संस्थांची पाठ थोपटली. सामाजिक संस्थांनी बालविवाह रोखण्यात सिंहाचा वाटा उचलल्याचे कौतूक त्यांनी केले. पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सरपंच यांच्यापेक्षा त्यांनी केलेली कामगिरी सरस असल्याचा दावा त्यांनी केला.


यापूर्वी कसे वाढले विवाहाचे वय


बालविवाह प्रतिबंधक कायदा सर्वप्रथम १९२९मध्ये अस्तित्वात आला. या कायद्यान्वये मुलीचे वय १४ आणि मुलाचे वय १८ वर्षे ठरवण्यात आले. त्यानंतर १९५५ मध्ये हिंदु विवाह कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय १५ वर्षे तर मुलाचे वय १८ वर्षे करण्यात आले. बालविवाह कायद्यात १९७८ मध्ये सुधारणा करण्यात आली. यामध्ये मुलाचे लग्नाचे वय २१ वर्षे आणि मुलीचे लग्नाचे किमान वय १८ वर्षे करण्यात आले. त्यानंतर पुरुष आणि महिलांच्या विवाहयोग्य वयात समानता आणण्याच्या म्हणजेच महिलांसाठी विवाहाचे कायदेशीर वय १८ वरुन २१ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रिय मंत्रिमंडळाने १५ डिसेंबर २०२१ रोजी मंजूरी दिली.

आठ वर्षात केंद्र सरकारने केलेली कामे घराघरा पर्यंत पोहचवणार : गंगाराम जगदाळे

 आठ वर्षात केंद्र सरकारने केलेली कामे घराघरा पर्यंत पोहचवणार : गंगाराम जगदाळे

 भाजप मोटार सायकल रॅलीचे नीरा येथे उत्साहात स्वागत



नीरा दि.१२


   केंद्र सरकारने आठ वर्षाच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले .जाणतेसाठी उपयुक्त अशी अनेक कामे केली.ही कामे सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचायला हवीत.त्याचा लाभ आणि त्याची माहिती जनतेला मिळायला हवी, म्हणून आजा भाजपाच्यावतीने दिवे ते नीरा असे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे पुरंदर भाजपचे अध्यक्ष गंगाराम जगदाळे आणि नीरा येथे रॅली च्या समारोपाच्या वेळी म्हटले आहे. गेल्या आठ वर्षांत केंद्र सरकारने केलेली कामे आम्ही लोकांपर्यंत पोहचवणार असल्याचे ते म्हणाले.


पुरंदर तालुक्यात आज (दि.१२)  रोजी पुरंदर भाजपाच्यावतीने मोटार सायकल  रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील दिवे ते नीरा अशा मार्गावर पुरंदर भाजपचे अध्यक्ष गंगाराम  जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती.यामध्ये अनेक तरुणांनी सहभाग घेतला सासवड, जेजुर, वाल्हा, नीरा या प्रमुख शहरा बरोबरच अनेक गावातून या रॅलीचे स्वागत करण्यात आले.

       नीरा येथे भाजपचे आमदार राम सातपुते भाजपचे  तालुका उपाध्यक्ष सुरेंद्र जेधे ,नाना जोशी, आण्णा माने, यांच्यासह अनेक मान्यवरांनी रॅलीचे स्वागत केले.

नीरा येथे बोलताना भाजपचे पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे म्हणाले की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ८ वर्ष पूर्ण होत आहेत. आठ वर्षात या सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला व्हावी म्हणून ही रॅली आयोजित करण्यात आली होती.यामध्ये पुरंदर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला तालुक्यात भाजपचे पाठबळ वाढत आहे

दरम्यान दिवे येथे भाजपचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष  जालिंदर कामठे  यांनी रॅलीचा शुभारंभ केला या वेळी  जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, सरचिटणीस कैलास जगताप, संदीप नवले, संदीप कटके, ओबसी सेलचे अध्यक्ष रवी फुले, युवा मोर्चा अध्यक्ष विठ्ठल जगताप,किसन सेलचे अध्यक्ष गोविंद भोसले, अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे सुनील आवचळे, सासवड शहर अध्यक्ष साकेत जगताप, जालिंदर जगताप, आनंद जगताप, कामगार आघाडीचे आबा घाटे, इत्यादी सह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.


Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...