सासवड शहरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
जुगार चालवणाऱ्या दोघांना अटक
सासवड दि.१३
पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील खंडोबनगर परिसरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी हा अड्डा चालवणाऱ्या दोघांना अटक केलीय. पोलिसांनी त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिस कॉन्स्टेबल प्रतीक दिवाण यांनी सरकारी फिर्याद दिली आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड येथील खंडोबानगर परिसरामध्ये दिनांक 12 जून 2022 रोजी आरोपी सतीश शितोळे व सोमनाथ बाळासाहेब खोमणे हे चिवचिव जुगार अड्डा चालवत होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये एकूण १५०४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत अधिक तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.