कर्नलवाडी येथे झारखंड मधील ३० वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या.
नीरा दि.१९
पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे आज दि.१९ जून रोजी एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. घटने नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृत व्यक्तीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कर्नलवाडी येथे प्रेमकुटी या पुण्यातील जोगळेकर यांच्या फॉर्म हाऊस मध्ये झारखंड येथील मूळ रहिवासी असलेल्या मुकेश ठाकूर या ३० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कामगारांसाठी बनवलेल्या खोली मध्ये हा मृत देह आढळून आला. नीरा दूर्क्षेत्राचे फौजदार सुदर्शन होळकर, हवालदार संदीप मोकाशी व निलेश जाधव,पोलीस पाटील दिनेश खोमणे यांनी घटनास्थळी जावून या बाबतचा प्राथमिक तपास केला. यानंतर मृत देह उत्तरीय तपासणीसाठी जेजुरी येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.दरम्यान पोलिसांनी याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.याबाबत अधिकाचा तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुदर्शन होळकर करीत आहेत.