पिंगोरी येथील सोसायटीचा चेअरमनपदी कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड
तर व्हाईस चेअरमनपदी अजय भोसले यांची निवड
नीरा दि.१३
पिंगोरी (ता.पुरंदर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली, तर व्हाईस चेअरमनपदी अजय भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आज सासवड येथे झालेल्या या निवडीच्या कार्यक्रमात कैलास गायकवाड व अजित भोसले यांचे एकमेव अर्ज आल्याने ही निवड निवडनुक निर्णय अधिकारी उर्मिला मदने यांनी बिनविरोध झाल्याचे घोषित केले.
पिंगोरी येथील विविध कार्यकारी सोसायटीची संचालक पदाची निवडणूक अत्यंत अतीतटीच्या संघर्षमय वातावरणात बिनविरोध झाली होती. काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून या निवडणुकीमध्ये सामना करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी लक्ष घालून ही निवडणूक बिनविरोध केली होती. यामध्ये एका गटाला चार जागा मिळाल्या होत्या, तर दुसऱ्या गटाला सात जागा मिळाल्या होत्या. यामुळे सात जागा असलेल्या गटाचा चेअरमन होईल अशी अटकळ बांधली जात होती.मात्र अचानक सात सदस्य असलेल्या गटाचे व माजी चेअरमन असलेल्या महादेव शिंदे यांनी माघार घेत कैलास गायकवाड यांना चेअरमन पदासाठी पाठिंबा दिला आणि त्यामुळे कैलास गायकवाड हे चेअरमन झाले.त्याच बरोबर अजय भोसले यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कैलास गायकवाड गटाचे संचालक असलेले कल्याण धुमाळ यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला यश आल्याने ही निवडणूक बिनविरोध पारपडली या नव निर्वाचित चेअरमन व्हा.चेअरमन यांचे सरपंच जीवन शिंदे, उपसरपंच प्रकाश शिंदे,पोलीस पाटील राहुल शिंदे,दत्ताराजे शिंदे, संतोष शिंदे,राजकुमार यादव, अमोल शिंदे,भाऊ शिंदे, व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.