सासवड जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर .
सासवड दि.१३
सासवड आणि जेजुरी नगरपरिषदेच्या निवडनुकीसाठीचीआरक्षण सोडत आज दिनांक १३ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे.सासवड नगर परिषदेसाठी या निवडणुकीत एकूण ११ प्रभाग असणार आहेत. प्रत्येक प्रभागात २ जागा असणार आहेत.
यामध्ये प्रभाग क्रमांक ४ मध्ये एक जागा अनुसूचित जातीच्या महीलेसाठी राखीव असणार आहे तर एक जागा सर्वसाधारण असणार आहे.प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक जागा अनुसूचित जमातीसाठी तर एक जागा सर्वसाधारण महीले करता राखीव असणार आहे. इतर सर्व प्रभागांमध्ये एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी व एक जागा सर्वसाधारण असणार आहे.अशा प्रकारची सोडत उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी जाहीर केली आहे.आरक्षण सोडती बाबत हरकती व सूचना असल्यास दिनांक १५ जून पर्यंत नगरपरिषद कार्यालयात सादर कराव्यात असे मुख्याधिकारी निखील मोरे यांनी म्हटले आहे.
जेजुरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये एका जागा अनुसूचित जातीसाठी व १ जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असणार आहे.
प्रभाग क्रमांक 2 ,३,४,५,६ ,७ आणि १० या प्रभागामध्ये सर्वसाधारण महिला साठी प्रत्येकी एक जागा व सर्वसाधारण खुल्या गटासाठी प्रत्येकी एक जागा असणार आहे. तर प्रभाग क्रमांक ८ मध्ये अनुसूचितजातीच्या महिलेसाठी एक जागा व एक जागा सर्वसाधारण खुली असणार आहे, प्रभाग क्रमांक ९ मध्ये अनुसूचित महिलेसाठी एक व सर्वसाधारण खुल्या वर्गाची एक जागा असणार आहे.अशा प्रकारे जेजुरी नगर परिषदेसाठीच्या निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.