शरद विजय सोसायटीची निवडणूक रंगतदार

दोन्ही पँनल प्रमुखांचा पुतण्या चक्क अपक्ष. शरद विजय सोसायटीची निवडणूक रंगतदार. पुरंदर : कर्नलवाडीच्या शरद विजय सोसायटीच्या निवडणूकीच्या रणांगणात दोन्ही पँनल प्रमुखांचा पुतण्या मात्र अपक्ष निवडणूक लढवत आहे. १३ संचालकांच्या निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. एक उमेदवार आधीच बिनविरोध आला आहे. आता १२ जागांसाठी २५ उमेदवार निवडणुकीच्य रणांगणात असणार आहेत. निरा परिसरात स्वमालकीची दुमजली इमारत असलेल्या शरद विजय विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कर्नलवाडीची समिती सदस्यांची निवडणूकीचे अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया नुक्तीच संपली. १३ संचालकांच्या निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. भानुदास यदू पाटोळे हे अनु. जाती/जमातीया प्रवर्गातून आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. सर्वसाधारण ८ जागांसाठी १७ उमेदवार निवडणूक लढवत असुन दोन्ही पँनलचे प्रमुखांचे पुतण्ये कृष्णराव शिवाजी निगडे हे स्वतंत्रपणे (बिनविरोध) आपले नशीब आजमवत आहेत. त्यामुळे निवडणुकीत वेगळा रंग आला आहे. सर्वसाधारण सदस्यांसाठी ८ जागा आहेत. दोन्ही गटांपैकी ८ व १ अपक्ष अ...