Type Here to Get Search Results !

प्राध्यापकाकडून २०० हून अधिक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण

 

प्राध्यापकाकडून २०० हून अधिक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण 

 


भोपाळ :

          शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. येथील नॅशनल लॉ युनिव्हसिटीचे प्राध्यापक तपन मोहंतीच्या विरोधात पोलिसांनी लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. सेक्सुअल हरॅसमेंटअंतर्गत दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रोफेसर पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनींना घाणेरड्या नजरेने पाहत होता. त्यामुळे अनेक विद्यार्थिनी त्यांच्या लेक्चरला बसायला घाबरत होती.

गेल्या 20 वर्षांपासून विद्यार्थिंनीसोबत गैरवर्तणूक

स्टूडेंट्स बार असोसिएशनशी संबंधित विद्यार्थ्यांनी आरोपी प्रोफेसरबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ज्यात त्याचं कृत्य समोर आलं आहे. आरोपी गेल्या 20 वर्षांपासून विद्यार्थिनींसोबत गैरवर्तणूक करीत होता. तो मुलींना परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचं आमिष दाखवित होता. आणि त्यांच्यावर जबरदस्ती करीत होता.

200 हून अधिक मुलींसोबत गैरकृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षात अनेक विद्यार्थिनींनी आरोपी प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यापीठ प्रशासनात त्याची वरपर्यंत ओळख आहे. यामुळे हा विरोध मोठ्या स्तरापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस तो बचावला जात होता. मात्र भीतीमुळे मुली काहीही सांगायला घाबरत होत्या. तर काहींनी याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धमकी देऊन गप्प करण्यात आलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies