ढाब्यावर जेवण आणण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला कोल्ड्रिंक्सच्या बाटलीने मारहाण.
सासवड दि.२८
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे ढाब्यावरून जेवण आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला दारू पिऊन आलेल्या व्यक्तीने डोक्यात कोल्डड्रिंकची बाटली डोक्यात मारून जखमी केले आहे. या संदर्भात सासवड पोलिसात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांन भारतीय दंड विधान कलम 324,504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याबाबत प्रमोद वसंतराव टकले वय ४६ वर्ष धंदा शेती रा.सोपानगर, सासवड ता.पुरंदर जि.पुणे यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार ते व त्यांचे मित्र सासवड येथील उत्तम ढाबा येथे जेवण आणणे करीता गेले असता तेथे असणारा इसम विनायक सतिश जगताप रा.कोडीत नाका, सोपानदेव मंदीरा शेजारी, सासवड ता.पुरंदर जि.पुणे हा दारू पिऊन तिथे आला. यावेळी फिर्यादी व त्यांचा मित्र संभाजी असे बसले होते. त्यांचे जवळ येवुन तो संभाजी यास शिवीगाळ करू लागला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास शिवीगाळ करू नको असे म्हणत असताना त्याने त्याच्या हातातील कोल्ड्रींगची बाटली फिर्यादी च्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. याबाबत सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबतचं अधिकचा तपास सासवड पोलीस करीत आहेत...