Tuesday, March 22, 2022

महिलांनी कॅन्सर तपासणी करून घ्यावी ; डॉ.मनीषा मगर यांचे आवाहन

 महिलांनी कॅन्सर तपासणी करून घ्यावी ; डॉ.मनीषा मगर यांचे आवाहन 



 नीरा येथे  कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन 


नीरा दि.२२


     पुरंदर तालुक्यातील नीरा येथे   अँनको  लाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे सातारा व निरा  प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावतीने कॅन्सर तपासणी शिबिरचे आयोजन  आज दिनांक 22 मार्च रोजी  नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात   आले आहे. यावेळी डॉ.मनीषा मगर यांनी महिलांनी कॅन्सर तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.

   आज दिवसभर नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सर तपासणी करण्यात येत आहे.तोंडाचा कॅन्सर ,घशाचा कॅन्सर,फुफुसाचा 

कॅन्सर,स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर,आतड्याचा, किडनी व मुत्रसायचा कॅन्सर इत्यादी तपासी करण्यात येत आहे. कॅन्सर रोग निदान झालेल्या रुग्णांना महात्मा.ज्योतिबा फुले जन धन आरोग्य योजने अंतर्गत पिवळे व केशरी रेशनकार्ड  धारकांना मोफत उपचार केले जाणार आहेत. यावेळी डॉ.मनीषा मगर म्हणाल्या की,  कॅन्सर हा पूर्ण बरा होणारा आजार आहे.त्यामुळे त्याच वेळीच निदान होणं आवश्यक आहे.कॅन्सरच प्रमाण सध्या वाढले आहे.त्यामुळे लोकांनी वेळीच कॅन्सर बाबत तपासणी करणे गरजेचे आहे.

         यावेळी डॉ. मनिषा मगर, डॉ. सुरेश साबळे हे तपासणी करत आहेत.तर त्यांना  उमंग पवार गौरव भोई, सुनीता आढागळे, रूपाली साळुंखे नितीन जगदाळे हे अँनकोचे सहकारी   कर्मचारी   मदत करीत आहेत. त्याचबरोबर नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. समीक्षा कांबळे, डॉक्टर नरेश बागुल, आरोग्यसेविका बेबी तांबे,आरोग्य सेवक बाळासाहेब भंडलकर,लॅब टेक्निशियन मनीषा जाधव, संगम कर्वे, शुभांगी चव्हाण सत्वशीला बंडगर, तुकाराम मुलमुले,अक्षय चव्हाण आशा स्वयंसेविका आशा सुर्यवंशी आणि स्वाती गायकवाड त्यांना सहकार्य करीत आहेत. आज दिवसभर ही तपासणी सुरू असणार आहे.


No comments:

Post a Comment

Featured Post

पुरंदरमध्ये अजब घटना.. निसर्गाचा अद्भुत चमत्कार! मेंढरू जन्माला पाच पायांसह

 पुरंदरमध्ये अजब घटना.. निसर्गाचा अद्भुत चमत्कार! मेंढरू जन्माला पाच पायांसह  पुरंदर :         निसर्ग अनेकदा अशा घटना घडवतो की ज्या पाहून मा...