Thursday, March 31, 2022

शरद विजय सोसायटीची निवडणूक रंगतदार

 दोन्ही पँनल प्रमुखांचा पुतण्या चक्क अपक्ष.

शरद विजय सोसायटीची निवडणूक रंगतदार. 



पुरंदर : 

       कर्नलवाडीच्या शरद विजय सोसायटीच्या निवडणूकीच्या रणांगणात दोन्ही पँनल प्रमुखांचा पुतण्या मात्र अपक्ष निवडणूक लढवत आहे. १३ संचालकांच्या निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. एक उमेदवार आधीच बिनविरोध आला आहे. आता १२ जागांसाठी २५ उमेदवार निवडणुकीच्य रणांगणात असणार आहेत. 


     निरा परिसरात स्वमालकीची दुमजली इमारत असलेल्या शरद विजय विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कर्नलवाडीची समिती सदस्यांची निवडणूकीचे अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया नुक्तीच संपली. १३ संचालकांच्या निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. भानुदास यदू पाटोळे हे अनु. जाती/जमातीया प्रवर्गातून आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. सर्वसाधारण ८ जागांसाठी १७ उमेदवार निवडणूक लढवत असुन दोन्ही पँनलचे प्रमुखांचे पुतण्ये कृष्णराव शिवाजी निगडे हे स्वतंत्रपणे (बिनविरोध) आपले नशीब आजमवत आहेत. त्यामुळे निवडणुकीत वेगळा रंग आला आहे.


      सर्वसाधारण सदस्यांसाठी ८ जागा आहेत. दोन्ही गटांपैकी ८ व १ अपक्ष असे १७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ज्योतिर्लिंग/ज्योतिबा गावकरी प्रगती पॅनलचे उमेदवार पुढील प्रमाणे ज्ञानदेव बुवासाहेब निगडे, विजय विठ्ठल कोंडे, दिलीप बबन निगडे, बाळासाहेब विठ्ठल निगडे, रणजित सतिश निगडे, प्रमोद देवीदास निगडे, श्रीकांत सुरेश निगडे, निलेश दिलीप भोसले. महिला प्रतिनिधी प्रवर्गासाठी संगीता राजेंद्र निगडे, शुभांगी विजय निगडे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून नरेंद्र दगडोबा रासकर. तर भ.वी. जाती/जमाती प्रवर्गातून ज्योतीराम बबन कर्णवर निवडणूक लढवत आहेत.



 ज्योतीबा क्रुषी विकास पँनलचे उमेदवार पुढील प्रमाणे सर्वसाधारण : अशोक आबासाहेब निगडे, अशोक ज्ञानेश्वर निगडे, दत्तात्र्य तुकाराम निगडे, दशरथ लालासो निगडे, बाळकृष्ण अवचितराव निगडे, रामदास बाजीराव निगडे, पोपट जयसिंग भोसले, रघुनाथ सिताराम शेंद्रे. महिला प्रतिनिधी प्रवर्गासाठी प्रभावती शिवाजी निगडे, विमल बाळासाहेब निगडे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून तानाजी भिकनाथ नेवसे तर भ.वी. जाती/जमाती प्रवर्गातून शंकर लक्ष्मण वाघापूरे निवडणूक लढवत आहेत.


१९९४ साली गावातील मान्यवरांनी व भुमिपुत्रांनी ही संस्था स्थापन केली. स्थापने पासून सलग या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यावर्षी काही किरकोळ तात्विक वाद झाल्याने ही निवडणूक मैत्रीपूर्ण वातावरणात होत आहे.

No comments:

Post a Comment

Featured Post

पुरंदरमध्ये अजब घटना.. निसर्गाचा अद्भुत चमत्कार! मेंढरू जन्माला पाच पायांसह

 पुरंदरमध्ये अजब घटना.. निसर्गाचा अद्भुत चमत्कार! मेंढरू जन्माला पाच पायांसह  पुरंदर :         निसर्ग अनेकदा अशा घटना घडवतो की ज्या पाहून मा...