पांडेश्वर सोसायटीच्या चेअरमनपदी संजय जगताप तर व्हा.चेअरमनपदी महादेव कामथे
जेजुरी प्रतिनिधी दि.22
पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर येथील, पांडेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संजयअण्णा जगताप यांची सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. तर व्हॉईस चेअरमनपदी महादेव कामठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पांडेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकूण १३ सदस्यां पैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ तर काँग्रेसचे ४ सदस्य निवडून आले होते. संचालकपदाची निवडणूक सुद्धा बिनविरोध पारपडली होती .
आज दिनांक 22 मार्च रोजी चेअरमन व्हॉईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयअण्णा जगताप यांनी चेअरमन पदासाठी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचेच महादेव कामथे यांनी व्हाईस चेअरमनपदासाठी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत या दोघांचेच अर्ज प्राप्त झाले .त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला मदने यांनी जाहीर केले. या निवडीनंतर ग्रामस्थांनी चेअरमन व्हॉईस चेअरमन या दोघांचाही सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, पंढरीनाथकाका सोनवणे, माजी सरपंच प्रताप रासकर,उत्तमराव शिंदे,संदीप रोमन, मनोहर झेंडे, नितीन रोमन, त्याचबरोबर पांडेश्वर गावचे पोलीस पाटील अरुण धुमाळ तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.
या निवडीनंतर बोलताना संजयअण्णा जगताप म्हणाले की, लोकांनी मला सलग दुसऱ्यांदा सोसायटीच्या चेअरमन पदावर काम करण्याची संधी दिली. सोसायटीचा कारभार नेहमीच पारदर्शक राहिला आहे. आणि यापुढे सुद्धा तो पारदर्शक राहील. सर्वसामान्य सभासदाच्या भल्यासाठी आम्ही आत्तापर्यंत काम केलं आणि इथून पुढे सुद्धा करणार आहोत. सभासदांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला तो आम्ही सार्थ करून तर दाखवूच पण त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील.