एका व्यक्तीने केलेले रक्तदान तीन व्यक्तींचे प्राण वाचवते:- डॉ.नितीन सावंत
नीरा दि.२८
रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. एका व्यक्तीने केलेले रक्तदान तीन व्यक्तींचे प्राण वाचवते. त्यामूळे प्रत्येकाने रक्तदान करायला हवे.असे आवाहन डॉ. नितीन सावंत यांनी केले आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे राजेश भाऊ काकडे सामाजिक विकास संस्था व स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सामान्य रुग्णालय सातारा यांच्या माध्यमातून नीरेचे सरपंच राजेश काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ.नितीन सावंत बोलत होते. यावेळी त्यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले व तरुणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.यावेळी निरेतील प्रसिद्ध डॉ. निरंजन शहा,अभय तळवलकर,डॉ.रोहन लकडे,आशिष शहा, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे,सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, सदस्य राधा माने,वैशाली काळे, सारिका काकडे, माधुरी वाडेकर, आनंद शिंदे, माजी उपसरपंच विजय शिंदे, सुदाम बंडगर, दीपक.काकडे,वैशाली निगडे, धनंजय निगडे इत्यादीसह अनेक मान्यवर उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सदस्य नाना जोशी,गणेश वाघमारे, गणेश तातुसकर,रणजित निगडे,दीपक मोरे,आंनता वेदपाठक इत्यादींनी केले होते.
यावेळी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सामान्य रुग्णालय साताराचे डॉ.आरती पाटणे , कृष्णनंत दीक्षित,प्रियांका माने, रवींद्र जाधव,करण भालेराव.मिलिंद साठे,शेष मागाडे, मच्छिंद्र रसाळ,प्रदीप धेंबरे इत्यादींनी या रक्तदान शिबिरासाठी वैद्यकीय सेवा दिली.