अल्पवयीन मुलीशी विवाह करून लैंगिक अत्याचार; पती, सासरा व नंदे विरोधात फिर्याद दाखल.
जेजुरी दि.३०
पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेऊन तिचा मानसिक छळ केल्या प्रकरणी पुण्यातील तिघा विरोधात जेजुरी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी .द.वि.क. 498(अ) ,376(2),354(अ),504,506,बा.लैंगिक. अ.स.अधि.2012चे.कलम.4,6,8,10, 12 व बालविवाह प्रतिबंधक अधिनयम2006चे कलम 9प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारी नुसार तिचा विवाह ओंकार सुरेश बेनकर रा.गणेश नगर धायरी पुणे यांचेशी लावण्यात आला होता.लग्नानंतर मुलगी अल्पवयीन असूनही त्याने तिच्या परवानगी शिवाय तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. सासरा सुरेश ज्ञानबा बेनकर याने ही तिचा विनय भंग केला. हा सर्व प्रकार तिने नणंद कल्याणी सुरेश बेनकर हिला सांगितला मात्र तिने हा प्रकार आईवडिलांना सांगू नकोस असे म्हणत चाकूचा धाक दाखवला. व जीवे मारण्याची धमकी दिली अश्या प्रकारची फिर्याद दिनांक २९/३/२०२२ रोजी दिली आहे .
याबाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोनवलकर करीत आहेत.
.jpeg)
No comments:
Post a Comment