मुळशी,वेल्हा, हवेलीच्या दुर्गम भागातील वाडीवस्तीवर लवकरच विद्युतीकरण
नियोजन मंडळातून १२ कोटीचा निधी मंजूर
प्रवीण शिंदे - (सदस्य पुणे विद्युत मंडळ) यांची माहिती.
जेजुरी वार्ताहर दि २३ पुणे जिल्ह्यातील मुळशी,वेल्हा,व हवेली तालुक्यातील अतिशय डोंगर दऱ्यांच्या दुर्गम प्रदेशातील वाड्या ,वस्ती व पाड्या पर्यंत स्वातंत्र्या नंतरहि दुर्गमतेमुळे वीज आलेली नाही. पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार,बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मुळशी,वेल्हा व हवेली तालूक्यातील दुर्गमभागातील डोंगर दऱ्यातील वाड्या वस्त्यांवर विद्युतीकरणासाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातील काही गावात पहिल्या टप्प्यात काम सुरु होत असल्याचे पुणे विद्युत मंडळाचे सदस्य व बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे यांनी बोलताना सांगितले.
मुळशी तालुक्यातील दुर्गम भागात असणारे वेगरे वाडीवस्ती,कोंदुर वाडीवस्ती,मोसे येथील दादवलीवस्ती,अडमाळ येथील पासलकरवस्ती,वांजळे येथील रामवाडी,जताडे येथील कुडलेवस्ती,पोमगाव येथील कातरवस्ती . वेल्हे तालुक्यातील धिसर ढेबेवस्ती, धानेप धनगरवस्ती,घावर वाडीवस्ती,भागीनघर, भट्टी – घावदरायेथील ढेबेवस्ती,सूरवड वाडीवस्ती, माणगाव कुंभतलवस्ती, रुळे येथील काळूबाईचावाडा,शिरकोली- घरकुलवस्ती, कुरण – मोरेवस्ती,खामगाव – तळजाईवस्ती. वरोती,कोंढवली, केतकावाने ,दादवडी वाडीवस्ती,वरघड येथील बिरोबावाडी, तसेच हवेली तालुक्यातील आगळम्बे येथील ठाकरवाडी व धनगरवाडा या दुर्गम भागातील वाड्या वस्तीवर पहिल्यांदाच विद्युतीकरण होणार असल्याचे प्रवीण शिंदे यांनी सांगितले.
बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी ,वेल्हा,हवेली,भोर,या तालुक्यातील दुर्गम भागातील आणि डोंगरदऱ्यातील वाड्या वस्तीवर विजेचे जाळे पसरविण्याचे काम खासदार सुप्रिया सुळे यांनी केले असून उर्वरित गावात स्वातंत्र्यानंतर अंधार नाहींसा होणार असल्याचे प्रवीण शिंदे यांनी सांगितले.