पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांना आदर्श सरपंच पुरस्कार
जेजुरी वार्ताहर दि 21 पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच संघटनेचे अध्यक्ष व भोसलेवाडी गावचे सरपंच राजेंद्र नामदेव भोसले यांना पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्या हस्ते राजेंद्र भोसले यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे,वीरधवल जगदाळे,तसेच संतोष भोसले,मोहन भोसले,बबन भोसले,मनोज घाटे,चंद्रकांत भोसले,तुळशीराम भांडलकर आदी उपस्थित होते .
पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भोसलेवाडी गावात पाणी शुद्धीकरण प्रकल्प,पिण्याच्या पाण्याची योजना,अंत्यविधीसाठी प्रथमच स्मशानभूमी,शाळा दुरुस्ती व मूलभूत सुविधा,शहरात अंतर्गत रस्ते,गटारे,खा सुप्रिया सुळे यांच्या फांडातून स्मशानभूमी पर्यंत रस्ते,उज्जवल गॅस योजनेतून गावात 204 लाभार्थीना लाभ,तसेच कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी व अन्नधान्य वाटप आदी कोट्यवधी रुपयांची कामे केली असल्याचे सरपंच राजेंद्र भोसले यांनी सांगितले .