Posts

Showing posts from February, 2025

मी बलात्कार केलाच नाही : स्वारगेट बलात्कार प्रकरण- आरोपीचा मोठा दावा

Image
 स्वारगेट बलात्कार प्रकरण- आरोपीचा मोठा दावा   पुणे दि. २८ स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला शुक्रवारी मध्यरात्री शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक करण्यात आली. मात्र यानंतर त्याने आपण बलात्कार केला नसल्याचे पोलिसांसमोर म्हटले आहे.           बलात्काराच्या तक्रारी नंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता .त्यानंतर १०० पोलीस, ड्रोन आणि श्वान पथकांनी गाडे याची शोधमोहीम राबवली. पाणी. पुण्यासाठी तो एका महिलेकडे गेला.त्यानंतर त्या महिलेने gde बाबत माहिती पोलिसांना दिली . पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला घेरले आणि शरण येण्यास भाग पाडले. अटकेनंतर गाडेने पोलीस कोठडीत टाहो फोडला आणि "मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे सहमतीने संबंध झाले," असा मोठा दावा गाडे याने केला. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी 70 तासानंतर केले अटक

Image
 स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी 70 तासानंतर केले अटक   पुणे २८     पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी गुणाट गावातून अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू होता, आणि अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.   आरोपी मागील दोन दिवस ऊसाच्या शेतात लपून बसला होता आरोपीला जेवण मिळत नव्हते. त्यामुळे तो रात्रीच्या वेळी आपल्या नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी जात होता. पोलिसांनी याच माहितीच्या आधारे त्याचा शोध घेतला. अखेर,आज  रात्री एक वाजता तो कॅनॉलजवळ झोपलेला असताना शोधमोहीम राबवणाऱ्या पोलिसांना दिसून आला. त्यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेऊन पुण्याला रवाना करण्यात आले आहे. सध्या त्याला लष्कर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. पुढील चौकशीसाठी त्याला पुण्यात हलवण्यात आले असून, तूर्तास एवढेच सांगता येईल, अशी माहिती डीसीपी निखिल पिंगळे यांनी दिली. आरोपीला पकडण्यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचे 100 जणांचे पथक तयार करण्यात आले होते. -ऊसाच्या शे...

सोमेश्वर कारखाना कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चेअरमन व संचालक मंडळ ॲक्शन मोडमध्ये.

Image
 सोमेश्वर कारखाना कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चेअरमन व संचालक मंडळ ॲक्शन मोडमध्ये.  "कारखान्यातील संबंधीत विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन व तात्काळ गुन्हा दाखल करणार" -  पुरुषोत्तम जगताप  पुरंदर :        श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये रोजंदारी बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचारी व कामगार यांचे हजेरी नोंदीमध्ये संगनमताने कारखाना प्रशासनाची फसवणूक करुन आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कारखान्याचे लेबर व टाईम ऑफीस विभागातील लेबर ऑफीसर, हेड टाईम किपर, टाईम किपर, सर्व क्लार्क्स व कर्मचारी यांचे निलंबन करण्याचा निर्णय संचालक मंडळाने आज गुरुवारी (दि.२७/०२/२०२५ रोजी) पार पडलेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये घेतला असून सोबतच या सर्वांविरोधात व लेबर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार यांचेवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.       चेअरमन जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, आपला श्री सोमेश्वर कारखाना सर्वच क्षेत्रामध्ये ...

पिंपरे हद्दीत दुचाकीस्वाराने टँकरला धडक. जेऊर येथील एक जखमी : पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील घटना

Image
  पिंपरे हद्दीत दुचाकीस्वाराने टँकरला धडक.  जेऊर येथील एक जखमी : पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील घटना  पुरंदर :      पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर नीरा नजीकच्या पिंपरी येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात चाललेला दुचाकीस्वाराने टँकरला मागून जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे.       पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील अपघातांचे क्षेत्र असलेल्या पिंपरे (खुर्द) हद्दीतील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहा समोर दुचाकी क्र.एम.एच. १२- जी.एक्स- ९४४१ व टँकर क्र.एम.एच.४३-बी.एक्स- ८२३४ यांचा अपघात झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार नीरा येथून जेऊर येथील एक दुचाकीस्वार वेगात वाल्हे बाजूकडे चालला होता. याच दरम्यान एक टँकर एचपी पंपाच्या शेजारील वाशिंग सेंटर कडे दिम्या गतीने वळत असताना मागून येणाऱ्या दुचाकी स्वराने टँकरला मागून जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून  जेऊर येथील दुचाकी स्वार जखमी होऊन त्याचा उजवा पाय निकामी झाल्याची माहिती  स्थानिकांनी दिली आहे.

वीरच्या देवाला अलंकारिक पोशाख, शृंगारिक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Image
वीरच्या देवाला अलंकारिक पोशाख, शृंगारिक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी                 आज माघ वद्य अमावस्येनिमित्त श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळाली. सकाळपासूनच देवस्थान ट्रस्टमार्फत/भाविकांमार्फत देवाला अभिषेक करण्यात आले सकाळी १० वाजता भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळ वाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळीचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर चालू होता.                श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र वीर व प्रशासनाच्या सहकार्याने यंदाचा यात्रा उत्सव उत्साही व शांततापूर्ण वातावरणात पार पडला. देवस्थान ट्रस्ट मार्फत यात्रेनंतरची साफसफाई मंदिर परिसरातील घाण/कचरा उचलण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत गावामध्ये, बाजारतळे, पालखी तळे, सर्व मंदिरे परिसर, यांची स्वच्छता करण्यात येत आहे. ट्रस्टचे विश्वस्त स्वतः उभे राहून सर्व यंत्रणा राबवून गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन सफाई करून घेत असल्याचे ...

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप फडतरे तर, उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड

Image
 नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप फडतरे तर, उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड  पुरंदर  :         पुरंदर तालुका आणि त्याचबरोबर बारामती तालुक्यातील ३६ गावांसाठीच कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवड आज मंगळवारी करण्यात आली. सासवड येथील उपबाजारातील कार्यालयामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पारपडली. यामध्ये काँग्रेसचे संदीप फडतरे यांची बिनविरोध सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बारामती तालुक्यातील करंजे येथील रहिवासी असलेले बाळासाहेब शिंदे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.          आज मंगळवारी सकाळी सभापती व उपसभापती पदासाठी या दोघांचेच उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे या दोघांची अनुक्रमे सभापती आणि उपसभापतीपदी निवड करण्यात आली. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी देखील अजित पवार यांचेच वर्चस्व राहिलेला आहे. यापूर्वीचे सभापती शरद जगताप...

नीरेच्या भर बाजेरपेठेतून ७० हजार लंपास रहदारीच्या रस्त्यावर दिवसा ढवळ्या डल्ला मारून केला पोबारा

Image
 नीरेच्या भर बाजेरपेठेतून ७० हजार लंपास  रहदारीच्या रस्त्यावर दिवसा ढवळ्या डल्ला मारून केला पोबारा  पुरंदर : नीरा (ता पुरंदर) भर बाजारपेठेतील बॅंके समोरून दुचाकीवरील रोख रक्कमेवर डल्ला  मारण्यात आला आहे. बॅंके समोरून ७० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास करू पोबारा केला आहे. याबाबत फिर्याद गुळूंचे येथील युवराज शामराव निगडे यांनी जेजुरी पोलिसांत दाखल केली आहे.      नीरा पोलीस दुरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार युवराज शामराव निगडे (वय ४७ वर्ष) रा. गुळूंचे (ता. पुरंदर) हे शुक्रवारी (दि.१४) सकाळी ११.१५ वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके समोर दुचाकी क्र. एम.एच. १२-जी.एल. ३४४७ लावली होती. या मोटारसायकलच्या हँडलला लावलेली पिशवीत ठेवलेल्या ७० हजार रुपये रकम माझे नकळत कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. त्या अज्ञात चोरट्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात यावी अशी फिर्याद निगडे यांनी दाखल केली आहे.      नीरेच्या भरबाजारपेठेत दिवसाढवळ्या रहदारीच्या रस्त्यावर चोरी होतं असल्याने व्यापाऱ्यांनी भिती व्यक्त केली आहे. या ठिकाणी बॅ...

नीरा येथील ग्रामपंचायत व्यापारी गाळ्यांच्या फेर वाटपासाठी उपोषण

Image
  नीरा येथील ग्रामपंचायत व्यापारी गाळ्यांच्या फेर वाटपासाठी उपोषण  जिल्हा परिषद कार्यालयासमोर करणार उपोषण  नीरा दि.१४       पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरा ग्रामपंचायतीच्या व्यापारी गाळ्यांच्या वाटपामध्ये अनियमितता झाल्याचे म्हणत या गाळ्यांचे फेरवाटप  करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र यानंतर या  गाळ्यांच्या  वाटपाला दिरंगाई होत असल्याचे म्हणत नीरा येथील तक्रारदार अन्वर शेख दिनांक १७ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. या संदर्भातील पत्र त्यांनी जिल्हा परिषदेकडे दिले असून याबाबतची माहिती त्यांनी आज शुक्रवारी माध्यमांना दिली  पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीकडे ५६ व्यापारी गाळे आहेत. या गाळ्यांचा संदर्भात अन्वर शेख यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी करून कार्यकारी अधिकारी यांनी हे गाळे वाटप करताना अनियमितता झाल्याचे म्हटलं होतं. यानंतर तत्कालीन व  सध्याचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्यावर...

श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व आई जोगेश्वरी यांचा पारंपारिक विवाह सोहळा संपन्न

Image
 !! श्रीनाथ म्हस्कोबा प्रसन्न !!       श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व आई जोगेश्वरी यांचा पारंपारिक विवाह  सोहळा संपन्न     नीरा दि.१२ महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा व आई जोगेश्वरी यांच्या श्रीक्षेत्र वीर नगरीत महाराष्ट्रातील नामांकित/प्रसिद्ध असणारी यात्रा  पार पडते आहे... या यात्रे निमित्त आज श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वर यांचा विवाह सोहळा पार पडलामं.      गळवार दिनांक ११/०२/२०२५ रोजी पहाटे ५.०० व पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. नंतर ६ वा. मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला व सकाळी देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १०.३० वा. देवाला दही- भाताची पूजा बांधण्यात आली. दुपारी १२ वा. धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मि. मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.    देवाचा लग्नसोहळानिमित्त मंदिरात फुलांची विविध प्रकारची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यासाठी दिलीप जयसिंगराव धुमाळ (माजी विश्वस्त) व मित्र परिवार यांचेमार्फत नियोज...

बँकेत सहा महिने आर्थिक व्यवहार नाही : खात्यांचे केवायसी करून घ्या महाराष्ट्र बँकेचे ग्राहकांना आवाहन

Image
बँकेत सहा महिने आर्थिक व्यवहार नाही : खात्यांचे केवायसी करून घ्या  महाराष्ट्र बँकेचे ग्राहकांना आवाहन  पुरंदर :    रिझर्व बँकेच्या धोरणानुसार सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आर्थिक व्यवहार न झालेल्या खात्यातील पैसे हे अशी खाती बंद करून रिझर्व बँकेकडे जमा केले जातील. त्यासाठी अशा खात्यावर व्यवहार करून पुन्हा केवायसी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र बँकेच्या ग्राहकांनी बँकेत येऊन केवायसी पूर्ण करावी असे आवाहन नीरा येथील बँकेचे ऑफ महाराष्ट्रचे शाखा अधिकारी रोहित चव्हाण यांनी केले आहे.      केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र बँकेमध्ये अनेक लोकांनी बचत खाते आणि इतर खाती सुरू केली आहेत.अशा खात्यांमधून मागील सहा महिन्यांपासून कोणतेही व्यवहार करण्यात आले नाहीत. त्यामुळे अशी खाती रिझर्व बँकेच्या धोरणानुसार बंद केली जाऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्र बँकेमध्ये ज्या लोकांची वापरात नसलेली खाती असतील. त्या सर्व लोकांनी सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी आर्थिक देवाण-घेवाण केली नसेल तर पुन्हा एकदा केवायसी करून घेणे गरजेचे आहे. ...

श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेञ कोडीत वरून श्रीक्षेञ वीर कडे प्रस्थान

Image
 श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेञ कोडीत वरून श्रीक्षेञ वीर कडे प्रस्थान पुरंदर दि. ११  श्री नाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र कोडीत (ता. पुरंदर येथील भक्त तुळाजीबुवा मंदिरापासून ठिक १२.१५ वाजण्याच्या सुमारास श्रीक्षेञ वीर (ता.पुरंदर ) येथील विवाह सोहळ्यासाठी माघ पौर्णिमा मंगळवार दि .११ फेब्रुवारी रोजी शाही दिमाखात प्रस्थान झाले.         श्रीक्षेत्र कोडीत येथे शुक्रवारी पहाटे उत्सव मूर्तीना अभिषेक घालण्यात आला. ढोल ताशांच्या व पारंपारीक वाद्याच्या गजरात मानाच्या काठीसह छत्री ,अब्दागिरी ,चव-या ढाळत देउळवाड्यातून जवळ असणा-या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे परम भक्त असलेल्या तुळाजी मंदिरात पालखी विसावली. पालखीसह सर्व लवाजमा विसावल्यावर उपस्थित श्रीनाथभक्तांनी 'सवाई सर्ज्याचं चांगभल 'चा जयघोष केला.यामुळे संपुर्ण श्रीक्षेञ कोडीतनगरी दुमदुमून गेली.        मंगळवार दि.११ रोजी पहाटे ५ वाजता उत्सव मूर्तीना महारुद्र अभिषेक घालुन उत्सव मूर्ती पालखीत विराजमान करण्यात आली. त्या नंतर हजारो भाविकांनी उत्सव मूर्तींचे दर्शन घ...

माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुणे येथून अपहरण

Image
  माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुणे येथून अपहरण  गोळीबार, धमकी आणि नंतर अपहरण, सावंत कुटुंब टार्गेट  धाराशिव -  राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याचे अपहरण झाले असुन या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ऋषीराज सावंत याचे पुणे विमानतळावरून अपहरण करण्यात आले आहे. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 5 वाजता स्विफ्ट गाडीतून त्यांचे अपहरण झाले अशी प्राथमिक माहिती असुन पोलिस याचा शोध घेत आहेत. स्वीफ्ट गाडीतून चार लोक उतरले आणि त्यांनी तानाजीराव सावंत यांच्या मुलाचं अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे तपास सुरू केला आहे. सावंत यांना गिरीराज व ऋषीराज अशी 2 मुले आहेत.  गेल्या काही महिन्यापासुन सावंत कुटुंब हे टार्गेटवर असल्याचे काही घटनावरून समोर आले आहे. सावंत यांचे पुतणे धनंजय यांच्या घरासमोर गोळीबार त्यानंतर धमकी व आता अपहरण अशी घटना घडली आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय व केशव सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले होते याप्रकर...

वाळुंजच्या पोलीस पाटलांचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून सन्मान

Image
  वाळुंजच्या पोलीस पाटलांचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून सन्मान चांगल्या कामाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन केला सन्मान   नीरा दि.   पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वाळूज गावच्या पोलीस पाटलांचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते पोलीस पाटील मोहन इंगळे यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. इंगळे यांनी गावतील कायदा सुव्यवस्था राखत पोलीस प्रशासनास वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.    ग्रामीण भागामध्ये गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस पाटलांना करावा लागते. त्याचबरोबर अडचणीच्या काळामध्ये पोलीस, महसूल, वन आणि आरोग्य खात्याला देखील पोलीस पाटलांना मदत करावी लागते. वाळुंज येथील पोलीस पाटील मोहन इंगळे यांनी गावातील कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच पोलिसांना आवश्यक ते सर्व सहकार्य करून चांगले काम केले. त्याच्या या मकामाच कौतुक पुणे ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले. त्यांना अप्पर पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते प्रश...

नैमित्तिक रिक्त संचालक पदासाठी मतदान कोण करणार ? सोमेश्वर सह.साखर कारखान्या निवड प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह.

Image
 नैमित्तिक रिक्त संचालक पदासाठी मतदान कोण करणार ?  सोमेश्वर सह.साखर कारखान्या निवड प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह.  पुणे : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नैमित्तिक रिक्त संचालक पद भरण्याची संचालक मंडळाची सभा व निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धीस देण्यात आला आहे. मात्र या नैमित्तिक रिक्त संचालक पदासाठी मतदान कोण करणार आहे. त्याबाबत जाहिरातीत संदिग्धता दिसून येत असून, ते पद तर सर्व सभासदांनी मतदान करुन निवडलेले आहे. आता या पदाच्या निवडणुकीत कोण मतदार असणार आहेत. याबाबत संबंधित यंत्रणेने  खुलासा करावा अशी विनंती सभासदांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे.     श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे या सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की, आपल्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातील अनुसूचित जाती/जमाती या प्रवर्गातील / मतदार संघ क्र. ३ मधील संचालक निवडीकरिता अध्यासी अधिकारी, मा. श्री. प्रमोद दुरगुडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, बारामती, ता. बारामती, जि. पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १...

निरा मोरगाव रस्त्यावर महाकाय वृक्ष पडले : वाहतूक कोंडी झाली. बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

Image
  निरा मोरगाव रस्त्यावर महाकाय वृक्ष पडले : वाहतूक कोंडी झाली.  बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष  पुरंदर /सोमेश्वर           नीरा मोरगाव रोडवरील जेधे पेट्रोल पंपा व आदित्य ढाब्या समोर एक महाकाय वृक्ष पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गेली वर्षभरापासून हे झाड कधी पडते याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पहात होतं का ? असा प्रश्न येथील स्थानिक नागरिकांनी आज विचारला आहे. याच वृक्षाखाली नियमितपणे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे कर्मचारी दिवसभर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत असतात, सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी व वाहनांचे नुकसान झाले नाही.       सातारा नगर राज्य मार्गावरील निरा मोरगाव दरम्यानच्या निराश डाव्या कालव्याच्या पुढे जेधे पेट्रोल पंप व आदित्य ढाबा यांच्या समोरील एक उंच व महाकाय असे वढाचे झाड गेली वर्षभरापासून पडण्याच्या स्थितीत होते. याबाबत स्थानिकांनी प्रशासनाला कळवले होते. मात्र प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केल्याने आज बुधवारी सकाळी हे झाड रस्त्यावर कोसळले. दैव बलत तर म्हणून यावेळी कोणतेही ...

कार्यक्रम निमंत्रणाचा स्विकार, होकार देऊनही गैरहजर राहिलेल्या मंत्र्यांचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी मानले आभार

Image
 कार्यक्रम निमंत्रणाचा स्विकार, होकार देऊनही गैरहजर राहिलेल्या मंत्र्यांचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी मानले आभार  मुंबई :  मा.संजयजी शिरसाट आणि मा. मेघना बोर्डीकर मॅडम...  सप्रेम नमस्कार  आपण दोघांनाही सेलुतील पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी वेळ दिला नाही.. त्याबद्दल आपले मनापासून आभार. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबद्दलची ही अनास्थाच दाखवून देते की, आपल्याला जनसामांन्यांबद्दलही जराही कळवळा नाही.. अर्थात आपण आला नाहीत तरी आपली कोणतीही उणीव आम्हाला जाणवली नाही, कोणी आपली आठवण काढली नाही, मंत्री का आले नाहीत अशी विचारणाही कोणी  केली नाही की, मंत्री नाहीत म्हणून कोणी वाईट वाटूनही घेतलं नाही. आपण नसतानाही आमचा कार्यक्रम फारच देखणा, सुरेख, अविस्मरणीय  झाला.. खरं म्हणजे "पत्रकारांच्या कार्यक्रमास मंत्र्यांना बोलवताच कामा नये या मताचा मी आहे", परंतू संघटना चालवताना अनेकदा आपल्या आवडी-निवडी, आपली मतं बाजुला ठेवत तडजोडी कराव्या लागतात. त्यामुळं आपल्याला निमंत्रित करावं लागलं होतं. आमचे पदाधिकारी दोन वेळेस आपल्याला भेटायला संभाजीनगरला आले....

"पत्रकारांच्या प्रश्नासाठी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार" मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांचा इशारा.

Image
"पत्रकारांच्या प्रश्नासाठी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार" मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांचा इशारा.  सेलू येथे आदर्श जिल्हा, तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व अध्यक्षांचा मेळावा उत्साहात मुंबई, प्रतिनिधी दि.१ फेब्रुवारी २०२५ : 'पत्रकारांच्या प्रश्नासाठी मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला. पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा व्हावा, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. अखेर सरकारने २०१७ मध्ये पत्रकार संरक्षण कायदा केला. पण प्रत्यक्षात या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. कारण या कायद्याचे नोटिफिकेशन निघाले नाही. पत्रकार संरक्षण कायद्यासह सरकार पत्रकारांच्या इतर प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठी पत्रकार परिषद राज्यभर रस्त्यावर उतरून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करणार आहे,' असा इशाराच परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिला.  मराठी पत्रकार परिषद आयोजित  रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व अध्यक्षांचा मेळावा परभणी ...