Type Here to Get Search Results !

नीरेच्या भर बाजेरपेठेतून ७० हजार लंपास रहदारीच्या रस्त्यावर दिवसा ढवळ्या डल्ला मारून केला पोबारा

Top Post Ad

 नीरेच्या भर बाजेरपेठेतून ७० हजार लंपास 


रहदारीच्या रस्त्यावर दिवसा ढवळ्या डल्ला मारून केला पोबारा 



पुरंदर :

नीरा (ता पुरंदर) भर बाजारपेठेतील बॅंके समोरून दुचाकीवरील रोख रक्कमेवर डल्ला  मारण्यात आला आहे. बॅंके समोरून ७० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास करू पोबारा केला आहे. याबाबत फिर्याद गुळूंचे येथील युवराज शामराव निगडे यांनी जेजुरी पोलिसांत दाखल केली आहे. 


    नीरा पोलीस दुरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार युवराज शामराव निगडे (वय ४७ वर्ष) रा. गुळूंचे (ता. पुरंदर) हे शुक्रवारी (दि.१४) सकाळी ११.१५ वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके समोर दुचाकी क्र. एम.एच. १२-जी.एल. ३४४७ लावली होती. या मोटारसायकलच्या हँडलला लावलेली पिशवीत ठेवलेल्या ७० हजार रुपये रकम माझे नकळत कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. त्या अज्ञात चोरट्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात यावी अशी फिर्याद निगडे यांनी दाखल केली आहे. 


    नीरेच्या भरबाजारपेठेत दिवसाढवळ्या रहदारीच्या रस्त्यावर चोरी होतं असल्याने व्यापाऱ्यांनी भिती व्यक्त केली आहे. या ठिकाणी बॅंका, पतसंस्था, सराफ व्यावसायिक, कापड व्यावसायिक, किराणा दुकानदार यांची मोठी दुकाने आहेत. सर्वांचे सिसीटीव्ही आहेत. शिवाय नीरा ग्रामपंचायतीने ही चौका चौकांत सिसीटीव्ही लावले आहेत. हे सर्व भेदून चोरटा कसा सुरक्षित पुणे शहरा बाहेर पडतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील काळात अनेक दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काहींनी घराबाहेर लावलेल्या सिसीटीव्ही कॅमेरा मुळे चोरटे दिसतं असले तरी चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलीस अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे आता ही रक्कम चोरलेले चोरटे मिळतीलच याची शाश्वती लोकांना वाटतं नाही. 

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Hollywood Movies