निरा मोरगाव रस्त्यावर महाकाय वृक्ष पडले : वाहतूक कोंडी झाली.
बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
पुरंदर /सोमेश्वर
नीरा मोरगाव रोडवरील जेधे पेट्रोल पंपा व आदित्य ढाब्या समोर एक महाकाय वृक्ष पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गेली वर्षभरापासून हे झाड कधी पडते याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पहात होतं का ? असा प्रश्न येथील स्थानिक नागरिकांनी आज विचारला आहे. याच वृक्षाखाली नियमितपणे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे कर्मचारी दिवसभर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत असतात, सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी व वाहनांचे नुकसान झाले नाही.
सातारा नगर राज्य मार्गावरील निरा मोरगाव दरम्यानच्या निराश डाव्या कालव्याच्या पुढे जेधे पेट्रोल पंप व आदित्य ढाबा यांच्या समोरील एक उंच व महाकाय असे वढाचे झाड गेली वर्षभरापासून पडण्याच्या स्थितीत होते. याबाबत स्थानिकांनी प्रशासनाला कळवले होते. मात्र प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केल्याने आज बुधवारी सकाळी हे झाड रस्त्यावर कोसळले. दैव बलत तर म्हणून यावेळी कोणतेही वाहन या रस्त्याने जात नव्हते. मात्र, हे झाड पडल्याने विद्युत वितरण कंपनीच्या खांबांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे आता पुढील काही दिवसात ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निरा येथून गुळूंचे, राख व पुढील काही गावांसाठी सिंगल फेज व उच्च दाबाच्या तारा या रस्त्याच्या कडेने गेलेले आहेत. याच खांबांवर हे झाड कोसळून विद्युत तारांचीतारांची व खांबांची मोडतोड झाली आहे.
हे झाड रस्त्यावर ऐन सकाळी आडवे पडल्याने शाळकरी व कामावर जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराबाबत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे कर्मचारी नित्यनियमाने याच भागात दररोज गस्त व सक्तीची वसुली वाहनचालकांकडून करत असतात. याच झाडाखाली कित्येक वेळा हे पोलीस उभे राहून शाळकरी मुलांना व नोकरी निमित्त दुचाकीवरून जाणाऱ्यांना अडून विविध कारणांनी पावती न देता आर्थिक वसुली करत असतात. तसेच, अवजड वाहन चालकांकडूनही दंड मारत असतात. मात्र, रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही पावले हे वसुली अधिकारी करताना दिसून येत नाहीत. आज बुधवारी सकाळी आठच्या सुमारास पडलेले हे झाड आता दहा वाजले तरी हे अधिकारी त्या भागाकडे साधे फिरकलेही नाहीत याबाबत स्थानिकांनी रोष व्यक्त करत माध्यमांना ही
माहिती दिली