Thursday, May 30, 2024

अभिमानास्पद….! 'अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपट ठरला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिला मराठी चित्रपट*

मुंबई : प्रेम कहाणी सोबतच आदमखोरी दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणार या चित्रपटाचं कथानक आहे. तसेच रत्नागिरी सुपुत्र फैरोज माजगांवकर ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातून मराठी चित्रपट सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या पदार्पणाच्या चित्रपटाचे मोशन पोस्टर चक्क ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर प्रदर्शित करण्यात आल. शिवाय ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिल्या मराठी चित्रपटाचा मान मिळाला. हास्यजत्रा फेम अभिनेता अरुण कदम, संजय खापरे, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. शिवाय अदिन माजगांवकर आणि अली माजगांवकर हे बालकलाकार देखील आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे आहेत. येत्या ७ जूनला हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होईल.” गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी, प्रस्तुतकर्ते एम आर जोकर एंटरटेनमेंट एल एल पी सोबत सहयोगी अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स & एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचे श्री.फैरोज अनवर माजगावकर, श्री.अमजद हुसैन निराळे, श्री.श्रीकांत सिंह आणि सह निर्माते म्हणून श्री.अनिल वहाने आणि श्री.सुनील यादव ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' या चित्रपटाचे निर्माते आहेत. साई पियुष,ऍलेन के पी ऊर्फ सिद्धार्थ पवार आणि निरंजन पेडगावकर हे संगीत दिग्दर्शक आहे. तसेच ‘ब्लू लाइन म्यूजिक’ ही म्युझिक पार्टनर कंपनी आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’विषयी बातचीत करताना अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगांवकर म्हणाला, “‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ हा माझा पहिलाच चित्रपट आहे. मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आपला मराठी चित्रपट आज न्यूयॉर्कपर्यंत पोहोचला आहे. माझ्यासाठी व सर्व मराठी चित्रपटसृष्टी करिता ही अभिमानाची गोष्ट आहे. मी याच सर्व श्रेय या चित्रपटाच्या टीमला देतो. तसेच प्रेक्षकांना विनंती करतो की सर्वांनी हा चित्रपट ७ जूनला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पाहा. आणि तुमच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा.” चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे सांगतात, “मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच माझ्या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर प्रदर्शित झाल ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर माझ्या चित्रपटाचं मोशन पोस्टर झळकलं, त्यामुळे माझ्यात वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे की हा चित्रपट लोकांच्या मनावर राज्य करेल. आणि लोकांच्या पसंतीस पडेल. ही अपेक्षा मी व्यक्त करतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाचं नाव जरी प्रेमावर आधारित असलं तरी यामागे दडलेलं भयानक कृत्य आहे ते तुम्हाला चित्रपटगृहातच पाहायला मिळेल. माझी रसिक प्रेक्षकांना एकच विनंती आहे की या चित्रपटातील टीज़र आणि गाण्यांना तुम्ही जो प्रतिसाद दिलात तोच प्रतिसाद ७ जूनला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर नक्की द्याल. आणि आपला मराठी चित्रपट यशाच्या शिखरावर घेवून जाल.”

राजगड तालुक्यात तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न...! मुंबईतील गुंडाकडून दहशतीचा प्रयत्न, कोंढावळे खुर्द येथील घटना

पुणे : राजगड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढावळे खुर्द येथे जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याने एका २१ वर्षीय तरुणीला जेसीबीच्या सहाय्याने
शेतात गाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रणाली बबन खोपडे ( वय.२१) असे त्या तरुणीचे नाव असून त्या तरुणीची आई कमल बबन खोपडे यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात कोणाविरुद्ध देखील गुन्हा दाखल नसल्याचे वेल्हे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार कमल बबन खोपडे आणि त्यांच्या दोन मुली या मी त्यांच्या शेतात असलेल्या गट नंबर ११४ मध्ये काम करत होत्या. यावेळी या ठिकाणी संभाजी खोपडे याने येऊन पंधरा ते सोळा गुंड सहीत जेसीबी व ट्रॅक्टर आणून ही जमीन माझ्या नावावर झाली असून तुम्ही या जमिनीत थांबू नका असे म्हणाला. त्यावेळी माझी मुलगी प्रणाली ही विरोध करत असताना तिला जेसीबीने ढकलून देत तिच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य ओळखून कमल खोपडे यांनी वेळीच हस्तक्षेप करीत दुसरी मुलगी प्राजक्ताच्या साह्याने तिच्या अंगावरील माती बाजूला काढून तिला वाचवले. या प्रकरणी प्रणाली व तिची आई कमल यांनी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तक्रारी अर्ज घेतला असून अद्यापही कोणावर गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती वेल्हे पोलिसांकडून मिळाली. याबाबत वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ म्हणाले, या प्रकरणी दोन्ही बाजू करून तक्रारी अर्ज दाखल झाले असून योग्य तो तपास करून चौकशी अंती गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Wednesday, May 29, 2024

भोसरीत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक, दहशतवादी पथकाची कारवाई

पिंपरी : पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाने बनावट कागद पत्रासह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या 5 जणांना दहशत विरोधी शाखेने अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी भागात ही कारवाई करण्यात आली आहे. यात पोलिसांनी शमीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार ,वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीऊल हक हिरा, आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दिन फकीर या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तसचे पोलिसांनी त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सिम कार्ड अकरा हजार रुपये किमतीचा मोबाईल, एअरटेल कंपनीचे सिम आदी साहित्य जप्त केले. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा पारपत्र अधिनियम व भारतात प्रवेश करण्याचा नियम यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हे बांगलादेशी नागरिक आहेत. ते भोसरी परिसरात अनेक दिवसांपासून रहात होते. त्यांच्याकडे कोणताही परवाना किंवा वैध कागदपत्रा शिवाय ते येथे राहत होते. त्यांनी येथे रहाण्यासाठी बेकायदेशीर रित्या भारतात बनावट आधार कार्ड, जन्म दाखला व शाळा सोडल्याचा दाखला ,पासपोर्ट बनवून घेतला होता. याबाबत दशत विरोधी पथकाला याची माहिती मिळाली. आणि त्यांनी भोसरी परिसरात त्यांच्यावर धाड टाकत ही कारवाई केली आहे. पोलिसांनी घटनस्थळवरून पाच बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यांघटेनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे अपघात प्रकरणातील दोषींना सोडणार नाही : वडेट्टीवार यांचे पुणेकरांना वचन

पुणे : पुणे सांस्कृतिक, शैक्षणिक नगरी आहे.देशातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना पुणे शहर सुरक्षित शहर वाटते. निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक व्हावे, असे अनेकांना वाटते. पण आता पुणे असुरक्षित वाटायला लागले आहे. पुण्यातील कार अपघात प्रकरणी आमचे आमदार धंगेकर पुढे आले त्यांनी प्रकरण लावून लावले. या अपघात प्रकरणी कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे. विरोधी पक्षनेता आणि नागरिक म्हणून तुमच्या सोबत आहे असा पुणेकरांना विश्वास देत या अपघात प्रकरणी न्यायिक चौकशी आम्ही मागणी केली असून दोषींना सोडणार नाही असे वचन वडेट्टीवार यांनी पुणेकरांना दिले. दोन निष्पाप जीव गेले आहेत. याचे दुःख मोठे आहे. आता सरकार बदलण्याची वेळ आली. एकाला बदलून उपयोग काय? सगळ्यांनी लुटण्याचे काम या सरकारने केले. एकाला बाजूला करून काय होणार नाही. आता महायुती बाजूला केली पाहिजे, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल बोल केला. संतप्त पुणेकरांनी 'असुरक्षित पुणे कोणामुळे' हा संवाद आयोजित केला होता. पुणे बचाव समिती कार्यक्रमाचे आयोजक होते. या कार्यक्रमात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात वडेट्टीवार यांनी खडे बोल सुनावले. त्याच बरोबर माध्यमांशी बोलताना सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. वडेट्टीवार म्हणाले की, राजकारणी म्हणून घ्यायला लाज वाटते अशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांनी करून ठेवली आहे. आधी जो आदर होता आता तो राहिला नाही.कारण सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला. पोर्शे कार अपघात प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता. यावर आक्षेप घेत आमचे आमदार धंगेकर यांनी वस्तुस्थिती मांडली. गुन्हेगार शिक्षा झाली पाहिजे. त्यांना वाचवणाऱ्याना शिक्षा झाली पाहिजे.आरोपी श्रीमंत आहे तेव्हा त्याला वाचवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. या घटेनमागे राजकीय दबाव होता. त्याचे पुरावे आहेत. घटना घडते आणि पोलिस सुस्त होते. गुन्ह्याची नोंद नीट होत नाही. रक्ताचे नमुने बदलले जातात. सगळ प्रकरण संशय निर्माण करणारे आहे. डॉक्टर, पोलिस दोषी आहेत. पल्लवी सापळे भ्रष्टाचाराच्या सापळ्यात आहेत. त्यांना साफसफाई करायला पाठवले आहे. घटना घडेपर्यंत कारवाई होत नाही. कुणाचा फोन होता. कोणी फोन केला. त्याला सहआरोपी केले पाहिजे. चौकशी करायला येता आणि बिर्याणी मागवता. ही चौकशी आहे का? या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वागण्याची अपेक्षा होती. पोलिस आयुक्त आल्यावर त्यांनी गुंडांची परेड केली. फक्त दिखावा केला. वडेट्टीवार म्हणाले की, पुणे विद्यापीठात गांजा सापडला. पुणे पोलिस आयुक्तालय मध्ये दारू बाटल्या सापडल्या. तीन महिने नंबर नसलेली कर पुणे रस्त्यावर फिरत होती. तरी देखील कारवाई नाही. कारण इथल्या पोलीस आयुक्तांचा वचक नाही. सरकारमध्ये बदल्यांचा भ्रष्टाचार आहे. २०२३ मध्ये डॉ. तावरे यांची बदली करावी असा, अहवाल होता.तरी तावरे बदली झाली नाही. किडनी, ड्रग प्रकरणात त्यांचे नाव आले. तरी बदली केली नाही. ससूनची पार वाट लावली असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात तरुणाची गोळ्या घालून हत्या ! पिंपरी चिंचवड शहरातील घटना, आरोपी फरार

पुणे : पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस डोकंवर काढत आहे. त्यातच आज बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी नवी सांगवी परिसरात गोळ्या झाडून एका ३० वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दीपक कदम असे त्या तरुणाचे नाव असून तो सराईत गुन्हेगाराचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. खून केल्यानंतर अज्ञात हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी हा गजबजलेला परिसरात या परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ सुरू असते. या ठिकाणी दीपक हा तरुण उभा होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या तोंडावर पिस्तुलातून फायरींग केले. अचानक फायारिंग झाल्याने त्याला पळायला देखील संधी मिळाली नाही. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रकातच्या थारोळ्यात पडला होता. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास करण्याचे काम सुरू आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला चाप बसवण्याचे काम पोलिसांकडून केले जाणे गरजेचे आहे. या घटनेने पिंपरी चिंचवडसह पुणे शहरात देखील मोठ्या संख्येने गुन्हेगारी वाढताना पहायला मिळत आहे. सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याने काही प्रमाणात या भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पूर्व वैमस्यातून ही हत्या झाली का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अधिक तपास पोलिसांकडून केला आहे.

इंटर्नशिपच्या नावाखाली तरूणांना फुकटात राबवून घेण्याची माहिती विभागाची "अग्नीवीर" टाइप योजना

 इंटर्नशिपच्या नावाखाली तरूणांना फुकटात राबवून

घेण्याची माहिती विभागाची "अग्नीवीर" टाइप योजना





मुंबई : माहिती आणि जनसंपर्क विभागात अधिकारी, कर्मचारयांची वाणवा आहे. या विभागातील अनेक उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकऱ्यांच्या जागा वर्षानुवर्षे रिक्त आहेत. त्या भरल्या जात नाही. त्यामुळे माहिती आणि जनसंपर्क विभागानं "अग्नीवीर" टाइपची योजना विभागात आणली आहे.

       पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या मुलांना आंतर्वासिता अर्थात इंटर्नशिपच्या नावाखाली फुकटात राबवून घेण्याची ही योजना आहे. तीन महिन्यासाठी ही इंटर्नशिप योजना असून या काळात प्रशिक्षण घेणाऱ्यांना कोणतेही मानघन, प्रवास भत्ता, अथवा निवास व्यवस्था दिली जाणार नाही असं माहिती जनसंपर्क विभागानं या संबंधात प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत म्हटलं आहे.


      मुद्रीत माध्यम, दृकश्राव्य माध्यम, वेब माध्यम, समाज माध्यम अशा विविध माध्यमांचा जवळून अभ्यास करण्याची संधी मुलांना मिळणार असल्याची "लालूच" या जाहिरातीत दाखविली गेली आहे. माहिती आणि जनसंपर्क विभाग म्हणजे पांढरा हत्ती झाला आहे. त्यामुळं सरकारचंही या विभागाकडे लक्ष नाही. परिणामत: विभागातील रिक्त जागाही सरकार भरत नाही. त्यामुळे फुकटचं मनुष्यबळ वापरून घेण्याची ही योजना असल्याचा आरोप मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख यांनी केला आहे.

      प्रत्यक्षात तीन महिन्यात मुलांना खरंच काही शिकायला मिळेल का? याबद्दल आम्ही साशंक आहोत. कारण माहिती जनसंपर्क विभाग जाहिराती, फिल्म, मुद्रण यासारखी अनेक कामं बाहेरून करून घेत असते. त्यामुळे फुकटात मुलांना राबवून घेणं हाच या योजनेचा उद्देश दिसतो आहे.

     पत्रकारितेच्या मुलांना खरंच चांगला अनुभव मिळावा अशी सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर मुलांची निवड करून त्यांची मुंबईत राहण्याची व्यवस्था करावी, मुलांना स्टायफंड द्यावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली आहे. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात येणार असल्याचे एस. एम. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Tuesday, May 28, 2024

मनोज जरंगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला मारहाण, पोलिस स्टेशनला केले हजर, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला घरातून बाहेर काढत जारांगे पाटील समर्थकांनी मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दीपक बद्री नागरे ( वय ३५ ) असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याने मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोशल मीडियावर मंगळवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध आक्षेपार्य पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुकुंदवाडी परिसरामध्ये मराठा बांधवांचा जमाव गोळा झाला. यावेळी या संतप्त नागरिकांनी आक्षेपरीय पोस्ट टाकणाऱ्या तरुणाच्या घराची शोधाशोध सुरू केली. मुकुंदवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या तरुणाला शोधून काढत त्याला घरातून बाहेर काढताना मारहाण केली. यावेळी त्याला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलं. याप्रकरणी नवनाथ डांगे यांनी फिर्याद दिली आहे.

मराठी पत्रकार संघ जिल्हा परभणीच्या वतीने जेष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांचा परभणीत सन्मान

 मराठी पत्रकार संघ जिल्हा परभणीच्या वतीने जेष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांचा परभणीत सन्मान




परभणी :
        झी २४ तास, `न्यूज१८ लोकमत' या वृत्तवाहिन्यांचे व DNA या दैनिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक असणारे, पत्रकारिता आणि आर्थिक क्षेत्रात कामाचा दांडगा अनुभव. अग्रगण्य आयटी कंपनीत आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर प्रमुख पदावर असणारे,
५० हून अधिक देशांत शैक्षणिक क्षेत्र, अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापन कौशल्य यांतील विविध विषयांवर व्याख्याने देणारे, पत्रकारितेमध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने अनेक नवे उपक्रम सुरू केले. सामाजिक बांधिलकी जपताना राष्ट्रभक्तीचा भाव मनात सर्वोच्च असल्यामुळेच `धागा शौर्य का, राखी अभिमान की' आणि सैनिकांच्या कुटुंबांबरोबर दिवाळी साजरी करत 'आपला सैनिक, आपली दिवाळी' हे उपक्रम सुरू करणारे, अनेकदा सीमेवर जाऊन सैनिकांशी संवाद साधनारे, सध्या देश-विदेशातील विद्यापीठे, संशोधन संस्थांमध्ये कार्यरत असणारे डॉ. उदय निरगुडकर यांचा परभणी शहरातील हॉटेल ग्रीन लीफ येथे मंगळवार दि. 28 मे 2024 रोजी मराठी पत्रकार परिषद संलग्न मराठी पत्रकार संघ जिल्हा परभणीच्या वतीने शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला आहे.

     यावेळी डॉ. उदय निरगुडकर यांनी तब्बल 2 तास विविध विषयावर सकारात्मक दिलखुलास चर्चा करत मोलाचे मार्गदर्शन ही केले आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषदचे उपाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख प्रा. सुरेश नाईकवाडे, प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण मानोलीकर, मराठी पत्रकार संघ परभणी जिल्हा अध्यक्ष राजकुमार हट्टेकर, परभणी महानगर उपाध्यक्ष पांडुरंग अंभुरे, महानगर सचिव संघपाल आढागळे, डिझिटल मीडिया परभणी प्रमुख तथा महानगर सहसचिव प्रमोद अशोकराव अंभोरे, सभासद शेख आजहर आदींची उपस्थिती हो

सुप्रिया सुळेंमुळे मी पक्ष सोडणार आहे.; सोनिया दुहान यांचा आरोप

मुंबई : सध्या पक्षात सर्व काही सुरळीत सुरू नाही. मी सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्ष सोडत आहे. असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. दूहान यांच्या वक्तव्यामुळे शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चा आता सुरू झाल्या आहेत. माध्यमांशी बोलताना दुहान यांनी म्हटले आहे की, मी शरद पवार यांना सोडलेले नाही आणि मी पक्ष सोडलेला नाही. या अफवा कोण पसरवत आहे हे मला माहीत नाही. मी अजितदादांच्या पक्षात गेलेले नाही. शरद पवार यांच्याशी अनेक दशके जोडलेले नेते पक्ष का सोडत आहेत. याचा विचार सुप्रिया सुळेंनी करायला हवा. पक्षात सर्व काही सुरळीत चालत नाही. सुप्रिया सुळेंमुळे मला पक्ष सोडावा लागत आहे. सेल्फी काढून पक्ष चालत नाही. पक्षाला पक्षाच्या नियमानुसार चालवावे लागते. ही गोष्टी सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आजुबाजुच्या नेत्यांना समजून घ्यावी लागेल. पण सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आजुंबजुचे जे काही नेते मंडळी आहेत. ते नेत्याना संपवण्याचे काम करत आहेत. तसेच सुप्रिया सुळे आमच्या नेत्या नाही होऊ शकल्या अशी खंत देखील दुहान यांनी बोलून दाखवली आहे.

मतमोजणीदिवशी शिरुर लोकसभा मतदार संघ मतमोजणी केंद्र परिसरात नो- पार्किंग झोन घोषित

पुणे : शिरुर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी दिवशी मतमोजणी केंद्राच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ४ जून रोजी पहाटे ००.०१ ते सायं. ०६.०० या कालावधीत चार ठिकाणी नो- पार्किंग झोन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी घोषित केला आहे. महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाचे गोडाऊन क्र. २, ब्लॉक पी-३९, एमआयडीसी एरिया रांजणगाव, कारेगाव, ता. शिरुर येथे शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी पार पाडली जाणार आहे. मतमोजणी ठिकाणाच्या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सदर कालावधीत अहमदनगर- पुणे महामार्गावर राजमुद्रा चौक ते कर्डेलवाडी चौक, यश इन चौक ते एसबीआय चौक कारेगाव एमआयडीसी, यश इन चौक ते रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता आणि युकेबी कंपनी चौक ते मॅकफेरी कंपनी समोरील चौक संपूर्ण रस्ता कारेगाव एमआयडीसी या ठिकाणी नो- पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे. पुणे मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलमांप्रमाणे प्राप्त अधिकारांन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ नुसार हे आदेश जारी करण्यात आले असून आदेशाचे उल्लंघन करणारे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ तसेच भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार कारवाईस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके' ; तरुणांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले

पुणे : सुधीर फडके म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव आहे. त्यांची सांगितिक कारकीर्द आपल्यापैकी खूप लोकांना माहिती आहे, पण त्यांचा इथंवर पोहोचण्याचा प्रवास हा निश्चितच सोपा नव्हता. पुष्कळ चढउतार यादरम्यान आले. बाबूजींचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवासही तितकाच रंजक होता. बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून अनेक मान्यवरांनी, समीक्षकांनी, प्रेक्षकांनी या चित्रपटास पसंती दर्शवली आहे. भारतातचं नव्हे तर परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. बॉलिवूडमधील आपली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित त्याचबरोबर सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेकांनी या चित्रपटाचे गोडवे गायले असून हा चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहनही केले होते. कलाकारांचे, दिग्दर्शनाचे कौतुक होत असतानाच आता मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट तमाम मराठी प्रेक्षकांना, विशेषतः तरुणांनी हा चित्रपट हमखास चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले असून ते म्हणाले, "महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असले प्रतिभा संपन्न गायक, संगीतकार सुधीर फडके(बाबूजी) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट स्वरगंधर्व सुधीर फडके आता जगभरात प्रदर्शित झाला आहे. बाबूजींचा जीवनप्रवास, त्यांनी केलेला संघर्ष आणि प्रामाणिक कष्टातून आयुष्याला दिलेली उत्तुंग कामाची झळाळी या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. राष्ट्रप्रेमाचा आणि संगीत कलेचा ध्यास घेऊन आयुष्य सत्कारणी लावणाऱ्या बाबूजींना खऱ्या अर्थाने आदरांजली म्हणून आपण सर्वानी हा चित्रपट पहावा." याबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ''माझ्या मनाला खूप समाधान मिळतेय, आमच्या सर्वांची मेहनत फळाला आली आहे असे म्हणण्यात हरकत नाही. आज प्रेक्षकांकडून, इंडस्ट्रीकडून चित्रपटाचे तसेच मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून देखील कलाकारांचे आणि चित्रपटाचे इतके कौतुक होत आहे. चित्रपट पाहिल्यावर अनेकांचे मेसेज, फोन येत आहेत. माझ्यासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षाही मोठी कौतुकाची थाप आहे. यासाठी सर्वांचे मनापासून आभार.''

नारायणगाव कालव्याच्या कडेला आढळल्या रक्त तपासणीच्या सँपल ट्यूब, जुन्नर तालुक्यात खळबळ

नारायणगाव, पुणे : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्त तापसनीचे हजारो सँपल ट्यूब कालव्याच्या कडेला फेकल्याचा प्रकार समोर आला आहे.या घटनेनं जुन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नारायणगावमधील पुणे - नाशिक महामार्गलगत असणाऱ्या कालव्या लगत रक्त तपासणीचे हजारो सॅम्पल ट्यूब टाकण्यात आल्या आहेत. पाण्याच्या कालव्यालगत सापडलेल्या ब्लड सॅम्प्ल्सच्या ट्यूबमध्ये असलेलं रक्त पाण्यात जाऊन इतरांना त्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. हा कालवा अनेक गावांना जोडतो, त्यामुळे हे दूषित झालेलं पाणी जर कोणी प्यायला, तर त्यामुळे विविध आजार उद्भवण्याचीही शक्यता आहे. त्यामळे या रक्ताच्या ट्यूब, अशा बेजबाबदारपणे कोणी टाकल्यात, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. अशा ट्यूब अनधिकृतपणे कुणी टाकल्या, त्याचा तपास प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र अशा घटनांमुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

पिंपरीत प्रेम प्रकरणांतून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : पुण्यात पार्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणाने चार चाकी गाडीने तरुण आणि तरुणीला उडवले असल्याची घटना समोर आली आहे. चारचाकी चालक हा पिलेला होता. त्या नशेत त्याने दुचाकीवरील दोघांना मारहाण देखील केली आहे. या घटनेत दुचाकीवरील निलेश शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी सुशील भास्कर काळे या चारचाकी चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी मध्यरात्री १ वाजता ही घटना पिंपरीतील टेल्को रोड घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश शिंदे आणि सुशील काळे या दोघांची एकच गर्लफ्रेंड आहे. या तरुणीचे सध्या सुशील सोबत प्रेमसंबंध असून निलेश पासून ती वेगळी आहे. मात्र ही गोष्ट निलेश याला समजल्याने तो मला मानसिक त्रास देत असल्याचे प्रियेसीचे म्हणणे आहे. मंगलावारी रतरी एक्स बॉयफ्रेंड निलेश हा आपल्या प्रियेसिला भेटण्यासाठी आला होता. ही माहिती सुशील याला दिली. जेव्हा निलेश हा प्रिसेसिसोबत बोलत होता. त्यावेळी सुशील याने चारचाकी निलेश याच्या अंगावर घातली. यात निलेश गंभीर जखमी झाला. या घटनेने पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात पार्से कारचे.प्रकरण ताजे असताना ही घटना घडल्याने पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले असल्याचे पहायला मिळत आहे.

Saturday, May 25, 2024

गोलंदाजी करताना मिलिंद ग्राऊंडवरच कोसळला...! हृदयविकाराचा झटका आल्याने क्षणात सगळं संपल

पुणे : कुणाचं मरण कधी कुठे लिहिलेलं असेल याचा काही नेम नाही. त्यात आजच्या धावपळीच्या युगात या गोष्टी सरास घडताना पाहायला मिळत आहेत. अशी एकच मनाला चटका लावणारी घटना पिंपरी चिंचवड शहरातून समोर आली आहे. एका ४० वर्षीय तरुणाला क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगवी परिसरातील पीडब्ल्युडी मैदानावर ही घटना घडली. मिलिंद भोंडवे ( वय ४०) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्या मृत्यूने सांगवी परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड परिसरातील सांगवी येथील पीडब्ल्युडी मैदानात एका क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान गोलंदाजी करणाऱ्या तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. झटक्यानंतर तो तेथेच कोसळला. सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मिलिंद हा भोंडवे हा मावळ तालुक्यातील दारूंब्रे येथे वास्तव्य करीत होता. मिलिंद भोंडवे हा तरुण शेतकरी कुटुंबातील तरुण होता. आई, वडील, दोन भाऊ, वहिनी, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्याला क्रिकेटची आवड असल्याने तो नेहमी क्रिकेट खेळत होता. या घटनेनंतर परिसरात तसेच क्रिकेट प्रेमी खेळाडूंमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

Friday, May 24, 2024

अबब..! स्विगी इंस्टामार्टवर तब्बल २५०० टनांहून अधिक आंब्याची विक्री

बंगलोर : आंब्याचा हंगाम शिगेला पोहोचत असताना, स्विगी इन्स्टामार्टला भारतातील सर्वात प्रिय फळांच्या मागणीत अभूतपूर्व वाढ होत आहे. २५००टन आंब्यांच्या विक्रमी विक्रीसह - ४० दशलक्ष ग्लासांहून अधिक आंब्याची लस्सी काढण्यासाठी पुरेशी - हे स्पष्ट आहे की आंब्याची क्रेझ पूर्वीपेक्षा जास्त आहे. बंगलोर ते मुंबईपर्यंत, आंब्याची विक्री संपूर्ण शहरांमध्ये पसरलेला आहे ज्यामध्ये जवळपास दशलक्ष अद्वितीय वापरकर्ते फळांच्या १४ पेक्षा जास्त विविध प्रकारांचा प्रयोग करतात. उल्लेखनीय म्हणजे, बंगळुरू जवळपास अर्धा दशलक्ष ऑर्डर्ससह आघाडीवर आहे आणि शहरातील वापरकर्त्याने आंब्यावर तब्बल ४६५८८ रुपये खर्च केले आहेत. चेन्नईचा एक वापरकर्ता मागे नाही, कारण त्यांनी या हंगामात ५५ किलोपेक्षा जास्त वजनाच्या आंब्याची ऑर्डर दिली आहे. कच्च्या आंब्याच्या विक्रीतही वाढ झाली आहे, ज्यामुळे तिखट, मसाल्यांनी भरलेल्या पदार्थांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. या वर्षीचा आंबा विक्रीचा डेटा भारतीय ग्राहकांच्या विविध पसंतींना प्रतिबिंबित करतो आणि स्पष्ट करतो की स्विगी इंस्टामार्टने उच्च मागणी, विशेषत: सकाळी सात ते दहा या वेळेत दरम्यान पीक ऑर्डरच्या वेळी कसे सामावून घेतले आहे.

मावळच्या आजीची कौतुकास्पद कामगिरी...! वयाच्या ५८ व्या वर्षी बारावीची परीक्षा झाल्या उत्तीर्ण

मावळ, पुणे : शिक्षणाची आवड कुणाला शांत बसू देत नाही. अनेकांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. शिवाय परिस्थिती पुढे घराची जबाबदारी देखील पडते. मात्र या सर्वांना मात देत मावळ तालुक्यातील एका ५८ वर्षीय आजी चक्क बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी तब्बल ४२ वर्षानंतर त्यांनी ही परीक्षा दिली आणि त्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांच्या या कामगिरीचे संपूर्ण मावळ तालुक्यातून कौतुक होत आहे. बनताबाई पुताजी काजळे / चोपडे असे या आजिंचे नाव आहे. गेल्या २५ वर्षांपासून या नायगाव येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. त्यांची दोन्ही मुले शिक्षित आहेत. त्या अंगणवाडी सेविका आहे. परिस्थितीमुळे बनताबाई यांचे शिक्षण अर्ध्यावरच सुटले. मात्र ४२ वर्षानंतर अंगणवाडी मदतनीस म्‍हणून काम करणार्‍या बनताबाई यांनी बारावीची परिक्षा देण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यासाठी त्‍यांनी सरकारने दिलेल्या मुदतवाढीचा फायदा घेत बारावीसाठी बाहेरून परिक्षा देता यावी यासाठी १७ नंबरचा फॉर्म भरला. आणि बारावीच्या अभ्यासाला सुरुवात केली. घरातील काम आणि त्‍यानंतर अंगणवाडी सेविका म्‍हणून काम केल्‍यानंतर अभ्‍यास करीत असे. प्रत्यक्षात जेव्हा पेपर देण्यासाठी आजीबाई वर्गात आल्या तेव्हा सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. आजींनी बारावीची परीक्षा दिली आणि बुधवारी त्यांचा निकाल जाहीर झाला. त्या परीक्षेत त्यांना तब्बल ४८ टक्के इतके गुण मिळाले आहेत. आजींनी जिद्दीने ही परीक्षा दिली आणि त्यात त्यांनी यशही मिळवून दाखवले. त्यामुळे शिक्षणाची आवड माणसाला शांत बसून देत नाही. त्याचाच एक उदाहरण म्हणून या आजींचे देता येईल. ५८ वर्षीय या आजींच्या जिद्दीला सलाम.

Thursday, May 23, 2024

शिंदे सरदारांच्या गावाचे कुस्ती मैदान महाराष्ट्र केसरी पै.अक्षय कामथे याने जिंकले

नीरा : पुरंदर तालुक्यातील शिंदे सरदारांचे आणि सैनिकांचे गाव असलेल्या पिंगोरी गावाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये झालेल्या भव्य कुस्ती स्पर्धेत शेवटची मानाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पीयन विजेता पै. अक्षय कामथे व पुरंदर केसरी विजेता पै.रघुनाथ जगताप यामध्ये रंगतदार झाली. तब्बल 45 मिनीटांच्या चित्तथरारक कसरतीनंतर पै. अक्षय कामथे यांनी पुरंदर केसरी विजेत्यास चितपट करुन बाजी मारली यामारत हे कुस्ती मैदान जिंकले.पिंगोरी येथील या दोन्ही पैलवानांना यथोचित सन्मान केला.यावेळी कामथे यांना ५१ हजाराचे रोख बक्षीस देण्यात आले. पिंगोरी(ता.पुरंदर)येथील ग्रामदैवत श्री वाघेश्वरी देवी यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रे निमित्त गुरूवार(दि.23) कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला.या आखाड्यात पुरंदर तालुक्यातील पैलवणासाठी कुस्ती स्पर्धा घेण्यात आली तालुक्यातील १०० हून अधिक पहिलवानांनी या मैदानात हजेरी लावली होती.यामध्ये २५ कुस्त्या पार पडल्या. पिंगोरी येथील ग्रामदैवत श्री वाघेश्वरी देवीचा कालपासुन दोनदिवशीय यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उत्सवमुर्तींची महापुजा, अभिषेक, छबिना आदि भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला. कुस्ती आखाड्याचे उदघाटन यात्रा कमिटी अध्यक्ष पोपट शिंदे, माजी उपविभागीय पोलिस अधिकारी तुकाराम शिंदे, लक्ष्मण कदम, वसंत शिंदे, सुनिल शिंदे, धनंजय शिंदे, रामदास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.कुस्ती स्पर्धेला परिसरातील कुस्ती शौकिनानांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली होती. सायंकाळी साडेपाच ते साडेसात दरम्यान कुस्त्यांचा आखाडा सुरू झाला. कुस्तीसाठी आखाड्यामध्ये शंभर रूपयांपासुन ते साठ हजार रूपयांपर्यंत रोख बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी सरपंच संदिप यादव, सिनेअभिनेते विनोद शिंदे, महादेव कदम, जीवन शिंदे, लालासाहेब शिंदे, सचिन शिंदे, माजी पोलिस पाटील राहुल शिंदे, कैलास गायकवाड, शशिकांत चौधरी,अजय शिंदे, सागर सुतार आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शेवटची मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र चॅम्पीयन विजेता पै. अक्षय कामथे याला 51 हजार रूपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. आखाडा यशस्वी करण्यासाठी प्रकाश शिंदे, ओंकार सुतार, तुषार शिंदे, ऋतुराज शिंदे, प्रणव शिंदे, किरण शिंदे, निरंजन शिंदे, अक्षय गायकवाड, विशाल गायकवाड, अक्षय चव्हाण, तुषार गायकवाड, सोहेल इनामदार आदिंनी परिश्रम घेतले. आखाड्याच्या जागेसाठी महेश गायकवाड यांनी सहकार्य केले. जिल्हा कुस्तीगार संघाचे पंच पै.तुषार गोळे, पै. आबा जगदाळे यांनी पंच म्हणुन तर निवेदन म्हणुन पै. किसन काळे यांनी काम पाहिले.श्री वाघेश्वरी देवस्थान कमिटी व श्री वाघेश्वरी तरूण विकास मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते.

Monday, May 20, 2024

निरा शिवतक्रावाडीत दोन नारळांच्या झाडावर वीज पडली. दोन झाडं एकाच वेळी पेटली : नंतर जोरदार पाऊस

 निरा शिवतक्रावाडीत दोन नारळांच्या झाडावर वीज पडली.


दोन झाडं एकाच वेळी पेटली : नंतर जोरदार पाऊस


निरा :
 
    मागील आठवड्यात शनिवारी व गुरवारी वादळीवाऱ्यासह जोराचा पाऊस नीरा परिसरातील गावखेड्यात झाला होता. नीरा शहरात फक्त वादळी वारा असायचा, पाऊस पडला नव्हता. आज सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोराचा वारा सुटला. सर्वत्र धुराळा उडवत होतो. सहा वाजता वीजांचा गडगडाट सुरू झाला. दरम्यान एक वीज जोरदार कडाडली व स्थानिकांच्या काळजाचा ठोका चुकला. ती वीज निरा शिवतक्रारवाडी रोडवरील निरेचे माजी उपसरपंच कल्याण जेधे यांच्या घरासमोरील दोन नारळांच्या झाडावर एकाचवेळी पडली होती. त्यामुळे झाडं पेटली होती.

      सोमवारी सायंकाळी निरा शहरातील लोक वस्तीतील घरासमोरच्या दोन नारळांच्या झाडांवर वीज पडली. वीज पडताना झालेल्या प्रचंड आवाजाने मंगल कल्याण जेधे या अंगणात धडपडून पडल्याने किरकोळ जखमी झाल्या. वीज पडल्यानंतर तात्काळ पावसाने जोर धरल्याने दहा ते पंधरा मिनिटात झाडावरील आग विझली.

     सायंकाळी वादळीवाऱ्यासह वीजांचा गडगडाट सुरु झाला म्हणून मंगल जेधे झाडाखालील वस्तू प्लॅस्टीकने झाकत होत्या. याच दरम्यान जोरदार आवाज झाला व वीज झाडावर पडली. या  आवाजाने व वीजेच्या धक्क्याने मंगल जेधे गरबडून धडपडल्या व अंगणात पाठिवर पडल्या. त्या प्रचंड घाबरल्या होत्या. घरातील सदस्यांना मंगलताईंचा आवाज आल्याने सर्वजण घराबाहेर आले. त्यांना सावरत असतानाच नारळांच्या झाडांकडे लक्ष गेले असता झाडांचा शेंडा पेटतात दिसला. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.




 

Monday, May 6, 2024

आम्ही कामाची माणसं, इतरांसारखे बघू करू म्हणणारे नाहीत : अजित पवार यांचा सुप्रिया सुळेंना टोला नीरा येथे शनिवारी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ भव्य सभा.

 आम्ही कामाची माणसं, इतरांसारखे बघू करू म्हणणारे नाहीत : अजित पवार यांचा सुप्रिया सुळेंना टोला 

नीरा येथे शनिवारी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ भव्य सभा.





नीरा : 


     अजित पवार म्हणजे दिलेला शब्द पाळतो. कुणाला एखाद्याला काम करतो म्हणून तर करतो. मात्र होत नसलं तर बघू करू पाहतो असं म्हणून एखाद्या माणसाचा वेळ खात नाही. आम्ही कामाची माणसं आहोत. म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्या. असा आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 


  बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी शनिवारी ( दि. ०४) नीरा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे माजी मंत्री विजय शिवतरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे यांनी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. अनेक वर्ष काँग्रेस सत्तेत होती. मात्र काँग्रेसला चांगल्या प्रकारे विकास करता आला नाही. पुणे शहरातील अनेक विकास कामे भाजपच्या काळात झाली. तर पालखी महामार्ग देखील भाजपच्या काळात पूर्ण होत आहे. इतक्या वर्षात त्यांना हे जमलं नाही. 


     त्यांना काहीच जमल नाही. म्हणून ते आता संविधान वाचवण्याच्या वल्गना करत आहेत. मात्र संविधानात काँग्रेसच्या काळातच अनेक वेळा बदल करण्यात आलेत. भाजपच्या काळात थोड्याच वेळा बदल करण्यात आले. मात्र आज तेच संविधान वाचवण्याच्या वल्गना करत आहेत. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच संविधान लिहिलं. त्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधात काँग्रेसने दोन वेळा उमेदवार उभे केले आणि त्यांचा पराभव केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा दिवस हा काँग्रेसच्या काळात कधीच साजरा करण्यात आला नाही. मात्र मोदी सत्तेवर आल्यावर त्यांनी संविधान दिन सुरू केला. आज संविधान दिन देशभरात साजरा केला जातो. त्यामुळे मोदी सरकार संविधान बदलणार यावर लोकांनी विश्वास ठेवू नये. अस आवाहन अजित पवार यांनी केलं. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना भरघोस मतांनी निवडून द्या. असं आवाहन त्यांनी केले त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न हे केंद्राच्या माध्यमातून सोडवावे लागणार आहेत आणि त्यामुळे सत्तेत असणारा खासदार आपल्याला हवा आहे. असेही ते यावेळी म्हणाले. प्रत्येक जण आपल्याकडे येईल आणि आपली बाजू मांडेल पण त्याकडे लक्ष न देता सुनेत्रा पवार आणि महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा असा आवाहन अजित पवार यांनी केले. 


       यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार संभाजी कुंजीर, अशोक टेकवडे, जालिंदर कामठे, बाबा जाधवराव, सतिश काकडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम धुमाळ, भाजपचे निलेश जगताप, रासपचे संजय निगडे, आरपीयाचे स्वप्नील कांबळे, निरेच्या सरपंच तेजश्री काकडे, सदस्य राधा माने, गुळूंचे उपसरपंच दिपक निगडे, ॲड. अविनाश भारंबे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, लक्ष्मण चव्हाण रेखा चव्हाण, शरद जगताप,  दिलिप यादव,  इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल रुपणवर यांनी केले. प्रास्ताविक सरपंच तेजश्री काकडे यांनी केले तर, आभार विराज काकडे यांनी मानले.

निरा बाजारपेठेतील रस्त्यावरचा ढिगारा हटवला. ग्रामपंचायतीने दाखवले औदार्य. द न्यूज मराठीचा इंपॅक्ट

 निरा बाजारपेठेतील रस्त्यावरचा ढिगारा हटवला.


ग्रामपंचायतीने दाखवले औदार्य. द न्यूज मराठीचा इंपॅक्ट




पुरंदर : 


गेली तब्बल ५३ तास निरा बाजारपेठेतील बारामती रोडवर डांबर मिश्रीत खडी पडली होती. द न्युज मराठी या बातम्यांच्या पोर्टेलने बातमी लावताच दोन तासांत निराश ग्रामपंचायतीने हा ढिगारा हटवला आहे. त्यामुळे परिसरातील त्रस्त व्यावसायिक व वाहनचालकांनी द न्युज मराठी व निरा ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत.

     शनिवारी सकाळी आठच्या सुमारास डांबर मिश्रीत खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचा फाळका निरेच्या बुवासाहेब चौकात निसटला व डांबर मिश्रीत खडी रस्त्यावर पडत होती. डॉ तळवलकर दवाखान्यासमोर डंपर थांबवून चालकाने गळती रोखली व निघून गेला. तब्बल ५३ तास या ठिकाणी डांबर मिश्रीत खडीचा ढिगारा जैसे थे स्थिती होता. सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीसांना या बाबत कल्पना देऊन ही कोणी हि ढिगारा हटवण्याचे औदार्य दाखवले नाही. द न्यूज मराठी या बातम्यांच्या पोर्टेलने बातमी लावताच निरा ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत. जेसीबीच्या सहायाने डांबरी ढिगारा हटवत,  ट्रॅक्टर मधून वाहून नेला.

    निरा बाजारपेठेतून नेहमीच अशी अवजड वाहनांची वर्दळ असते. उग्र वास असलेली मळी, प्लॅस्टीक पिशवीत भरलेले खत हे दोन ट्रॅली मधून भरुन धोकेदायक पद्धतीने वाहतूक केली जाते. स्पिडब्रेकरवर किंवा हेलका बसल्यावर खताच्या पिशव्या कित्येकवेळा रस्त्यावर पडतात. तर ट्रॅली मध्ये काठोकाठ भरलेली मळी हेंदकळत रस्त्यावर पडत असते. यामुळे उग्र वास पसरतो. तसेच रस्त्यावर पडलेल्या या राडारोड्यावर अपघात घडतात. याबाबत सतर्कता घेणे गरजेचे आहे.

Sunday, May 5, 2024

सावधान निरा बाजारपेठेत रस्त्यावर डांबरी ढिगारा ४८ तास उलटल्यावर ही ढिगारा जैसे थे!

 सावधान निरा बाजारपेठेत रस्त्यावर डांबरी ढिगारा


४८ तास उलटल्यावर ही ढिगारा जैसे थे!






पुरंदर :

      पुरंदर तालुक्यातील निरा येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यावरती डांबर मिश्रीत खडीचा ढिगारा असल्याकारणाने वाहन चालकांना धोका निर्माण झाला आहे. आता तब्बल ४८ तास उलटून ही हा ढिगारा कोणीही हटवत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रस्त्याच्या एका बाजूच्या मध्यावरच हा उंच ढिगारा अचानक दाबल्यावर वाहनचालकांना
मोठी कसरत करावी लागत आहे.


      शनिवारी (दि.०४) सकाळी आठच्या सुमारास बारामती बाजूने डांबराची खडी वाहून नेणारा एक डंपर वेगात जात असताना, निरेतील बुवासाहेब चौकात त्या डंपरचा फाळका निसटला त्यामुळे रस्त्यावर खडी पसरत तो पुढे चालला होता. बाजारपेठेतील व्यवसायिकांनी त्याला हटकल्यावरती तो डॉ. तळवळकर हॉस्पिटल समोर थांबला त्यादरम्यान त्या डंपरमधून मोठ्या प्रमाणावर डांबर मिश्रित खडी पडत होती. कसोशीच्या प्रयत्न करत चालकाने ती खडी पडण्यापासून रोखले व आपले वाहन पुढे घेऊन गेला. मात्र आज सोमवारी तब्बल ४८ तासानंतरही तो खडीचा ढिगारा तशाच अवस्थेत मुख्य बाजारपेठेत असल्याने वाहन चालकांची मोठी तारांबळ होत आहे.

        याठिकाणी एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभाग हा ढीगारा हटवणार आहे का ? असा प्रश्न बाजारपेठेतील व्यापारी विचारू लागले आहेत. याबाबत शनिवारीच सामाजिक कार्यकर्त्यांनी बारामतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत कल्पना देऊनही आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रचार दौरा असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक हा खडीमिश्रित ढिगारा न काढण्याचे ठरवले असल्याचे समोर येत आहे. याबाबत नीरा पोलीस दूरक्षेत्रात ही सामाजिक कार्यकर्त्यांनी कल्पना देऊन ही दोन दिवसात व आज सकाळ पर्यंत मात्र हा ढिगारा उचलल्याचे कोणीही औदार्य दाखवत नसल्याने सामान्य नागरिक प्रश्न विचारू लागले आहेत की हा ढिगारा आता कोण उचलणार का ही एक कायमस्वरूपी खुश राहणार 'रस्त्वरच्या डांबरी ढिगाऱ्यापूढे आमचे दुकान आहे' 

Wednesday, May 1, 2024

लोकांच्या प्रश्नांची सोडवणुक करणं ही जबाबदारी; जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणार : सुनेत्रा पवार

 लोकांच्या प्रश्नांची सोडवणुक करणं ही जबाबदारी; जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणार : सुनेत्रा पवार 





पुणे : 

माझ्या सामाजिक कार्याची सुरुवातच मी काटेवाडी गावातून केली आहे. त्यामुळे मला गावापासून शहरापर्यंतच्या प्रश्नांची जाण आहे. या प्रश्नांची सोडवणुक करणं ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवूनच मी काम करत राहीन अशी ग्वाही बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दिली. 

सुनेत्रा पवार यांनी आज पुरंदर-हवेली मतदारसंघातील वडकी, देवाची उरुळी, हांडेवाडी, होळकरवाडी, अवताडेवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी आदी भागांचा दौरा केला. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, जालिंदर कामठे, मोनिका हरगुडे, गणेश ढोरे, संदिप हरपळे, स्नेहल दगडे, स्वाती ठोंबरे, प्रशांत मोडक, प्रशांत भाडळे, आकाश बहुले, राहुल चोरघडे, प्रजित हरपळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणुक व्हावी हा अजितदादांचा आग्रह असतो. त्यांच्या कामाचा आवाका आणि पद्धत ही संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे. त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास हाच मुद्दा घेवून मी ही निवडणुक लढवत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्नांची सोडवणुक करण्यावर आपला भर असेल असेही सुनेत्रा पवार यांनी यावेळी नमूद केले. 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीची वज्रमूठ घट झाल्याचं आपण पाहतो. ही एकजूट कायम ठेवून सर्वांनी आपल्या भागातून घड्याळाला अधिकाधिक मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या उज्वल भवितव्यासाठी घड्याळाला अधिकाधिक मतदान करुन आपल्या हक्काच्या व्यक्तीला खासदार म्हणून तुम्ही संसदेत पाठवाल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी आजच्या दौऱ्यादरम्यान, नागरीकांच्या भेटी घेवून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी नागरीकांच्या अडचणी समजून घेवून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...