निरा शिवतक्रावाडीत दोन नारळांच्या झाडावर वीज पडली. दोन झाडं एकाच वेळी पेटली : नंतर जोरदार पाऊस

 निरा शिवतक्रावाडीत दोन नारळांच्या झाडावर वीज पडली.


दोन झाडं एकाच वेळी पेटली : नंतर जोरदार पाऊस


निरा :
 
    मागील आठवड्यात शनिवारी व गुरवारी वादळीवाऱ्यासह जोराचा पाऊस नीरा परिसरातील गावखेड्यात झाला होता. नीरा शहरात फक्त वादळी वारा असायचा, पाऊस पडला नव्हता. आज सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोराचा वारा सुटला. सर्वत्र धुराळा उडवत होतो. सहा वाजता वीजांचा गडगडाट सुरू झाला. दरम्यान एक वीज जोरदार कडाडली व स्थानिकांच्या काळजाचा ठोका चुकला. ती वीज निरा शिवतक्रारवाडी रोडवरील निरेचे माजी उपसरपंच कल्याण जेधे यांच्या घरासमोरील दोन नारळांच्या झाडावर एकाचवेळी पडली होती. त्यामुळे झाडं पेटली होती.

      सोमवारी सायंकाळी निरा शहरातील लोक वस्तीतील घरासमोरच्या दोन नारळांच्या झाडांवर वीज पडली. वीज पडताना झालेल्या प्रचंड आवाजाने मंगल कल्याण जेधे या अंगणात धडपडून पडल्याने किरकोळ जखमी झाल्या. वीज पडल्यानंतर तात्काळ पावसाने जोर धरल्याने दहा ते पंधरा मिनिटात झाडावरील आग विझली.

     सायंकाळी वादळीवाऱ्यासह वीजांचा गडगडाट सुरु झाला म्हणून मंगल जेधे झाडाखालील वस्तू प्लॅस्टीकने झाकत होत्या. याच दरम्यान जोरदार आवाज झाला व वीज झाडावर पडली. या  आवाजाने व वीजेच्या धक्क्याने मंगल जेधे गरबडून धडपडल्या व अंगणात पाठिवर पडल्या. त्या प्रचंड घाबरल्या होत्या. घरातील सदस्यांना मंगलताईंचा आवाज आल्याने सर्वजण घराबाहेर आले. त्यांना सावरत असतानाच नारळांच्या झाडांकडे लक्ष गेले असता झाडांचा शेंडा पेटतात दिसला. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.




 

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.