Tuesday, May 28, 2024
पिंपरीत प्रेम प्रकरणांतून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी : पुण्यात पार्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणाने चार चाकी गाडीने तरुण आणि तरुणीला उडवले असल्याची घटना समोर आली आहे. चारचाकी चालक हा पिलेला होता. त्या नशेत त्याने दुचाकीवरील दोघांना मारहाण देखील केली आहे.
या घटनेत दुचाकीवरील निलेश शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी सुशील भास्कर काळे या चारचाकी चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी मध्यरात्री १ वाजता ही घटना पिंपरीतील टेल्को रोड घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश शिंदे आणि सुशील काळे या दोघांची एकच गर्लफ्रेंड आहे. या तरुणीचे सध्या सुशील सोबत प्रेमसंबंध असून निलेश पासून ती वेगळी आहे. मात्र ही गोष्ट निलेश याला समजल्याने तो मला मानसिक त्रास देत असल्याचे प्रियेसीचे म्हणणे आहे. मंगलावारी रतरी एक्स बॉयफ्रेंड निलेश हा आपल्या प्रियेसिला भेटण्यासाठी आला होता. ही माहिती सुशील याला दिली. जेव्हा निलेश हा प्रिसेसिसोबत बोलत होता. त्यावेळी सुशील याने चारचाकी निलेश याच्या अंगावर घातली. यात निलेश गंभीर जखमी झाला.
या घटनेने पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात पार्से कारचे.प्रकरण ताजे असताना ही घटना घडल्याने पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले असल्याचे पहायला मिळत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व
बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...
-
पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता? पुरंदर : नीरा बारामती रोड...
-
राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा.. पुरंदर : राख, कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. शनिवारी रात्री...
-
धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद. पुरंदर : नीरा येथील ...

No comments:
Post a Comment