राजगड तालुक्यात तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न...! मुंबईतील गुंडाकडून दहशतीचा प्रयत्न, कोंढावळे खुर्द येथील घटना

पुणे : राजगड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढावळे खुर्द येथे जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याने एका २१ वर्षीय तरुणीला जेसीबीच्या सहाय्याने
शेतात गाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रणाली बबन खोपडे ( वय.२१) असे त्या तरुणीचे नाव असून त्या तरुणीची आई कमल बबन खोपडे यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात कोणाविरुद्ध देखील गुन्हा दाखल नसल्याचे वेल्हे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार कमल बबन खोपडे आणि त्यांच्या दोन मुली या मी त्यांच्या शेतात असलेल्या गट नंबर ११४ मध्ये काम करत होत्या. यावेळी या ठिकाणी संभाजी खोपडे याने येऊन पंधरा ते सोळा गुंड सहीत जेसीबी व ट्रॅक्टर आणून ही जमीन माझ्या नावावर झाली असून तुम्ही या जमिनीत थांबू नका असे म्हणाला. त्यावेळी माझी मुलगी प्रणाली ही विरोध करत असताना तिला जेसीबीने ढकलून देत तिच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य ओळखून कमल खोपडे यांनी वेळीच हस्तक्षेप करीत दुसरी मुलगी प्राजक्ताच्या साह्याने तिच्या अंगावरील माती बाजूला काढून तिला वाचवले. या प्रकरणी प्रणाली व तिची आई कमल यांनी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तक्रारी अर्ज घेतला असून अद्यापही कोणावर गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती वेल्हे पोलिसांकडून मिळाली. याबाबत वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ म्हणाले, या प्रकरणी दोन्ही बाजू करून तक्रारी अर्ज दाखल झाले असून योग्य तो तपास करून चौकशी अंती गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.