आम्ही कामाची माणसं, इतरांसारखे बघू करू म्हणणारे नाहीत : अजित पवार यांचा सुप्रिया सुळेंना टोला
नीरा येथे शनिवारी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ भव्य सभा.
नीरा :
अजित पवार म्हणजे दिलेला शब्द पाळतो. कुणाला एखाद्याला काम करतो म्हणून तर करतो. मात्र होत नसलं तर बघू करू पाहतो असं म्हणून एखाद्या माणसाचा वेळ खात नाही. आम्ही कामाची माणसं आहोत. म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्या. असा आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी शनिवारी ( दि. ०४) नीरा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे माजी मंत्री विजय शिवतरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे यांनी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. अनेक वर्ष काँग्रेस सत्तेत होती. मात्र काँग्रेसला चांगल्या प्रकारे विकास करता आला नाही. पुणे शहरातील अनेक विकास कामे भाजपच्या काळात झाली. तर पालखी महामार्ग देखील भाजपच्या काळात पूर्ण होत आहे. इतक्या वर्षात त्यांना हे जमलं नाही.
त्यांना काहीच जमल नाही. म्हणून ते आता संविधान वाचवण्याच्या वल्गना करत आहेत. मात्र संविधानात काँग्रेसच्या काळातच अनेक वेळा बदल करण्यात आलेत. भाजपच्या काळात थोड्याच वेळा बदल करण्यात आले. मात्र आज तेच संविधान वाचवण्याच्या वल्गना करत आहेत. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच संविधान लिहिलं. त्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधात काँग्रेसने दोन वेळा उमेदवार उभे केले आणि त्यांचा पराभव केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा दिवस हा काँग्रेसच्या काळात कधीच साजरा करण्यात आला नाही. मात्र मोदी सत्तेवर आल्यावर त्यांनी संविधान दिन सुरू केला. आज संविधान दिन देशभरात साजरा केला जातो. त्यामुळे मोदी सरकार संविधान बदलणार यावर लोकांनी विश्वास ठेवू नये. अस आवाहन अजित पवार यांनी केलं. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना भरघोस मतांनी निवडून द्या. असं आवाहन त्यांनी केले त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न हे केंद्राच्या माध्यमातून सोडवावे लागणार आहेत आणि त्यामुळे सत्तेत असणारा खासदार आपल्याला हवा आहे. असेही ते यावेळी म्हणाले. प्रत्येक जण आपल्याकडे येईल आणि आपली बाजू मांडेल पण त्याकडे लक्ष न देता सुनेत्रा पवार आणि महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा असा आवाहन अजित पवार यांनी केले.
यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार संभाजी कुंजीर, अशोक टेकवडे, जालिंदर कामठे, बाबा जाधवराव, सतिश काकडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम धुमाळ, भाजपचे निलेश जगताप, रासपचे संजय निगडे, आरपीयाचे स्वप्नील कांबळे, निरेच्या सरपंच तेजश्री काकडे, सदस्य राधा माने, गुळूंचे उपसरपंच दिपक निगडे, ॲड. अविनाश भारंबे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, लक्ष्मण चव्हाण रेखा चव्हाण, शरद जगताप, दिलिप यादव, इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल रुपणवर यांनी केले. प्रास्ताविक सरपंच तेजश्री काकडे यांनी केले तर, आभार विराज काकडे यांनी मानले.