Tuesday, May 28, 2024

नारायणगाव कालव्याच्या कडेला आढळल्या रक्त तपासणीच्या सँपल ट्यूब, जुन्नर तालुक्यात खळबळ

नारायणगाव, पुणे : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्त तापसनीचे हजारो सँपल ट्यूब कालव्याच्या कडेला फेकल्याचा प्रकार समोर आला आहे.या घटनेनं जुन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नारायणगावमधील पुणे - नाशिक महामार्गलगत असणाऱ्या कालव्या लगत रक्त तपासणीचे हजारो सॅम्पल ट्यूब टाकण्यात आल्या आहेत. पाण्याच्या कालव्यालगत सापडलेल्या ब्लड सॅम्प्ल्सच्या ट्यूबमध्ये असलेलं रक्त पाण्यात जाऊन इतरांना त्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. हा कालवा अनेक गावांना जोडतो, त्यामुळे हे दूषित झालेलं पाणी जर कोणी प्यायला, तर त्यामुळे विविध आजार उद्भवण्याचीही शक्यता आहे. त्यामळे या रक्ताच्या ट्यूब, अशा बेजबाबदारपणे कोणी टाकल्यात, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. अशा ट्यूब अनधिकृतपणे कुणी टाकल्या, त्याचा तपास प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र अशा घटनांमुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

No comments:

Post a Comment

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...