पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुरंदर तालुक्यातील ३० गावातील पोलीस पाटील आरक्षण सोडत जाहीर

इमेज
 पुरंदर तालुक्यातील ३० गावातील पोलीस पाटील आरक्षण सोडत जाहीर नीरा दि 30   पुरंदर तालुक्यातील 30 गावातील पोलीस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत आज 30 जून रोजी संपन्न झाली पुरंदर-दौंडचे उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हो सोडत पारपडली.   पुरंदर तालुक्यातील आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे चिव्हेवाडी अनुसूचित जमाती, देवडी (अनुसूचित जमाती महिला,), सुपे खुर्द (अनुसूचित जमाती,) देवकरवाडी (अनुसूचित जमाती), काळदरी (अनुसूचित जमाती), राख (विशेष मागास प्रवर्ग), वीर (विशेष मागास प्रवर्ग महिला), तक्रारवाडी (भटक्या जमाती), लपतळवाडी (भटक्या जमाती महिला), तोंडल (भटक्या जमाती महिला), सुकलवाडी (भटक्या जमाती) पिंपळे (भटक्या जाती) आडाचीवाडी (भटक्या जाती) नवलेवाडी (इतर मागास वर्ग) बेलसर (इतर मागासवर्ग महिला), जवळ अजून (इतर मागासवर्गीय), कोळविहिरे( इतर मागासवर्गीय महिला) थोपटेवाडी (इतर मागासवर्गीय) तर वागदरवाडी, सटलवाडी, सोमुर्डी, हरगुडे, आंबोडी,हरणी, नारायणपूर, हिवरे, राजेवाडी, मांडकी, पोंडे या गावातील पोलीस पाटीलपद राखीव असणार आहे.. अशाप्रकारे आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली याबाबतची माहि...

लोणंद येथील बावकालवाडी येथे दीड लाखाच्या दागिन्यांची चोरी

इमेज
लोणंद येथील बावकालवाडी येथे दीड लाखाच्या दागिन्यांची चोरी   लोणंद, २७ लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावकलवाडी ता. खंडाळा गावच्या हद्दीतील शेंडगेवस्ती येथील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीच्या दागिन्यांसह सुमारे दिड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली असून याप्रकरणी लोणंद पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणंद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बावकलवाडी ता खंडाळा गावच्या हद्दीतील शेंडगेवस्ती येथील महादेव पांडुरंग शेंडगे यांच्या घराचे कुलूप दि. २६ रोजी भरदिवसा अनोळखी तीन चोरट्यांनी तोडून घरातील बेचाळीस हजारांच्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने मिळून सुमारे एक लाख पंचेचाळीस हजारांची चोरी केल्याची फिर्याद महादेव शेंडगे यांनी लोणंद पोलिसात दिली आहे. भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालसिम व लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांनी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत.

निळुंजच्या सरपंचपदी अश्विनी बनकर यांची निवड

इमेज
  निळुंजच्या सरपंचपदी अश्विनी बनकर यांची निवड     खळद ता. २६ : निळुंज (ता.पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस , कॉंग्रेस पक्षाच्या अश्विनी उमेश बनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . सोमवारी झालेल्या निवड नुकीत अश्विनी उमेश बनकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुंभारवळण विभागाचे मंडल अधिकारी दुर्गादास शिळकंदे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक सुरेश जगताप व तलाठीन नीलम   कांबळे यांनी त्यांना या कामी सहकार्य केले.                निळुंजच्या माजी सरपंच रूपाली जगताप यांनी आपला निर्धारित कालावधी पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवरती ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश होले , माजी सरपंच रूपाली जगताप , उपसरपंच उमेश बनकर , ग्रामपंचायत सदस्य रूपाली बनकर , उज्वला बनकर , समिर बनकर उपस्थित होते.    ...

पुरंदर तालुक्यातील ३० गावात होणार पोलीस पाटील भरती आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

इमेज
 पुरंदर तालुक्यातील ३० गावात होणार पोलीस पाटील भरती   शुक्रवारी होणार आरक्षण सोडत  नीरा दि 23   पुरंदर तालुक्यातील 30 गावातील पोलीस पाटील भरतीसाठी 30 जून रोजी आरक्षण सोडत होणार आहे.या बाबतचे आदेश पुरंदर-दौंडचे उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.याबाबतची माहिती प्रत्येक गावात देण्याबाबतच्या सूचना तलाठ्यांना देण्यात आल्या आहेत. सबंधित गावातील इच्छुक लोकांनी यावेळी उपस्थित राहण्या बाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पुरंदर मधील तीस गावांना लवकरच पोलीस पाटील मिळणार आहेत.गावातील कायदा व सुव्यवस्था पाहण्याचे काम पोलीस पाटील करत असतात. नारायणपूर,काळदरी, सोमुर्डी,हिवरे,तोंडल,सुपे खुर्द हरणी,सोनोरी,आंबोडी,हरगुडे,तक्रारवाडी, कोळविहरे वाल्हे,बेलसर,देवडी,चिव्हेवाडी,थोपटेवाडी,मांडकी, पोंढे,वीर सटलवाडी,नवलेवाडी,लपतळवाडी,वागदरवाडी,आडाचीवाडी,सुकलवाडी जवळार्जुन,राजेवाडी,राख,पिंपळे या गावातील पोलीस पाटील भरती साठी ही सोडत होणार  आहे.

१६ वर्षांची मुलगी सेक्सचा निर्णय घेण्यासाठी सक्षम'; हायकोर्टाने बॉयफ्रेंडवरील पॉक्सोचा गुन्हा केला रद्द!

इमेज
 १६ वर्षांची मुलगी सेक्सचा निर्णय घेण्यासाठी सक्षम'; हायकोर्टाने बॉयफ्रेंडवरील पॉक्सोचा गुन्हा केला रद्द! नवी दिल्ली प्रतिनिधी .२४ मेघालय उच्च न्यायालयाने एका पॉक्सो प्रकरणात महत्त्वाचं मत मांडलं आहे. सेक्सच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी १६ वर्षांची मुलगी सक्षम असते, असं मत मेघालय हायकोर्टाने मांडलं आहे. यासोबतच कोर्टाने पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेली FIR रद्द करण्याचे आदेशही दिले आहेत. लाईव्ह लॉने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीवर १६ वर्षांच्या मुलीशी संबंध ठेवल्यामुळे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हे संबंध सहमतीने झाले असल्याचा दावा तरुणाने केला होता. दोघांचे प्रेम असल्याचा दावा या तरुणाने आपले संबंध सहमतीने झाल्याचे म्हटले होते. तसंच, या मुलीनेही कोर्टात दिलेल्या आपल्या जवाबात दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध असल्याचं कबूल केलं होतं. त्यामुळे शारीरिक संबंधांवेळी कोणतीही जबरदस्ती केली गेली नव्हती. त्यामुळे, याकडे बलात्कार म्हणून पाहू नये अशी मागणी...

बेपत्ता पाणबुडी अखेर सापडली: पर्यटक मात्र गमावले

इमेज
 बेपत्ता पाणबुडी अखेर सापडली: पर्यटक मात्र गमावले  पुणे दि.२३ रविवारी टायटॅनिक च्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा "भयंकर स्फोट " झाला, ज्यात जहाजावरील सर्वांचा मृत्यू झाला असे यूएस कोस्ट गार्ड रिअर ऍडमी. जॉन मॅगर यांनी गुरुवारी सांगितले. ओशियन गेट या पर्यटन कंपनीच्या एका छोट्या पाणबुडीमधून पाच अब्जाधीश टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेले होते. रविवारी टायटन या सबमरीन मधून हे अटलांटिक महासागराच्या तळाशी जात होते. मात्र, काही तांत्रिक बिघाडामुळे या पाणबुडीचा आणि त्यासह त्यातील सर्वांचा संपर्क तुटला. यानंतर बेपत्ता झालेल्या या सर्वांचा शोध सुरू करण्यात आला होता. दुर्दैवाने आज ओशियन गेटने या पाणबुडी मधले सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत असे आपल्या अधिकृत स्टेटमेंट मध्ये जाहीर केले आहे. बेपत्ता पाणबुडीत कोण होते? बेपत्ता झालेल्या पाणबुडीत ब्रिटनचे अब्जाधीश उद्योगपती हामिश हार्डिंग (वय ५८) यांच्यासह पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपती शहजादा दाऊद (वय ४८) आणि त्यांचा मुलगा सुलेमान (वय १९) हे देखील होते. या तीन पर्यटकांशिवाय एक पायलट आणि एक कंटेंट एक्सपर्ट असे एकूण पाच लोक ...

पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे दोघांच्या पोटात खुपसला चाकू

इमेज
 पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे दोघांच्या पोटात खुपसला चाकू  सासवड दि.२२     पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे जुन्या भांडणाच्या रागातून दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.यामध्ये दोघा भावांच्या पोटामध्ये चाकू खुपसून त्यांना गंभीर जखमी केल असून जेजुरी पोलिसात या संदर्भात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद विशाल अनंत कड यांनी जेजुरी पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी जालिंदर चौंडकर यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी आणि त्यांचा चुलत भाऊ संतोष कड यांना जीवे मारण्याचे उद्देशाने त्यांच्या पोटामध्ये प्रत्येकी दोन वेळा चाकू खुपसून गंभीर जखमी केले.  याबाबतची फिर्याद त्यांनी जेजुरी पोलिसात दिली असून या संदर्भात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 307, 323 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला   याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 26 /6 /2023 रोजी सायंकाळी पाच वाजलेच्या सुमारास फिर्यादी आणि गावातील वायरमन बाबुराव आवळे, मधुकर राजारा कड असे तिघे गावातील शिवशंभू...

दर्शना पवार हत्याकांडातील संशयित आरोपी राहुल हांडोरे पोलिसांच्या ताब्यात

इमेज
  दर्शना पवार हत्याकांडातील संशयित आरोपी राहुल हांडोरे पोलिसांच्या ताब्यात  पुणे  दर्शना पवार हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.. आरोपी राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली आहे. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली. दर्शनाशी विवाह करण्याची इच्छा राहुलची होती. एमपीसी उत्तीर्ण झाल्यानंतर घरच्यांनी दर्शनाचा दुसऱ्या एका मुलासोबत विवाह ठरवला होता. त्यानंतर 'मला वेळ द्या 'अशी विनंती राहुलने तिच्या घरच्यांना केली होती. पण घरच्यांनी नकार दिला. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्या अंगावर जखमा आढळल्यानं तिचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं. राहुल हांडोरे नेमका कुठं होता? वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्...

दर्शना पवार प्रकरणाला धक्कादायक वळण...! डोक्यात आणि शरीरावर जखमी झाल्याने मृत्यू

इमेज
पुणे : वेल्हे तालुक्यातील राजगड परिसरात एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेली तरुणी दर्शना पवार हीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहेत. संबधित तरुणीच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर येतं आहे. त्यामुळे पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  १२ जूनला दर्शना आणि तिचा मित्र राहुल हे ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर आले होते. मात्र तिचा मित्र राहुल हा देखील गायब असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तपासात सीसीटिव्ही बाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलिसांचा मित्रावर संशय अधिक बळावला आहे. मात्र राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला असून दर्शना ही अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रेकिंग गेलेला मित्र घटनेनंतर फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. राहुल हाच मुख्य आरोपी आहे की आणखी त्या तरुणीला कुणी ...

नीरा परिसरात वारीच्या वाटेवर झाडे लावणार : राजेश काकडे

इमेज
 नीरा परिसरात  वारीच्या वाटेवर झाडे लावणार : राजेश काकडे    दत्तघटावर करण्यात आले पिंपळ वृक्षाचे बीजारोपण   नीरा  दि. १९     संत ज्ञानेश्वर माऊलींना ज्या दत्तघाटावर स्नान घातला जाते त्या दत्तघाटावर आज सोमवारी निरा ग्रामपंचायत व गायत्री परिवाराच्यावतीने सुवर्ण पिंपळ वृक्षाचे म्हणजेच आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळी असलेल्या पिंपळ वृक्षाच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले.नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे,सदस्य राधा माने,वैशाली काळे यांच्या हस्ते या वृक्षाच्या बियांचे रोपंनकरण्यात आले.   संतांचा पालखी सोहळा आता पंढरीकडे मार्गस्थ होतो आहे. मात्र या संतांच्या वाटेवर वारकऱ्यांना उष्णतेचा सामना करावा लागतो आहे. पाऊस लांबल्याने उष्णता वाढली असली तरी रस्त्यावर झाडे नसल्याने वारकऱ्यांना सावली मिळत नाही.  या वारीच्या वाटेवर झालेल्या वृक्षतोडीमुळे वारकऱ्यांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे .या वारीच्या वाटेवर वृक्ष लागवडीचे आवाहन  सोपानकाका पालखी सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण गोसावी यांनी केलं होत. यानंतर आता नीरा ग्रामपंचायत आणि गाय...

मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २३ जून रोजी मुंबईत

इमेज
  मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार  वितरण सोहळा २३ जून रोजी मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा होणार गौरव मुंबई ( प्रतिनिधी ) : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण २३ जून २०२३ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या हस्ते दु.०३ वाजता होत आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.. अशी माहिती परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे..  ८५ वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.२०२२ च्या पुरस्कारांचे वितरण २३ जून रोजी मुंबईत नितीन गडकरी यांच्या हस्ते केले जाणार आहे.. यावर्षी बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना दिला जाणार आहे.२५ हजार रुपये रोख मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.यापुर्वी हा पुरस्कार दि...

माऊली माऊली' नामाच्या जयघोषत नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान

इमेज
 'माऊली माऊली' नामाच्या जयघोषत नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान  माऊलींच्या सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप  नीरा : (राहुल शिंदे )  नीरा भिवरा पडता दृष्टी !  स्नान करिता शुद्ध सृष्टी!  अंती तो वैकुंठप्राप्ती !  ऐसे परमेष्ठी बोलिला !!        माऊली माऊली' नामाचा जयघोष करीत, टाळ-म्रुदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज रविवारी माऊलींच्या पादुकांना शाहीस्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन, माऊलींचा पालखी सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला.             पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हानगरीचा निरोप घेऊन सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. सकाळी आठ वाजता न्याहरीसाठी पिंपरे (खुर्द)...

दुचाकीची चावी काढून घेण्याचा पोलिसांना अधिकार नाही! वाहतूक पोलिसांना सत्र न्यायालयाचा झटका

इमेज
 दुचाकीची चावी काढून घेण्याचा पोलिसांना अधिकार नाही! वाहतूक पोलिसांना सत्र न्यायालयाचा झटका मुंबई दि.१८ वाहतुकीचे नियम मोडून शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या तरुणाला मुंबई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. याच वेळी पोलिसांच्या कार्यपद्धतीतील त्रुटींवर बोट ठेवत न्यायालयाने वाहतूक पोलिसांना मोठा झटका दिला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीची चावी काढून घेण्याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नाही. तसेच दुचाकीचालकाने ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यानंतर दंडवसुलीसाठी त्याला पोलीस ठाण्यात येण्याची सक्ती करू शकत नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, कुलाबा परिसरातील एन.एस. रोडवरील सिग्नलवर सागर पाठक हा तरुण विनाहेल्मेट दुचाकी चालवत होता. वाहतूक पोलीस जवळ येत असल्याचे पाहून त्याने लगेच हेल्मेट घातले होते. या वेळी वाहतूक नियम मोडल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दंडवसुलीची कारवाई सुरू केली, तेव्हा सागरने कर्तव्यावर असलेल्या कॉन्स्टेबलवर हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणी कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून सागरविरुद्ध भादंवि कलम 332 आणि...

पोलीस पाटलांच्या मागण्यांवर लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ : गिरीश महाजन यांचे आश्वासन

इमेज
  पोलीस पाटलांच्या मागण्यांवर लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ : गिरीश महाजन यांचे आश्वासन  पुणे दि.१४   राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागणी संदर्भात येणाऱ्या कॅबिनेटमध्ये लवकरच निर्णय घेऊ असा आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिनांक 13 जून रोजी पोलीस पाटलांच्या शिष्टमंडळाला दिले आहे याबाबतची माहिती पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी दिली       राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यासंदर्भात पोलीस पाटलांनी आंदोलन केलं होतं. यावेळी सरकारने या मागण्यांवर लवकरच निर्णय घेऊ असा आश्वासन दिले होते. मात्र यानंतरही पोलीस पाटलांच्या मागण्या अद्यापही मंजूर झाल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथी गृहावर दिनांक 13 जून रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. यामध्ये राज्यातील पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन राज्यातील पोलीस पाटलांना मानधन व...

डिजिटल माध्यमंही आता सरकारच्या रडारवर

इमेज
 डिजिटल माध्यमंही आता सरकारच्या रडारवर नवी माध्यम व्यवस्था सरकारसाठी डोकेदुख ; मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन मुंबई- स्वतंत्र बाण्यानं काम करणारी डिजिटल माध्यमं आता सरकारच्या रडावर असून देशात मोठ्या संख्येनं असलेली युट्यूब चॅनल्स सरकारच्या विरोधात खंबीरपणे भूमिका घेत असल्याने ही नवी माध्यम व्यवस्था सरकारसाठी डोकेदुखी ठरतेय. असे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे. एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, भांडवलदारी माध्यम व्यवस्थेला टक्कर देत देशात अनेक युट्यूब चॅनल्स आणि वेबसाईट्स उत्तम पत्रकारिता करीत आहेत.. देशातील अनेक बडे पत्रकार, संपादक नव्या डिजिटल व्यवस्थेशी जोडले गेलेले आहेत.. सरकारचं दडपण झुगारत, स्वतंत्र बाण्यानं काम करणारी ही डिजिटल माध्यमं आता सरकारच्या रडारवर आहेत.. आयटी कायद्याचं कलम 69 A चं उल्लंघन केल्याचं कारण देत सरकारनं गेल्या दोन वर्षात तब्बल 150 युट्यूब चॅनल्स बंद केली आहेत.. या चॅनेल्सवरून देशविरोधी मजकूर प्रसारित होत होता असं सरकार म्हणतंय.. युट्यूब पत्रकारांना हा आरोप मान्य नाही.. सरकार विरोधी बातम्या दि...

जेजुरी नजीक एसटी आणि पिकअप टेम्पोचा अपघात वारकरी जखमी

इमेज
 जेजुरी नजीक एसटी आणि पिकअप टेम्पोचा अपघात  वारकरी जखमी      जेजुरी दि.१० पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर मार्गावर जेजुरी नजीक भोरवाडीफाटा येथे एसटी बस आणि पिकप टेम्पो यांचा भीषण अपघात झालाय. पंढरपूरहून पुण्याकडे निघालेली एसटी बस आणि पुणे बाजूकडून वाल्हेकडे  निघालेल्या पिकअप  टेम्पो यांची समोरा समोर जोरदार धडक झाली..         यामध्ये एसटीतील 15 ते 16 जण जखमी झाले आहेत. यातील  एका प्रवाशांच्या पायाचे हाड मोडले असून एकाच्या  डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे... अपघातानंतर जेजुरी पोलीस आणि स्थानिकांनी मदत करून जखमींना बाहेर काढलय.. याठिकाणी अरुंद रस्ता असल्याने दोन्ही वाहने समोरा समोर एकमेकांना धडकलीत...  यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून. 15 ते 16 लोक जखमी झाले आहेत.

नीरा पोलिसांना चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस

इमेज
 नीरा पोलिसांना चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस पत्रकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; कार्यवाहीकडे जिल्ह्याचे लक्ष नीरा ता.   नीरा (ता.पुरंदर) येथील भरत निगडे व राहुल शिंदे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, सीसीटीव्हीसाठी नागरिकांकडून अनधिकृत वर्गणी वसूल करणे तसेच खंडणी म्हणून एक लाख रुपये मागितल्याच्या तक्रारीवर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांनी नीरा दुरक्षेत्रातील पोलिसांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तशी नोटीस पोलिसांना बजावण्यात आली आहे.     भरत निगडे व राहुल शिंदे हे माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांनी पोलिसांच्या विरोधात वार्तांकन केले होते. याचा राग मनात धरून पोलिसांनी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची धमकी दिली. त्यांना एक लक्ष रुपयांची खंडणी मागितली. खंडणी देण्यास नकार दिल्यावर त्यांनी अर्जदाराच्या तक्रारीनंतर दीड महिन्यांनी अट्रोसिटीची केस नोंद केली. सीसीटीव्ही बसविण्याचे गावातील लोकांना अमिश दाखवत लाखो रुपये अनधिकृतपणे गोळा केले. पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी पोलिसांना पाठीशी घातल्याची तक्रार भरत निगडे यांनी करत फौजदा...

पांगारे येथे शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

इमेज
 पांगारे येथे शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या सासवड दि.३ पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला असून यासंदर्भात सासवड पोलीससात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.       याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यातील पांगारे येथील किरण सिताराम शेलार यांनी यासंदर्भातील फिर्याद सासवड पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत संतोष संपत शेलार वय ४८ वर्षे राहणार पांगारे शेलारवस्ती हे जून रोजी दुपारी १ वा. चे सुमारास बालदरा डोंगराकडे गेला असून ताे अजुन आला नाही. अशी माहिती त्यांना त्यांच्या भावकितील हरीष महादेव शेलार यांनी दिली होती.रात्रीही ते घरी आले नाहीत.त्यामुळे दिनांक ३/६/२०२३ रोजी पहाटे त्याचा बासदरा डोंंंगराकडेे शोध घेतला आसता पांगारे गावचे हाद्दीत बालदरा डोंगरात जमीन गट नं. ९१८ मध्ये मयत स्थीतीत मिळुन आले आहे. त्याचे तोंडाचा वास येत होता. अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.पोलिसांनी मृत देह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याने विषारी औषध पि...