Type Here to Get Search Results !

2 वर्षाच्या मुलीची मिठीत घेऊन हत्या, मृतदेहासह पित्याने तलावात घेतली उडी; कारण वाचून पाणावतील डोळे

 


बंगळुरू, 28 नोव्हेंबर : एका टेक्नीशियनने आपल्या 2 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नव्हे तर मुलीचा जीव घेतल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र त्यात तो बचावला.

मुलीला खायला घालण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचे कारण त्याने पोलिसांना सांगितले. ही घटना 15 नोव्हेंबरची आहे. कोलार येथील केनदट्टी गावातील तलावात 16 नोव्हेंबर रोजी मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या तलावाच्या काठावर निळ्या रंगाची कारही पोलिसांना सापडली आहे.

हे पाहून गावातील लोकांनी कोलार पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वडिलांचा शोध सुरू केला, त्यानंतर आरोपी वडिलांना 16 नोव्हेंबर रोजी बंगळुरू रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला. 15 नोव्हेंबरपासून आरोपी गायब - राहुल परमार असे 45 वर्षीय आरोपीचे नाव आहे.

तो मूळचा गुजरातचा असून दोन वर्षांपूर्वी पत्नी भव्यासोबत बंगळुरूला गेला होता. 15 नोव्हेंबरपासून तो आपल्या मुलीसह बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मुलीला शाळेत नेण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडल्याचे राहुलने पोलिसांना सांगितले. त्याला आत्महत्या करायची होती.

पण मुलीसमोर असल्याने तो निर्णय घेऊ शकला नाही. तो दिवसभर बंगळुरू आणि कोलारमध्ये फिरला. संध्याकाळी तलावाजवळ गाडी थांबवून तो बराच वेळ काय करायचा विचार करत राहिला. तलावाजवळील दुकानातून मुलीसाठी चॉकलेट आणि बिस्किटे खरेदी केली.

पण मुलीला दुपारपासून भूक लागली होती म्हणून ती रडतच राहिली. मुलीला दुसरे काही खायला घालण्यासाठी राहुलकडे पैसे नव्हते. त्यामुळेच त्याने मुलीसह स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. 

आधी तो बराच वेळ मुलीसोबत गेम खेळत राहिला.

मग बराच वेळ त्याने तिला मिठीत घेतले. त्याने मुलीला मिठीत घेतच तिला संपवले. आणि तिच्यासह तलावात उडी मारली, मात्र तो वाचला. यानंतर त्याने रेल्वेखाली जीव देण्याचा निर्णय घेतला.

यासाठी तो बंगळुरू रेल्वे स्थानकावर पोहोचला. याठिकाणी पोलिसांनी त्याला दुसऱ्या दिवशी पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गेल्या 6 महिन्यांपासून बेरोजगार होता आणि त्याच्या बिटकॉइन व्यवसायातही त्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यांच्या बंगळुरूतील घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रारही त्यांनी लिहिली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तो सतत पोलीस ठाण्यात जात असे.

पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर राहुलनेच घरातून दागिने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांनी पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले होते, मात्र त्यापूर्वीच त्याने मुलीची हत्या केली. चोरीची खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी कारवाईच्या भीतीने तिने मुलीचा जीव घेतल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies