हरगुडे येथील सोसायटीच्या ग्राहक भांडारातून साडेपाच लाखांची चोरी

 हरगुडे येथील सोसायटीच्या ग्राहक भांडारातून साडेपाच लाखांची चोरी



  परिंचे दि.५

  

        पुरंदर तालुक्यातील हरगुडे येथील हरगुडे विकास सेवा सोसायटीच्या ग्राहक भांडारातून पाच लाख ५० हजार रुपयांची चोरी घडल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात सोसायटीचे चेअरमन रवींद्र ताकवले यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की येथील ७२ वर्षीय रवींद्र ताकवले यांनी या बाबतची फिर्याद सासवड पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हरगुडे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या ग्राहक भांडारातून अज्ञात चोरट्याने साडेपाच लाख रुपयांची चोरी झाल्या बाबतची फिर्याद दिली आहे. यामध्ये ५०० रुपयाच्या ११०० नोटा चोरीला गेल्या आहे.दिनांक ३१/३/२०२२ रोजी सकाळी११.३० वाजाळेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद दिनांक चार एप्रिल रोजी सासवड पोलिसात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज दिनांक ५ एप्रिल रोजी माध्यमांना दिली आहे. याबाबतचां अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हवालदार गार्डी करीत आहेत.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.