राख येथील सोसायटीच्या चेअरमनपदी वर्षा महेंद्र माने यांची तर व्हॉईस चेअरमनपदी दत्तात्रय रणनवरे

 राख येथील सोसायटीच्या चेअरमनपदी वर्षा महेंद्र माने यांची तर व्हॉईस चेअरमनपदी  दत्तात्रय रणनवरे 



नीरा दि.९


  पुरंदर तालुक्यातील राख येथील.राख विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी वर्षा महेंद्र माने तर व्हॉईस चेअरमनपदी .दत्तात्रय हणमंतराव रनणंवरे यांची बिनविरोध निवड


       पुरंदर तालुक्यातील राख येथील  विकास  राख विकास सेवा सोसायटीची संचालक मंडळाच्या निवडणुकीत पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचे खदे समर्थक असलेल्या महेंद्र माने यांच्या पॅनलने सर्व जागा जिंकत एकतर्फी  विजय मिळवला होता. यानंतर आज दिनांक ९ मार्च रोजी चेअरमन, व्हॉईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सर्वानुमते  वर्षा महेंद्र माने यांची चेअरमन पदी  तर व्हॉईस चेअरमनपदी दत्तात्रय हणमंतराव रणनवरे यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी  सुशांत रणनवरे ,लक्ष्मण पवार, प्रमोद पवार, नंदकुमार पवार, अश्विनी रणंवरे, किसंन  महानवर, मधुकर सोनवणे, विजय खराडे,  हे  संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.निवडीनंतर नवनियुक्त चेअरमन व व्हॉईस चेअरमन यांचा ग्रामस्थांच्या वतीने अतुल रणनवरे ,व पॅनल प्रमुख महेंद्र माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राखच्या  सरपंच उज्वला खंडाळे उपसरपंच दत्तात्रय रणनवरे, सदस्य पुष्पलता जगताप,ज्योती माने,इत्यादीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..