Sunday, March 6, 2022

नीरा येथे पाटीदार समाज महिला संघटनेच्यावतीने महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 

नीरा येथे पाटीदार समाज महिला संघटनेच्यावतीने महिला आरोग्य तपासणी शिबीर  संपन्न

      ११० महिलांची करण्यात आली आरोग्य तपासणी




नीरा दि.६


       पुरंदर तालुक्यातील नीरा येथे पाटीदार समाज महिला संघटनेच्यावतीने महिला आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महिला दिनाचे औचित्य साधून या शिबीराचे  आयोजन करण्यात आले होते.

     आज झालेल्या या शिबिरात डॉ.पळसे यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली. तर नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या, यामध्ये प्रामुख्याने कर्करोग, किडनी, आणि महिलां संदर्भातील आजारांची तपासणी करण्यात आल्याची माहिती  कच्च कडवा पाटीदार  संघटनेच्या  मंत्री कल्पना पटेल यांनी दिली यावेळी डॉ.पळसे यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.  

No comments:

Post a Comment

Featured Post

बाबुर्डी येथे MAHAVISTAR AI अ‍ॅपचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 बाबुर्डी येथे MAHAVISTAR AI अ‍ॅपचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  बारामती :           डिजिटल तंत्रज्ञानाच्या साह...