पोस्ट्स

यूईआय ग्लोबल एज्युकेशन तर्फे गोवा फूड फेस्टिव्हल चे आयोजन

इमेज
 यूईआय ग्लोबल एज्युकेशन तर्फे गोवा फूड फेस्टिव्हल चे आयोजन. शिवाजी नगर पुणे येथील हॉटेल मॅनेजमेंट चे शिक्षण देणार्‍या यूईआय ग्लोबल एज्युकेशन तर्फे आज पुण्यात गोवा फूड फेस्टिव्हल ( खाद्य महोत्सव) चे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये गोवा राज्यातील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. यूइआय ग्लोबल एज्युकेशन च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी *फिशरमॅन्स व्हार्फ - गोवा फन अनलिमिटेड* या गोवन थीम मध्ये अनेक रुचकर पदार्थ बनवून पाहुणे म्हणून आलेल्या त्यांच्याच पालकांना जेवणात दिले. यामेनू मध्ये वेलकम ड्रिंक मिंटी पिंक कूलर, स्टार्टर मध्ये व्हेज पाय ओवर स्पाइसी पोटेटो, मेन कोर्स मध्ये ग्रिल ओबरजीन, ग्रील मॅकरेल, ब्राऊन राईस, पोइ इन स्पाइसी रस आणि डेझर्ट मध्ये बीबीनका, नेवरी अश्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद पाहुण्यांनी घेतला. या वेळी विद्यार्थ्यांनी गोवन नृत्याचे सादरीकरण केले आणि त्यांच्या संस्कृतीची कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख करून दिली. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद या खाद्य महोत्सवाला मिळाला. यूईआय ग्लोबल एज्युकेशन ही संस्था गेली 16 वर्षे हॉस्पिटॅलिटी मॅ...

जालन्यात पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे वाल्हेत पडसाद

इमेज
  वाल्हे,ता.०2:    मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यातील वातावरण ढवळुन निघालं आहे. या  घटनेनंतर शासन व पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे.त्यापार्श्वभुमीवर वाल्हे(ता.पुरंदर) येथे मराठा सकल समाजबांधवांच्या वतीने महात्मा फुले  व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन तीव्र संताप व्यक्त करुन घटनेचा निषेध व्यक्त केला.  जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्या घटनेचा राज्यभरातुन  निषेध केला जात आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे पडसाद उमटले. वाल्हे(ता.पुरंदर) येथील एस.टी स्टॅड शेजारील महात्मा  फुले व बाजारपेठमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वाल्हे सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन  विविध घोषणा देत घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा सकल समाज बांधव उपस्थित होते.  दरम्यान यावेळी 'एक मर...

नीरा येथील ज्युबिलंट इंग्रिव्हीया कंपनीमध्ये अपघात : अपघातामध्ये तीन जण जखमी

इमेज
  नीरा येथील ज्युबिलंट इंग्रिव्हीया कंपनीमध्ये अपघात अपघातामध्ये तीन जण जखमी  नीरा दि. २        नीरा ता.पुरंदर येथील ज्युबिलंट इंग्रिव्हीया कंपनीमध्ये आज मेंटेनन्सचे काम सुरू असताना अपघात झाला आहे .यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून यातील एकाला पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.कंपनी मध्ये मेंटेनन्स चे काम सुरू होते. यावेळी ऍसिड कॉम्प्रेसरच्या दुरुस्तीचे काम करत असताना हा मोठा स्पोट झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.तर यातील एक जण अत्यवस्थ आहे . पाच वर्षा पूर्वी सुद्धा कंपनीत असाच अपघात झाला होता.यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता.अपघातानंतर नीरा आणि परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झालय.   पुरंदर आणि बारामतीच्या सीमेवर असलेल्या ज्युबिलंट कंपनीमध्ये अनेक वेळा अपघात होत असतात. मागील चार वर्षांपूर्वी झालेल्या अपघात लोकांच्या अजूनही लक्षात असून आज शनिवारी सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा एक स्पोट झाला. इथेनॉल असिटप्लांटच्या मेंटनंसचे काम सुरू असताना हा स्पोट झाला. या स्फोटामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.यामध्ये तिघा जणांना मोठ्या प...

नीरा येथे ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा ४५वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

इमेज
  नीरा येथे ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा ४५वा वर्धापन दिन उत्साहात साजरा    नीरा दि.२               १९७८ साली मुंबईतील चुनाभट्टी येथे दहा बाय दहाच्या जागेत व 300 सभासद आणि तीन हजार रुपयांच्या भांडवलावर स्थापन झालेल्या आणि  संपूर्ण राज्यभरात आपले जाळे पसरवलेल्या ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा (दि.2) स्थापना दिवस आहे. निरा येथील ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेमध्ये हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 'एकमेका साह्य अवघे धरू सुपंथ ' या उक्ती प्रमाणे व सावकारी पाशातून सर्वसामान्य लोकांची मुक्तता करण्यासाठी आणि तळागाळातील लोकांना बचतीची सवय लागावी व त्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता होऊन, उन्नती व्हावी या मुख्य उद्देशातून ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. अवघ्या 300 सभासदांच्या माध्यमातून ही सोसायटी सुरू करण्यात आली आणि आज या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. राज्यभरात या संस्थेच्या १७७५ शाखा आहेत. तर या संस्थेकडे आज रोजी १५१ कोटीचे भाग भांडवला असून संस्थेकडे ...

८ वर्षांपूर्वी मंदीर चोरीतील फरार आरोपींच्या जेजुरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या.

इमेज
  ८ वर्षांपूर्वी मंदीर चोरीतील फरार आरोपींच्या जेजुरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या. पुरंदर :      पुरंदर तालुक्यातील पिंगोर येथील ग्रामदेवतेचे मुकुट व दागिने असे ९६ हजारांच्या मालाची चोरी २०१५ साली झाली होती. ५ फेब्रुवारी रोजी रात्री ही चोरी झाल्याची फिर्याद विश्वास लक्ष्मण क्षीरसागर (वय ७० वर्षे) रा. पिंगोरी यांनी दिली होती. जेजुरी पोलीसांनी तब्बल आठ वर्षांनी दोन चोरट्यांना ताब्यात घेण्यात यश आले आहे.      पिंगोरीची ग्रामदेवता असलेल्या वाघेश्वरी देवीच्या मंदिराच्या दरवाजा शेजारील लोखंडी ग्रीलची साखळी तोडुन आत प्रवेश करून मुकुट व दागिने असा ९६ हजार रुपये किमतीचा ऐवज लबाडीचे इरादयाने चोरून नेवुन धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य केले होते. अशा मजकुरचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करणेत आला होता. या गुन्हा दाखल झालेपासुन गुन्हयातील आरोपीत हे फरार होते.       भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व जेजुरीचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर यांचे मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पो.स.ई राहुल साबळे, ...

पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था सातारा या संस्थेच्या सल्लागारपदी बारामती मधून श्री.अविनाश सावंत यांची तर पुरंदर मधून श्री.शिवाजी काकडे यांची निवड...

इमेज
 पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था सातारा या संस्थेच्या सल्लागारपदी बारामती मधून श्री.अविनाश सावंत यांची तर पुरंदर मधून श्री.शिवाजी काकडे यांची निवड...  पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर तसेच कोकण विभागातील रायगड जिल्हा असे सहा जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या, पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेच्या सल्लागारपदी बारामती तालुक्यातील धों.आ.सातव (कारभारी) हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे कार्यरत असलेले , बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष श्री.अविनाश सावंत सर यांची तर पुरंदर तालुक्यामधून बा.सा.काकडे -देशमुख विद्यालय पिंपरे ता.पुरंदर येथे कार्यरत असलेले बारामती तालुका मराठी पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष पत श्री.शिवाजीराव काकडे यांची संस्थेच्या सल्लागारपदी निवड झाल्याचे पत्र संस्थेचे मार्गदर्शक श्री.एस.पी.जगताप सर यांनी त्यांना दिले. तीन हजार सभासद व सुमारे ५० कोटी रुपये भाग भांडवल असलेल्या या माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेची स्थापना १९७६ मध्ये झालेली असून, संस्थेला स्थापनेपासून ऑडिट वर्ग 'अ' मिळालेला आहे. वैयक्ति...

चिमुरड्याचा आई प्रेमात पडली आणि स्वतःच्या मुलाची वैरीण ठरली

इमेज
 चिमुरड्याचा आई प्रेमात पडली आणि स्वतःच्या मुलाची वैरीण ठरली मावशीच्या तक्रारी नंतर जेजुरी पोलिसांनी लावला खुनाचा छडा       जेजुरी दि.२९      मोडलिंब येथे राहणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या नावाच्या चिमुरड्याचा गळा दाबून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, ४ वर्षाच्या मुलाचा खून केल्यानंतर  त्याचा मृतदेह पुरंदर तालुक्यातील माळशिरस जवळील घाटात फेकून दिला होता. ही घटना दीड महिन्यापूर्वी घडली होती. जेजुरी पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून दोघांना ताब्यात घेतल आहे.. खून झालेल्याचार वर्षीय मुलाचे नाव चुटक्या शंकर पवार असून त्याची आई रेणू शंकर पवार  व तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके  या दोघांना जेजुरी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.याबाबत रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती      या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल साबळे, सहायक फौजदार चंद्रकांत झेंडे, दशरथ बनसोडे, प्रवीण शेंडे, पोलीस मित्र नानासाहेब घोगरे यांचा समावेश होता...या प्...